कंबोडियातील बाजार आणि गावकुस!
मी कंबोडियामधे २०११ ला अंकोरची मंदिरे बघायला गेलो होतो. मी कुठल्याही नवीन ठिकाणी जेंव्हा फिरायला जातो तेंव्हा त्या त्या देशाचा भाजीबाजार, पहाटेचे जनजीवन, रात्री शहराची निरवानिरव, एखादे खेडेगाव आणि तेथील लोकांचा नित्याचा व्यवहार ह्या गोष्टी अनुभवण्याचा हौसेने प्रयत्न करतो. ह्याच माझ्या हौसेतून काढलेली काही छायाचित्रे मी तुम्हाला दाखवत आहे.
१) हा आहे पाम-गुळ. ही बाई हा गुळ झाडाच्या पानात छान गुंडाळूत आहे.

२) कमळाच्या (वॉटर लिलीच्या) पाकळ्या गळून पडल्यात की त्या जागेवर बीया येतात. मग त्याचे असे फळ तयार होते. अतिशय रुचकर असतात ह्या बीया. ओले मटार, शहाळातील मलई, ओल्या भुईमुगाच्या शेंगा हलक्याशा गोड असतात तशी काहीशी चव असते आतल्या बीयांची. ह्या बीया वाळल्यात की त्या भाजून फुलवायच्या. त्यालाचं तर 'फुल-मखणे' म्हणतात. आणि उत्तर भारतीय लोकांमधे पुजेला फुल-मखणे असतात.
३) कलिंगड विकणार्या कंबोडियन स्त्रिया
४) पामगुळ कढईत आटल्यानंतर तो घोटताना
५) हा गुळ आणि त्या बाजुला छोट्या छोट्या पानापासून तयार केलेल्या डब्या:

६) ताडाची, माडाची, पानतरुची इतकी विपुल झाडे आहेत .. मग अशा रोजच्या व्यवहाराला लागणार्या स्वैपाक घरातील वस्तू तिथे तयार होतात.
७) हे कसले फळ आहे माहिती नाही पण बहुतेक हे पामतरुचेच फळ आहे आणि ह्या फळाच्या रसापासून गुळ बनतो.
८) ही बाई ताजा गुळ विकत आहे. हा गुळ पामतरुपासून बनवलेला आहे. बाजूला कढई आहे. गुळ तयार झाला की लगेच ती तो गुळ पानापासून तयार केलेल्या डबीत ठेवते आहे.
९) ही बाई चिकू, केळी आणि लोंगॉन नावाचे हंगामी फळ विकते आहे.
१०) कढईतील हा रस आटवला जात आहे.
११) किती छान वाटतं ना परदेशात आपला गणोबा भेटला की!
१२) स्वतःच ह्या वस्तू घराच्या अंगणात बनवायच्या आणि स्वतःच त्या विकायच्या.
१३) खूप स्वस्त विकायला काही परवडत नाही कारण बघा रस आटून आटून कितकुसा झाला.
१४) कंबोडियातील जंकफुड
१५) परदेशात अशी ही जांभळ पाहिली की तो क्षण कसा अगदी सुखदायक जांभळा होतो. मी तर थेट झाडावर चढून जांभळे खाल्ली तिथे इतकी ती विपुल होती तिथे!
१६) मोड आलेले मुग
१७) चिंचेची पाने ही लोक कशी खात असतील भाजी करुन!!!!
१८) ह्या आणखी वेगळ्या भाज्या
१९) अहो ह्या बासर्या नाहीत. ह्याच्या आत शिजवलेला लगेच खात येईल असा स्टिकी-राईस असतो. ह्या भातामधे रेडबीन्स असतात.
Mast. Angkor sathi 1 divas
Mast. Angkor sathi 1 divas pooresa asto kay re?
मस्त फोटो.. त्या गावात
मस्त फोटो.. त्या गावात गेल्यासारखे वाटले अगदी... तेवढी जांभळे ऑनलाईन खाता आली असती तर...
फोटो ७ व १२ मध्ये दिसताहेत ते ताडगोळ्यांचे नारळ असावेत. इथेही असतात पण हिरवे नाही तर जांभळट काळे. एका गोळ्यात ४ ताडगोळे असतात.
हवे, नाही चांगले तीन चार दिवस
हवे, नाही चांगले तीन चार दिवस लागतात सियाम रिप फिरायला. अंकोर हे एकच मंदिर इतके विशाल आणि विस्तृत आहे की ते बघायला एक दिवस लागतो. परत परत बघावे इतके सुरेख मंदिर आहे. मी त्याचेही नंतर फोटो टाकेन. अवश्य जा.
