हर्ट यांचे रंगीबेरंगी पान
बी मेरवान गुडबाय!!!!
मुंबईतं ग्रान्ट रोड स्टेशनच्या बाहेर पडल की अली भाई रेमजी रोड वर 'बी मेरवान' ही बेकरी दिसते. गेले ९१ वर्ष ही बेकरी आहे तिथेच आहे. त्यांचा मेनू सुद्धा उभ्या ९१ वर्षात कधी बदलला नाही. ह्या बेकरीत मिळणारा मावा केक, मावा सामोसा, प्लम केक, इरनी चहा, बन मस्का पावा, हॉट केक, अंडा भुर्जी ह्यांची जशी होती तशीच आजही टिकून आहे. मावा केकची पहिली बॅच सकाळच्या ८ पर्यत संपून गेलेली असते आणि शेवटची बॅच ५:३० ला. बेकरीमधील खुर्च्या झेकोस्लॉहोकीयामधून आणलेल्या आहेत तर छताला लागून असलेल्या टाईस ईटालियन आहेत.
इरावती कर्वे
इरावती कर्वे काहीतरी ग्रेटच होत्या. अस व्यक्तिमत्त्व बघायला आणि वाचायला मिळण म्हणजे मी मराठी मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याचे केवढे तरी अप्रुप वाटते आणि मला वाचनाची आवड आहे त्याचे अजूनच! पण आपण वाचायला लागतो आणि ती आवड आपल्यात निर्माण होते ह्याचे सर्वात पहिले कारण असावे ते म्हणजे आपण हाती घेतलेले पुस्तक. हाती पहिलेच पुस्तक यावे आणि ते सडकछाप निघावे म्हणजे त्या वाचकाला परत पुस्तक हाती धरावेसे वाटेल का? बहुतेक नाही!
किंमत
सुरुच असतो शोध माझा तुमचा
जागेपणी आणि निद्रिस्त असताना सुद्धा
की काहीतरी सापडेल अवचित
आणि बदलून जाईल आपले जगणे
पण असे होत नाही
जिथे स्वःतला उलगडून सांगणेच
अवघड झाले आहे
तिथे नवे काही गावण्याची
शक्यता अगदीच सुमार आहे
कुठल्या तरी एका क्षणी
कदाचित केस आणि केस पिकलेल्या
जख्ख म्हातारपणी
हे कळून चुकत की
ह्यापेक्षा खर्डेघाशी परवडली असती
उभ्या आयुष्यात खूप काही गमावल
नव काही मिळाल त्याची किंमत
मी किती मोजली.. मला माझेच ठावूक.
- बी
प्रिय मायबोलिकरांना माझ्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा!
गर्दी
गर्दीपासून दुर दुर किती दुर जावे?
तिथे भेटेल गुडघाभर गवत
क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवळ
आकाशाची निळाई
अवकाशाची अथांग पोकळी
पाखरांची अगम्य भाषा
रातकिड्यांची किर्र अंगाई
दुपारची निबीड छाया
सकाळची पुर्वाई
रात्रीची जाईजुई
कदाचित जीव होऊन जाईल विरक्त
तर लाभेलही मोक्ष.
पण इथे कुणाला महती त्याची!
होऊन जावे गर्दीतल्या गर्दीत अलिप्त
परंतू शांतचित्त!
- यशवंत/बी
सुरुवात
कुठुन कशी होते सुरुवात
अवचित नव्या वाटा गवसतात
नकळत अनोळखी दिशा
परिचयाच्या होऊन जातात
नवीन दारे उघडतात
जुनी मिटून जातात
आठवणीखेरीज दीर्घकाळ
टिकत नाही कुठलच
सुख वा दुख!
कमी अधिक फरकाने
सुरुच असतात
घडत जाणारे बदल.
जोवर हवे असतात
स्विकारले जातात
असे हे बदल
तोवर सर्वकाही
ठिक ठिक आहे...
बी
निळ्या आभाळी कातर वेळी...
पाहू दे मेघाविन सौंदर्य तुझे हे मोकळे....
कुठेही जाता
कुठेही जाता
आकाश तेच आहे
तोच चन्द्र, तोच सुर्य
चांदणेही तेच आहेत
पायाखाली जमीनच आहे
पाखरांचे चेहरे अपरिचित
किलबील तशीच मंजुळ आहे
अन्न वस्त्र निवारा
जगण्याच्या गरजाही त्याच आहेत
सभोवतालच्या वर्तुळाचा परिघही
जेमतेम तेवढाच आहे
फक्त एकच की
खूप काही प्रेमाने सामावलेले
स्वकष्टाने जमवलेले
कक्षेच्या बाहेर सहज निसटून गेले आहे!
- यशवंत/बी








