आशावाद

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आशावाद

कधीही पालवणार नाहीत
अशा वेड्या आशांना
वार्‍यावर बेफिकिर सोडून
तू निघून गेल्यानंतर;
माझे उमेदिचे वसंत
बहर येण्यापुर्वीच
कोळपून गेलेत;
जगण्याची भ्रांत हरवून
आयुष्य वठलेल्या
वुक्षासारखे जीर्णशीर्ण झाले

परंतू..

शिशिराच्या एका बोचर्‍या रात्री
तू केलेल्या प्रतारणेचा दाह
शमवत असताना;
वेड्या मृत बाभळीला
लवलवते कोंब येताना
मी पाहिले.. आणि
भूतकाळात जखडलेले
सर्व संदर्भ क्षणात झडून
नव्या दिशेला पाऊल पडले..

प्रकार: 

छान.