तारा खाई दाणे (विडंबन)
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’
read
1’
चाल - वारा गाई गाणे
तारा खाई दाणे
चुरमुरे, फुटाणे
रोज तिला लागे
नवे नवे खाणे ऽ
तारा खाई दाणे ॥
गोड आवडे, तिखट आवडे
कशाचे नसे तिला वावडे
बका बका खा ऽ णे, लठ्ठ होत जाणे ऽऽ
तारा खाई दाणे ।
ह्या पुण्यामधे खूप हॉटेले
एकही नसे तिने सोडले
कर्ज काढतो ऽ मी, भागविण्या देणे ऽऽ
तारा खाई दाणे ।
तिला वेड हे कुणी लाविले
कुणी पुरविले तिचे चोचले
दोष तिचा ना ऽ ही, खादाड घराणे ऽऽ
तारा खाई दाणे ॥
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्तच !
दोष तिचा
दोष तिचा ना ऽ ही, खादाड घराणे ऽऽ>>>>>

हा हा हा .....
जबर्या आहे हे!!
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
मिल्या
मिल्या जबरी.
जबरीच
जबरीच
------------------------------------------------------------------------
कैलासराणा शिवचंद्रमौळी फणिंद्रमाथा मुकुटी झळाळी,
कारुण्यसिंधु भव दु:ख हारी, तुजविण शंभो मज कोण तारी ....
(No subject)
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....
मिलिंद,
मिलिंद, तुजी विडंबणं यायाच होवी मदुन मदुन. प्रत्येक वाक्याला हसून फोडतात
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)
(No subject)
सहीच... -------------
सहीच...
-------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
*****************
*****************
सही बरेच
सही
बरेच दिवसांनी विडंबन! 'मिल्या' स्टाईलने झकासच!
पण वेगळा विषय घेता येईल का? मला अचानक हे सुचले, अर्थात त्यावर पूर्ण विडंबन करायला मला नाही जमणार, पण सुचले, म्हणून लिहीते:
तारा गाई गाणे

ताना अन् तराणे
रोज आळवे ती
नवनवे 'घराणे'
-----------------------------------
Its all in your mind!
मिल्यादा
मिल्यादा मस्तच रे
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
(No subject)
सहीच रे
सहीच रे एकदम...
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
मिल्या.. शॉ
मिल्या..
शॉलेट.. फुटलो रे..
आधी नुसतं म्हणून पाहिलं. मग चालीत म्हटलं. एकदम सही..
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
चालीत
चालीत म्हटलं. एकदम सही..

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
मस्त रे
मस्त रे
मस्त रे,
मस्त रे, तारा च्या ऐवजी 'दारा' म्हणण्याची हिंमत झालेली दिसत नाही
हे हे,
हे हे,
ह्या पुण्यामधे खूप हॉटले>>>ते हॉटले चं बघ ना काही करता येतंय का? अर्थ बदलतोय रे!
सॉल्लिड..
सॉल्लिड.. बर्याच दिवसानी आलेलें जबरदस्त विडंबन.
--------------
नंदिनी
--------------
सर्वांचे
सर्वांचे खूप आभार... बरेच दिवसांनी विडंबन लिहिले...
पूनम : घरचा आहेर का?
चांगले सुचवले आहेस पण स्वतःच्य वैगुण्यावर मी विडंबने करत नाही 
गोविंद : दारा लिहिले असते तर दाराबाहेरच रहावे लागले असते ना
श्या. - ते हॉटेले असे करतो
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा
मिल्या,
मिल्या, वाचलं आणि जाम हसले. म्हणून बघितलं आणि परत जाम हसले... कसलं जबरदस्तं लिहितोस रे... सॉलिड तिरकं चालतं तुझं डोकं.
मिल्या
मिल्या सॉलीडच रे!.....अगदी खदाखदा हसले!
(No subject)
जब्बर...
(No subject)
मिल्या बॅक
मिल्या बॅक इन अॅक्शन !!
जबरीच. चालीत वेगळे म्हणायची गरजच पडली नाही. आपोआपच चाल लागली वाचता वाचता.
फक्ता शेवटपर्यंत म्हणणे काही जमले नाही. बराच वेळ हसू आवरत नव्हते.
=== I m not miles away ... but just a mail away ===
बेश्ट!!
बेश्ट!!
दोष तिचा
दोष तिचा ना ऽ ही, खादाड घराणे ऽऽ>>>>> खि खि खि
परागकण
मिल्या, मी
मिल्या, मी आत्ता माझ्या ४मैत्रिणीना जमवून हे विडंबन आम्ही चालीत म्हटलं. त्या माबोकर नाहीत त्यामुळे त्यांचावतीने मीच तुला खिदळून दाखवते

************
विविध घटकांतून बाहेर पडणार्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)
मिल्या,खी
मिल्या,खी खी खी..
.. अधुनमधुन का होईना गझलव्यासंगातून विडंबनांही वेळ देतोयस हेही नसे थोडके 
Pages