पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची- टोमॅटो पुदिना चटणी फार मस्त लागते. टोमॅटो आणि पुदिना दोन्ही थोड्याश्या तेलावर वाफवून घ्यायचे, मग एकत्र वाटायचे. वरुन उडदाच्या डाळीची+ लाल सुख्या मिरच्यांची फोडणी घालायची.

सफरचंद घालुन करता येइल. खोबरं जास्त खायला नको म्हणून मी नेहमी करते. साखर आणि लिंबु आधी घालु नकोस. चटणी पातळ वाटल्यास एखादा ब्रेड चा स्लाईस कडा काढुन त्यात घालायचा आणि ब्लेंड करायचं.

प्राची, तुला फुटाणे मिळतील पण डाळं मिळणं कठीणच आहे. फुटाण्याला बंगालीत छोलाभाजा म्हणतात, आसामीत त्याच्याच जवळपासचं कायतरी नाव असेल बघ.

ओके वरदा.
इथे आल्यापासून वरदा माझी लाइफलाइन झाली आहे. Proud

आता मी परत इकडे आले म्हणून वैतागू नका. Happy
मला सांगा फणसाच्या आठळ्यांची भाजी कशी करतात?

प्राची
इथे सायोची बहुतेक पाकृ आहे फणसाच्या भाजीची. नाही सापडली तर कटहल की सब्जी ह्या नावाने गुगल वर सर्च मार. चिरायचीच काय ती कटकट असते. तशी भाजी सोपी आहे.

प्राची, आठळ्या उकडून , सोलून तुकडे करुन घे. तेलावर जीरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करायची. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून परत. आवडी प्रमाणे हिरवी मिरची/तिखट, हळद घालायचे. दोन टोमॅटो बारीक चिरुन घाल, चांगले परतले की आठळ्या घालून परत बटाट्याच्या भाजी प्रमाणे. आठळ्या उकडताना मीठ टाकलेले असतेच तेव्हा वरुन मीठ घालण्याआधी चाखून बघ.

रीमा, नारळाचा चव आणि त्याच्या (मापी) पाऊणपट साखर थोड्याश्या तुपावर परता. (साखरेचं प्रमाण तुमच्या गोडाच्या आवडीनुसार कमीजास्त करू शकता. त्यात थोडी साय किंवा खवा किंवा आमरस घालू शकता, पण हे सगळे ऑप्शनल घटक. आमरस घालायचा असेल तर साखर कमी घालायची. मिश्रण आळून कडा कोरड्या व्हायला लागल्या की तुपाचा हात लावलेल्या थाळीत थापायच्या. जराशाने तुपाचा हात लावलेल्या सुरीने वड्या पाडायच्या. थापताना गोळा ओलसर वाटला तरी नंतर कोरड्या होतात.

दूध नाही घातलं तरी खुद्द ओला नारळही फार दिवस चांगला रहात नाहीच. जास्त टिकवायच्या तर फ्रीजमधे ठेवा.

(अ‍ॅडमिन, 'नवीन' पाककृती नाही म्हणून इथेच लिहिली आहे. तुम्ही म्हणाल तर उडवते. Happy )

नारळ पाक करताना त्यात उकडलेला बटाटा घालायचा. साधारण दोन मोठ्या नारळांच्या खोब-याला पाव किलो बटाटे (म्हणजे मध्यम मापाचे २-३). खायला एकदम मऊ मुलायम असा नारळीपाक बनतो.

फ्रूटी.

पायरीचा रस काढून त्यात किंचीत मीठ, बर्फ आणि साखर घालून मस्त गुळगुळीत ब्लेंड करून घ्या आणि थंडगार प्या.

सायली, सँडविचमध्ये पीच वापरता येईल. पीच, टोमॅटो, चीज, आवडत असल्यास थोडासा कांदा, वरून मीठ-मिरपूड, मिक्स हर्ब्ज आणि गट्टं स्वाहा!
किंवा पीचची चटणी, साल्सा करता येईल.

मला अर्जंटली मदत हवी आहे. शनिवारी सकाळी १२५ लोकांसाठी काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे. पदार्थ आणि प्रमाण सुचवा.
शिरा करायचा झाल्यास प्रमाण कसे घ्यावे?
लवकरात लवकर ठरवुन कळवायचे आहे आणि सामान पण अरेंज करावे लागेल.

पेरु,

शिर्‍याच्या अंदाजासाठी या पानावरील सुमेधाव्हीच्या २२ मेच्या पोस्टीपासून पुढच्या पोस्टी वाचा. अर्थात, तिथे उपम्याचा अंदाज आहे, पण त्यावरून शिर्‍याचा अंदाज काढायला हरकत नाही.

पडवळाची रस्सा भाजी कोणी करतं का? मला कृती हवी आहे. इथे 'शोध' घेतल्यावर एक पीठ पेरून भाजी दिसली आणि एक जुन्या हितगुजवर लिंक जात आहे, पण मला तिथे सर्व गार्बेज दिसत आहे. मला स्पेसिफिक रस्सा/ रस राखून ठेवलेली कृती हवी आहे.

मला माहित असलेली ही नेहमीची पडवळ भाजीची कृती.. ह्यात अंगचा रस असतो भाजीला. फोडणीत हिंग, मोहरी, हळद, तिखट घालून भिजवलेली हरभरा डाळ घालून परतणे, मग चिरलेला पडवळ घालून परतणे - गरज असल्यास किंचित पाणी शिंपडणे, वाफ आणणे - वाफेवर शिजविणे, गोडा मसाला / गरम मसाला, गूळ, मीठ चवीप्रमाणे घालणे. आई कधी कधी आमचूर पावडर घालते ह्या भाजीत. आवडत असल्यास वरून ओलं खोबरं, कोथिंबीर.

सायली,
प्रतिसादाला बराच उशीर झाला आहे तरीही सांगते.
पिच साखरेच्या पाकात बुडतील असे ठेऊन उकळवून घे १०-१२ मि. पा़क थोडा घट्ट केलास तर अजून छान लागेल. पाक छान गुलाबी होतो. गरम पिच
व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर किंवा नुस्तेच पाकातले थंड करुन मस्त लागतात.
मी मागच्या आठवड्यात केलेले फ्रिज मधे अजून टिकून आहेत थोडे.

इथे दिलेल्या रेसिपीप्रमाणे आंबोळीचे पीठ तयार केले पण चव थोडी कडवट लागती आहे बहुदा मेथ्या चे प्रमाण जास्त झाले.आता काय करता येइल?

दडपे पोहे कसे करायचे???? सधारण माहीत आहे पण पोहे भाजुन वगैरे घेतात का आधी?? की असेच कच्चे घेउन मग त्यात काकडी, टॉमॅटो घालतात??? अजुन काय काय घालतात??????

Pages