पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केया, मेथ्या किती घातल्या होत्या? कोरड्या पीठाची चव कडवट लागते आहे का? पीठाला वेगळा काही वास येतो आहे का? तसं असेल तर पीठ खराब असण्याची शक्यता आहे, वापरायचं की नाही हे ठरवा.

पीठाचा वास छान भाजलेला खमंग असा येत असेल आणि पीठ भिजवून झाल्यावर चव कडवट लागत असेल तर कांदा-टोमॅटो-कोथिंबीर घालून टोमॅटो ऑम्लेट करता येईल. पण आधी थोड्या पीठावरच प्रयोग करा, तरीही चव खूपच कडू लागत असेल तर ते पीठ वापरू नका.

अनिश्का, बहुतेक वर्षु-नीलने दडप्या पोह्यांची कृती इथे लिहिली आहे.

केया पीठ ताजे केलेले कडवट लागत असेल तर थोडे ज्वारी पीठ,बेसन,पोहे भरडून घालून पहा, कडवटपणा कमी होईल!

मंजुडी पीठ ताजेच केलयं त्यामुळे खराब असेल असे वाट्त नाही..आंबोळ्या चवीला चांगल्या लागत आहेत फक्त खाताना शेवटी कुठेतरी कडसर चव येतीयं....सुचरिताच्या सल्ल्यानुसार थोडे पीठ मिक्स करुन बघते..

व्हेज मायोनीजची बाटली आणली आहे. मस्तच चव आहे. बर्गर , पालक / कोबी पराठा वर स्प्रेड करुन रोल अप्रतीम लागतो. अजुन कुठे कुठे वापरता येइल Uhoh

ब्रेडवर लावून काकडी, टोमॅटोचे काप वापरून सॅंडविचेस्.
मेयोनीजमध्ये काकडी किसून (पाणी काढून), गाजर किसून घालून स्प्रेड बनवता येईल.

मुळा, काकडी, गाजर, फुलकोबीचे तुकडे हलके वाफवून मेयोनीजमध्ये बुडवून खायला छान लागतात.

वर्षा_म, सॅलड ड्रेसिंग म्हणून मेयोनीज वापरता येते.
माझी आवडती रेसिपी म्हणजे किसलेला कोबी, मेयोनीज, अननसाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, चवीप्रमाणे मीठ, मिरपूड घालून बनवलेले सॅलड.
मेयोनीज वापरून अनेक प्रकारची सॅलड्स बनवता येतात.
मायबोलीवरच ही कृती आहे बघ :
टॅको सॅलड

१ वाटी रवा, १ वाटी तूपात भाजून घ्यायचा. दीड वाटी अननसाचे काप वाफवून घ्यायचे. रवा खमंग भाजून झाला की त्यात १ वाटी साखर आणि दीड वाटी कोमट दूध घालायचे. मिश्रण हलवून एक वाफ आणायची. एक वाफ आल्यावर मग अननस घालायचा. एकत्र करून झाकण ठेवून पाच मिनिटं ठेवायचे. केशर, सुकामेवा ऑप्शनल.

ही कृती टीव्हीवर पाहिली आहे, मी केलेली नाही कधी म्हणून इथे लिहिले आहे.

अननस वाफवताना,चकत्याकरून त्या उभ्या स्टीलच्या डब्यात चकती थोडी साखर पुन्हा चकती असे एकावर एक रचून घट्ट झाकणलावून शिट्ट्या काढून तो अननस वापरल्यास अननसाच्या फोडी आम्बट लागत नाहीत! मधूर लागतात.

तापवून गार केलेले दूध > साखर > पिकलेल्या केळ्याचे हातानी तुकडे. एकत्र > ओरपा.
केळी आधीपासून मात्र घालू नयेत. काळी पडतात.

सुधारस > साखरेचा कच्चा पाक > थंड करावा > लिंबू पिळावं > ओरपावा... (मला माहीती असलेला असा करतात, अजून काही वेगळ्या पद्धती असू शकतीले... शेअर करा प्लीज)

योगेश यांनी दिलेल्या कृतीप्रमाणे सुधारस करता येतो किंवा गुलाबजामचा उरलेला पाक वापरूनही करता येतो :).

शिकरण आणि सुधारसात थोडे वेलदोडे टाकले तर छान लागते.

साउथ इंडीयन लोकं उडीद डाळ फोडणीत घालताना कुठला क्रम वापरतात? मी वेगवेगळ्या प्रकारे फोडणी करून पाहिली कधी डाळ काळी पडते किंवा दातात येते (कच्ची राहात असेल) अशी परफेक्ट व्हायला काय करावं?

वेका, तेलात मोहोरी/जिरं तडतडलं की मग आच मंद करून उडीदाची डाळ घालायची, कच्ची घातली तरी चालते, मग मंद आचेवर लालसर होईपर्यन्त परतायची, छान खुट्खुटीत होते अन चवही चांगली लागते, मग बाकी वस्तू घालाव्यात...

https://www.facebook.com/photo.php?fbid=505741782830655&set=a.1345601266...

http://www.misalpav.com/node/25197
हे बघा आवडतंय का? हैद्राबादी मिर्चीका सालन साठी पण बहुदा ह्याच मिरच्या वापरतात. गूगलून बर्याच रेसिपीज मिळतील सालनच्या.

वेका,
मी अलिकडे एक ट्रिक वापरते. उडिद डाळ आधी ३ मिनीट गरम पाण्यात ठेवते. मग ती निथळुन ठेवते चहागाळणीत, वाळली की मग फोडणीत घालते. त्याने बरा रिझल्ट येतोय.

चिकन टिक्का किंवा सुकं चिकन ह्याबरोबर जातील असे आणि आप्पेपात्रात करता येतील असे भज्यांसारखे अ‍ॅपेटायझर्स सुचवा. तळण करणे अशक्य आहे पण पावसाळी हवेत फ्रिटर्स / भजी प्रकारातलेच काहीतरी चटपटीत हवे आहे. मला जे आप्प्यांचे प्रकार येतात ते चिकनबरोबर ( आणि रंपासोबत ) चांगले लागतील का ह्याची शंका आहे. कॉर्न घालून एखादा प्रकार ? ...

ते तळल्यासारखेच होतील ह्याचा कॉन्फिडन्स नाही. आप्प्यांसारख्याच मिश्रणाची ( वेगळी पीठं, पदार्थ वापरुन ) रेसिपी चांगली जमेल असं वाटतं पण नवीन काहीतरी सुचत नाहीये !

Pages