सुंदर... देशाटन केल्याने
सुंदर... देशाटन केल्याने ज्ञान वाढते असे सुभाषित आहे.. शेवटच्या फोटोत बासरी आहे, तसल्या मालदीवला मिळतात.. त्यात खोबरे गुळाची बर्फी असते.... भाताच्यापण बासर्या मिळतात, पण त्या कधी खाल्ल्या नाहीत.
बी, फार छान फोटो आहेत .
बी, फार छान फोटो आहेत . ट्रिपचे अजुन काही फोटो असतील तर टाक.
त्या स्वयंपाक घरात लागणार्या वस्तु मस्त आहेत.
सीमा, अजून खूप खूप फोटो आहे
सीमा, अजून खूप खूप फोटो आहे आणि नक्की नक्की टाकेन.
मस्त फोटो. जांभळे बघून अगदीच
मस्त फोटो. जांभळे बघून अगदीच तोंपासु. इथे दर्शनाला सुद्धा मिळत नाहीत.
बाप्पा पण छान आहेत.
भाजीबाजारत फिरणे हा माझा पण आवडता छंद आहे.
छान आहेत सगळेच फोटो
छान आहेत सगळेच फोटो
बी: कित्ती कित्ती मस्त. कारली
बी:
कित्ती कित्ती मस्त. कारली ओळखता आली १७ नं. च्या फोटोमधली. जांभळ बघून जीव जळला. बासर्यांचा आतला भात खायचा कसा? बाप्पा क्यूटच! आपल्या सारखी पूजा, आरती अंकोर मंदिरात करतात का? प्रसाद देतात का? लवकर लिही ना.
कल्पु, ती चायनीज कारली आहेत.
कल्पु, ती चायनीज कारली आहेत. त्या बासर्या नाहीत
बांबूपासून भात ठेवायला बनवलेलं साहित्य आहे.
हा भात खायला एक चमचा मिळतो. मग हा भाग खरडून खरडून खायचा. खूप चिकट असतो. चव अशी काही नसतेचं. तिथे आपल्या देवतांची पुजा होत नाही. उलट अंकोर मंदिरात जिथे विष्णुची मुर्ती होती तिचे धड कापून ती मुर्ती नंतर बुद्धाची करण्यात आली. हे मी नंतर लेखात सविस्तर लिहिन.
फोटो छान आहेत. अंगण खूपच
फोटो छान आहेत. अंगण खूपच आवडलं.
१६ व्या फोटोत माझ्या मते मोड आलेले मूग नाहीत. त्याला बहुतेक बीन स्प्राऊट्स किंवा जपानीत 'मोयाशी' म्हणतात.
हे बघ
http://www.google.com/#sclient=tablet-gws&hl=en&tbo=d&source=hp&q=moyash...
वाह... चांगला फेरफटका झाला
वाह... चांगला फेरफटका झाला तुमच्यामुळे.
बी, गावकुसाची ओळख करुन
बी, गावकुसाची ओळख करुन द्यायची कल्पना फार आवडली. वस्तूही अनोख्या.
पुढच्या फोटोंची वाट बघतोय.
मस्त फोटो. गूळ, गणोबा, उखळ
मस्त फोटो.
गूळ, गणोबा, उखळ आणि झारा आवडला.
फोटो मस्तच आहेत
फोटो मस्तच आहेत
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्तच आहेत. जीवनशैली अगदी
मस्तच आहेत. जीवनशैली अगदी साधी आणि निसर्गाच्या जवळ असलेली वाटतेय.
बासर्यांच्या आतला स्टिकी राईस. साधारण असाच प्रकार आपल्या केरळात करतात. त्याला पुट्टु का कायसं म्हणतात. १८ नंबरच्या फोटोतल्या जुड्या शेवळासारख्या दिसताहेत.
ते भले मोठे स्प्राऊटस कसे येतात?
मस्तच आहेत फोटो.
मस्तच आहेत फोटो.
बी छान फोटो टाकले आहेस. अजून
बी छान फोटो टाकले आहेस. अजून असतील तर नक्की टाक
गणोबा/स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू/मोड आलेले मुग/जांभळ सगळेच फोटो मस्त
धन्यवाद. माझ्याकडे बरेच फोटो
धन्यवाद. माझ्याकडे बरेच फोटो आहेत. ते मी आता हळूहळू इथे उपलोड करेन.
