पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रॅडी, बार्ली, कुसकुस किंवा बर्गुल सारखे वापरून बर्‍याच प्रकारे सॅलडस करता येतात. सूप्स मधे वापरता येते. रिसोटो करता येतो. बेक्ड डिशेस मधे वापरता येते.

अ‍ॅडमिन, कृपया शोध सुविधा वापरण्याबाबत हेडरमधेच सविस्तर लिहा. तसेच शोध हा आज्ञार्थी शब्द वगळून,
मायबोलीवरचे जूने लेखन, इथल्या चौकटीत कळीचे शब्द लिहून एंटर केल्यास सापडेल, असे काहीतरी लिहा.

मिक्सड फ्रुट प्युरे २०० ग्रॅम उरली आहे. तिचे काय करता येईल? नुसती कोणी खात नाहीये. >> कस्टर्ड, जेली, केक, आइस्क्रीम सोबत गारेगार करून खा. मस्त लागेल.

इथे हल्ली बार्ली दलिया मिळतो. त्याचा उपमा करता येतो. मस्त होतो. उपम्यात आधणाच्या पाण्यात रवा घातला की बर्‍यापैकी लगेच शिजतो त्याऐवजी बार्ली दलिया वापरताना प्रे पॅ मधे चक्क दोन शिट्ट्या काढल्या तर छान शिजतो. म्हणजे याला खिचडीही म्हणता येईल.. किंवा उपमा-खिचडी Happy

वर्षा, कांदा उन्हात वाळवला तर काळा पडतो. ( थोडे मीठ लावले तर चांगले. ) आणि नीट वाळला तर वर्षभरही टिकेल.
कांदा वाळून फार आक्रसतो, त्यामूळे उभा कापताना अगदी पातळ कापून चालत नाही. पाकळी ७ ते ८ मिलीमीटर जाडीची असावी.
फारच चांगला वाळला तर भुकटीही होते. ती पण वापरता येते.

कांदा काळा न पाडवता डीहायड्रेट करायची औद्योगिक प्रक्रिया आहे.

प्रॅडी, इतक्यात आप्पेमहोत्सव झाला तेव्हा या रेसिपीची आठवण काढली होती का ठावं नाय पण तू सुलेखाताईंचे बार्ली आप्पे इथे आहेत ते पण करून पाहू शकतेस.

मागच्या पानावर तू ज्वारीच्या हेल्दी रेसिपीचं म्हटलं होतंस ती रेसिपी पण थोडक्यात सांगशील का? मला फक्त तळ्लेले मुठिये, गुज्जु करतात तेच माहितेत म्हणून विचारतेय.

मागच्या पानावर मदत करणार्या सर्वांचे आभार...:)

प्रॅडी,

- मी बार्ली उकडुन ती कुठल्याही सूप (मिक्स्ड व्हेजिटेबल सूप मधे जास्त छान लागते) मधे घालते.
- मी बार्ली उकडून त्यात ऑऑ, रोस्टेड रेड पेपर्स / सन ड्राईट टोमेटोज, बल्सामिक व्हिनेगर, पार्स्ली असे सॅलड करते.
- मी बार्ली उकडून त्यात काकडीचे तुकडे, टॉमेटो, कोथिंबीर, हि मि + आलं यांची पेस्ट, दही असे घालुन खाते.
- मी बार्ली उकडून त्यात रेड, ग्रीन, येल्लो कॅप्सिकम, ऑऑ, मिडलइस्टर्न स्पाईसेस घालुन खाते.
- मी एकदाच बार्ली घालुन बेक्ड व्हेजिटेबल्स केले आहेत.
- मी बार्ली रिसोटो केलेला नाही.

सध्या थंडी सुरू झाली आहे त्यामुळे बार्ली खल्ली जात नाही.

धन्यवाद लाजो. खूप छान आयडियाज आहेत. नक्की करून बघेन. आज थोडी मुगाची डाळ घालून खिचडी करून पाहिली बार्लीची. छान लागली. नीरजा उपमा पण करून पाहीन.

वेका मी दुधी किसून घेते, असेल तर मेथीची पानं, ह्यात तिखट , मीठ,हळद्,हिंग, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू रस, बेकिंग सोडा, साखर , मीठ, घालते. दुधीला सुटलेल्या पाण्यात मावेल इतकं ज्वारीचं पीठ आणी एक चमचा (टीस्पून) कणीक आणी बेसन घालून भिजवायचं. मुटके वळून चाळणी वर वाफवायचे (१५-२० मिनिटं). वाफवल्यावर स्लाईस करून नुसतंच खायचं किंवा थोड्या तेलात मोहोरी, हिंग,तीळ, सुकी मिरचीची फोडणी करून त्यात ह्या स्लायसेस परतायच्या खरपूस. वरून कोथिंबीर घालून ओरपायचं.

