त्रास होतो... त्रास नुसता (विडंबन)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

सर्व माबोकरांची माफी मागून वैभवच्या मोठ्ठ्या वृतातल्या उच्च गझलेचे हे विडंबन

अताशा काव्य इथले वाचण्यातच वेळ जातो... त्रास होतो... त्रास नुसता
अखेरी हेच जाणवते पुरे आहे... जुन्या कविता, कविंचा भास नुसता

तुझा थरकाप नाही होत का पाहून तंट्यांची अशी बेफाम संख्या
मला तर कोणत्याही बाफ़वर जाताच दिसतो द्वेष अन दु:स्वास नुसता

तुम्ही कित्येक कविता पाडल्या पण वाचले नाहीच मी त्यांना कधीही
कशाला घ्या शिताचीही परीक्षा जर भयंकर येत आहे वास नुसता

अशाने काय होते की लिहावे, ना लिहावे स्पष्ट काही कळत नाही
कुणी ग्रूपामधे म्हणते, कुणी म्हणतेय ग्रुपमध्ये... कसा *बकवास नुसता

कधीचा पारल्यावरती **दबा धरुनीच बसलेलो बघाया खाद्यजत्रा
अरे खादाड अक्कांनो तुम्ही नैवैद्य म्हणुनी खा... खिमा फर्मास नुसता

असे होते, असे होतेच बाबांनो असे वेडेच करते मायबोली
असे तोंडात येते ’धन्स’ अन जगण्यात मा.बो. चा नशीला ध्यास नुसता

तुझे काही खरे नाही... ’मिल्या’ आता तरी थांबव असे वाह्यात चाळे
तुलाबी खायला लागेल बर्फी उंबराची... व्हायचा उपवास नुसता

* बकवास हा शब्द पोर्तुगिज भाषेतून मराठीत आला असून त्याच्या लिंगनिश्चिती बाबत कुठलेही नियम फ. क्ष. दामले ह्यांच्या व्याकरण विषयक पुस्तकात सापडले नाहीत...
आमच्या ’शुद्धेली’ गावातल्या शोनुल्या गल्लितल्या चाफेकर वाड्यातले लोक हा शब्द पुल्लिंगीच चालवतात

** द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो

प्रकार: 

Lol जबरी एकदम.
कुजबुज वार्षिकाची पुरवणी का ही?

** द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो >>> मिल्या लय भारी Rofl

जबरी मिल्या... Lol

त.टी. पण भारी एकदम..

जबरी!

द चा ’ड’ करू नये. अर्थ बदलू शकतो >> Lol

फ. क्ष. दामले >> Lol फुलफॉर्म काय बरं?

************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

द चा ’ड’ करू नये Lol

भन्नाट रे! ही कुजबूज ची काव्यपुरवणीच वाटते.

उच्च! Lol
तुलाबी खायला लागेल बर्फी उंबराची>>>
द चा ’ड’ करू नये>>>
फ. क्ष. दामले, शोनुल्या, चाफेकर>> Rofl

पार्ल्यात द चा ड धरुन बसला असतास तर फायदा झाला असता
अता राहिला 'तोडलंस' 'फोडलंस' प्रतिक्रियांचा त्रास नुसता!

Happy Happy

नाही दाबू शकत !!

Biggrin Lol Rofl Proud

~ प्रकाश ~

Lol मस्तच . काव्य कुजबूज.

तुम्ही कित्येक कविता पाडल्या पण वाचले नाहीच मी त्यांना कधीही
कशाला घ्या शिताचीही परीक्षा जर भयंकर येत आहे वास नुसता

मिल्या Rofl वेड आहेस तू Happy ड चा डा करुन वाचु नये Lol

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

Biggrin तटीसकट भन्नाट !

  ***
  Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

  मिल्यादा Lol

  द चा ड >>> Rofl
  ------------------------
  देवा तुझे किती सुंदर आकाश
  सुंदर प्रकाश सूर्य देतो

  भन्नाट आहे.... Lol

  त.टी अफलातून ....

  मिल्या झकास रे.. ! Lol
  ~~~~~~~~~

  अशाने काय होते की लिहावे, ना लिहावे स्पष्ट काही कळत नाही
  कुणी ग्रूपामधे म्हणते, कुणी म्हणतेय ग्रुपमध्ये... कसा *बकवास नुसता
  >>>> Proud

  फ.क्ष.दामले! Biggrin

  'त्रास' झालंय विडंबन! Happy

  मस्त... Happy
  ----------------------------------------
  मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

  मिल्या..
  कडक...
  हुच्च... Rofl
  =========================
  "हाती घ्याल ते घरीच न्याल"

  Pages