मिल्या यांचे रंगीबेरंगी पान

एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

तो- या आकांताचा तुला इशारा कळला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं

तो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू
ती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू
तो- का????
ती- पडत्यात...

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

ती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू
हाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू

तो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं

ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
---

प्रकार: 
शब्दखुणा: 

नामंजूर (विडंबन)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुण्याच्या ट्रॅफिकवरचे जुन्या माबोवरील विडंबन *लोकाग्रहास्तव परत एकदा टाकत आहे .... Happy

चाल : नामंजूर

जपत जनांना कार हाकणे - नामंजूर
लाल दिव्याला उगा थांबणे - नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची
वनवे म्हणुनी लांबून जाणे - नामंजूर ||

मला फालतू फलकांचा ह्या जाच नको
कुठे कसेही वळण्यावर ह्या टाच नको
थांबवितो मी गाडी जिथे मज हो इच्छा
जागा बघुनी पार्कींग करणे - नामंजूर ||

रस्त्यांवरच्या अपघातांना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी

प्रकार: 
शब्दखुणा: 

बॉलीवूड (काहीच्या काही कविता)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सागरातुनी काढू घागर... काय बिघडते
गॉसिप करुया बॉलिवुडावर काय बिघडते

खुशाल काढा पिक्चर; त्याला कथा असूदे
कथे-बिथेचा कशास अडसर? ... काय बी घडते

गरज कथेची होती ... म्हणुनी अशी नाचले
बिकीनीमधे माझा वावर ... काय बिघडते?

शिकार केली काळविटाची दोष न त्याचा?
जनावर करे ठार जनावर ... काय बिघडते?

पोटा, टाडा लावा अथवा अजून काही
सुटून येऊ जामीनावर.... काय बिघडते?

पैसे फेका पडद्यावरती ... तीच पावती
हवे कशाला ऑस्कर बिस्कर ... काय बिघडते

खेटर मारू तरीही पुन्हा थेटर गाठू
अजब असे हे फिल्मी चक्कर ... काय बिघडते?

काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ज्यांना ही कविता ईमेलने आपल्या मित्रमंडळींना पाठवायची आहे.. त्यांनी कृपया पीडीएफ चा वापर करावा...

kaay re deva.pdf (43.94 KB)

प्रेरणा : संदिप खरेची कविता काय रे देवा...

आता पुन्हा सारेगमप येणार
मग पल्लवीच्या जुन्या थोबाडावर जुनेच हसू फुटणार
मग अवधूत जुन्याच स्टाईल्स नव्याने मांडणार
मग जुनेच स्पर्धक येउन नव्याने बोअर करणार
मग माझी चिडचिड होणार

काय रे देवा....

पण ती चिडचिड कोणाला दाखवता नाही येणार

प्रकार: 

त्रास होतो... त्रास नुसता (विडंबन)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सर्व माबोकरांची माफी मागून वैभवच्या मोठ्ठ्या वृतातल्या उच्च गझलेचे हे विडंबन

अताशा काव्य इथले वाचण्यातच वेळ जातो... त्रास होतो... त्रास नुसता

प्रकार: 

अमिताभ बच्चन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अमिताभ बच्चन आणि त्याच्या करोडो पंख्यांना समर्पित....

स्टार स्टारांचा खरा... अमिताभ बच्चन
कोंदणामधला हिरा... अमिताभ बच्चन

सिलसिला, जंजीर, शक्ती, डॉन, शोले
करमणूकीचा झरा... अमिताभ बच्चन

अग्निपथ, दीवार, खाकी, ब्लॅक, आंखे

तारा खाई दाणे (विडंबन)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चाल - वारा गाई गाणे

तारा खाई दाणे
चुरमुरे, फुटाणे
रोज तिला लागे
नवे नवे खाणे ऽ
तारा खाई दाणे ॥

गोड आवडे, तिखट आवडे
कशाचे नसे तिला वावडे
बका बका खा ऽ णे, लठ्ठ होत जाणे ऽऽ
तारा खाई दाणे ।

विषय: 
प्रकार: 

ऑनलाईन गझल मुशायरा (भाग 7 उपलब्ध)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मराठी गझल सादर करत आहे जगातला बहुतेक पहिला ऑनलाईन मराठी गझल मुशायरा.
हा मुशायरा पुढचे ६-८ आठवडे दर आठवड्याला एक ह्याप्रमाणे प्रकाशित केला जाणार आहे आणि तो ऑनलाईन ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रकार: 

संपवून टाक पेग (विडंबन)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

अलिकडे बरेच दिवस विडंबन करत ('सुचत' असे वाचू नये Happy ) नसल्याने एक खूप पूर्वी केलेलेच विडंबन थोडे सुधारून टाकत आहे..

नवी बाटली जुना माल Happy

चाल : मालवून टाक दीप

संपवून टाक पेग, पाजवून घोट घोट

प्रकार: 

यथेच्छ खातेस ऐकतो...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

प्रेरणा : वैभव ची अतिशय नितांत सुंदर गझल 'सुखात आहेस ऐकतो'

मूळ गझल :

सुखात आहेस ऐकतो ! हे कसे जमवतेस सांग ना!
तुडुंब डोळ्यामधील पाणी कुठे लपवतेस सांग ना !

अजून गेली नसेल ना ती रुसावयाची सवय तुझी?

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मिल्या यांचे रंगीबेरंगी पान