मला बार्लीची बियर शिवाय दुसरी कुठलीच रेसिपी ठाऊक नाही अन ठाऊक करून घ्यायची इच्छा पण नाही Wink

>>Beer is one of the world's oldest prepared beverages, possibly dating back to the early Neolithic or 9500 BC, when cereal was first farmed,[11] and is recorded in the written history of ancient Iraq and ancient Egypt.[12] Archaeologists speculate that beer was instrumental in the formation of civilisations.[13]<<

(प्रिहिस्टॉरिक) इब्लिस

तोहरी /तुरई /घोसाळं /गिलकं /बिना शिरांचा दोडका याची भाजी तुम्ही कशी करता. मी नेहेमी नुसता लसूण ठेचूण /कांदा-लसूण घालून परतून वाफेवर शिजवते. मसाला पण जास्त घालत नाही.
पण अशी भाजी घरात खूप आवडीने खाल्ली जात नाही. हल्ली आठवड्यातून एकदा ही भाजी घ्यावीच लागते. भाज्याच नाहीयेत बाजारात. Sad (शिमला मिरची, दुधी, तोहरी, लाल भोपळा, वांगी, गोबी, भेंडी, अरवी, कारलं आणि पालक याशिवाय भाज्या नसतातच शक्यतो.)

अजून आपल्याकडे असतो तसा शिरांवाला दोडका आला नाहीये बाजारात म्हणे. त्या दोडक्याची काळा मसाला + दाण्याचं कुट भाजी आवडते पण घोसाळ्याची भाजी मात्र मिळमिळीतच लागते.

अल्पना जास्त कृती देत नाही, थोडक्यात सांगते. दोडक्याच्या मध्यम फोडी करायच्या. बटाटा कच्चाच ठेचुन बारीक तुकडे करायचे. आले-लसुण्-हिर्वी मिर्ची पेस्ट करायची. नेहेमीच्या फोडणीत ही पेस्ट परतुन वर दोडका बटाटा घालुन पाणी शिंपडुन वाफ काढायची. दोन्ही नीट शिजू दे. साखर मीठ चवीप्रमाणे. मसाला लागत नाही.

गुजराथी पद्धतीने अळु वड्या घालुन रेसेपी आहे इथे मंजुडीची.

http://www.maayboli.com/node/14592

अल्पना, दिनेशदांचा हा बाफ पहा.

आणि ती तुरीयापात्रावाटाणा भाजी अळुवड्यांशिवायही चांगली लागते, पण दोडके मात्र शिरा असलेलेच चांगले लागतात हे मा.वै.म.
बिनरेषांच्या दोडक्यांचं भरीत चांगलं लागतं.

मंजू, टुनटुन थँक्स.

मंजू, घोसाळं आणि झुकिनीची चव सारखीच असते हे लक्षातच आलं नव्हतं. इटालियन हर्ब्ज घालून बटर किंवा ऑऑवर परतलेली झुकिनी आवडते आमच्याकडे. तशीच करुनही आवडेल. Happy

रीमा, शक्यतो छोटेच सॅशे घ्यायचे. सॅशे वरून कापायचा आणि पॅकसकटच बाटलीत/ बरणीत ठेवायचा. बाटली/ बरणी फ्रिजमधे ठेवली तर बरं. चमचा कोरडा घालायचा. गरम दुधाजवळ/ दुधाच्या पातेल्याजवळ कॉफी/ बोर्नव्हिटा ठेवलेली बाटली न्यायची नाही. आणि तरीही, इतकी सगळी पथ्य पाळूनही कॉफी/ बोर्नव्हिटाचा दगड झाला तर त्यात पाणी घालून घेऊन ते मिश्रण चांगलं उकळून त्याचं सॉस करून ठेवायचं, फ्रिजमधेच ठेवून द्यायचं.
अधिक टिपांसाठी युक्ती सुचवा/ युक्ती सांगा - भाग १, सर्वात पहिलं पान वाच.

केक मध्ये ऑइल वापरायचे असते ते किती आणि कोणते वापरावे या बद्दल जरा प्रश्न पडलाय.
मी सध्या गिनी सनफ्लावर न्युट्री-V तेल वापरते, बटर ज्या प्रमाणात घालतो त्यापेक्षा थोड कमी घालते.
ते नक्की किती वापरावं???
मायबोलीवर वेजिटेबल ऑइल खूप वेळा वाचलं,
मी डी-मार्ट मध्ये वेजिटेबल ऑइल म्हणून १ तेल पाहिलं त्यात पाम+सोयाबिन तेल असं composition होत.
तेच असतं का त्यात? अणि ते केक मध्ये वापरता येइल का? वास येत नाही का त्याचा?

Pages