मस्त फोटो. आवडले, अजुन येउ
मस्त फोटो. आवडले, अजुन येउ देत.
वा! बी, अंगकोरची सफरच घडवून
वा! बी, अंगकोरची सफरच घडवून आणलीत की!!
सफर आणि तिचे चित्रदर्शी वर्णन, दोन्हीही बेहद्द आवडले.
एखादे प्रवासवर्णन क्वचितच इतके प्रत्ययदायी होत असते. हे उत्तम साधलेले आहे.
तो ताडगूळ, ताडपत्री डब्या त्या |
ते फूल-मखणे, काष्ठ-मूर्ती नव्या त्या ||
त्या लाकडी वस्तू, वाद्ये, टाकावू खाद्ये |
भाज्या, फळे, बासरी-वाद्यी-खाद्ये ||
हे सर्व देऊन इथे, 'बी' तुम्ही स्वहस्ते |
आहे घडवली अंगकोर-सहल, आम्हा ते ||
सुंदर
सुंदर
बी, सर्व फोटो सुंदर आहेत.
बी,
सर्व फोटो सुंदर आहेत.
७) फोटोतले ताडगोळे आहेत. मस्त
७) फोटोतले ताडगोळे आहेत. मस्त आहेत फोटो.
हिंदू व बौद्ध(ह्याचा ज्यास्त ) संस्कृतीचा प्रभाव आहे कंबोडियात.
व तिथे(कंबोडियात) ताडीचा गूळ खूप फेमस असतो जसा मलेशियात, आपल्या गोव्यात वगैरे.
मलेशियात मलंगाचा पाम गूळ खूप रुचकर व आरोग्यास चांगला असतो.
आणि हो ते मूगबीन्स स्प्रॉउटच आहेत. हे मूगाचेच आहेत. चित्रात बघून कळतय की सोयचे नाही.
इथे अमेरीकेत चायना/जपानीज बाजारात मिळतात.
सोयबीन्स किंवा मूगबीन्स ह्याचेच असतात, 'मूग' हे बीन्स कॅटागरीत येतात. म्हणून त्याला मोड आले कि मग ईंग्लिशमध्ये बीन्स स्प्रॉउटस म्हणतात.
भारतात सुद्धा मिळतात मॉलमध्ये आता.
ग्रेट , नुसते फोटो टाकले असते
ग्रेट , नुसते फोटो टाकले असते तरी कल्पना आली असती इतके प्रत्ययकारी फोटो आहेत. खेड्याची थीम आवडली. उगीच आपले बीच अन त्यावरच्या लंगोट्या यापेक्षा वेगळे आणि उत्तम,.....
मामी पुट्टू वेगळा. त्यासाठी
मामी पुट्टू वेगळा. त्यासाठी तांदूळ आधी वाटून घेतात. पुट्टू मेकर दोन भागाचा बनलेला असतो. खालच्या भागात पाणी घालतात आणि वरच्या भागामधे तांदूळाचे पीठ आनी खोबर्याचे थर लावतात. आणि मग खालच्या भागात पाणी उकळून ते वरील भागातल्या तांदूळ आणि खोबरे शिजवतात. (फिल्टर कॉफी टाईप)
फोटोत दाखवलाय तसा प्रकार अरूणाचल प्रदेशमधे करतात. मंगलोरमधे आलेल्या फूड फेस्टिवलमधे मी खाऊन बघितला. बी म्हणाला तशी त्याला विशेष चव नसते. (तशीपण नुसत्या भाताला चव नसते.) पण हा भात चिकट असतो. त्याबरोबर माशाचा अथवा मटणाची ग्रेव्हीटाईप काहीतरी बनवतात. खाली फोटो देत आहे. याचे नाव मात्र मी विसरले.
बी, फोटो अतिशय उत्तम. खरी
बी, फोटो अतिशय उत्तम. खरी गावाची ओळख होते.
तिथे जास्त करून स्त्रियाच काम करताना दिसतायत.
मस्त फोटो!!! आवडले!
मस्त फोटो!!! आवडले!
>>साधारण असाच प्रकार आपल्या
>>साधारण असाच प्रकार आपल्या केरळात करतात. त्याला पुट्टु का कायसं म्हणतात>> मामी, रारंगढांग ना?
बी, तू मूगाचे स्प्राऊट्स लिहिलंस ते बरोबर आहे. मी जपानमध्ये नुसते स्प्राऊट्स पाहिले आहेत त्यामुळे दोन्ही वेगळे असं वाटलं.
Pages