नामंजूर (विडंबन)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

पुण्याच्या ट्रॅफिकवरचे जुन्या माबोवरील विडंबन *लोकाग्रहास्तव परत एकदा टाकत आहे .... Happy

चाल : नामंजूर

जपत जनांना कार हाकणे - नामंजूर
लाल दिव्याला उगा थांबणे - नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची
वनवे म्हणुनी लांबून जाणे - नामंजूर ||

मला फालतू फलकांचा ह्या जाच नको
कुठे कसेही वळण्यावर ह्या टाच नको
थांबवितो मी गाडी जिथे मज हो इच्छा
जागा बघुनी पार्कींग करणे - नामंजूर ||

रस्त्यांवरच्या अपघातांना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडांचा होवो सार्‍या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नामंजूर ||

पडणे-झडणे, भांडण तंटे रोज घडे
संधिसाधू, लोचट मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गार्‍हाणे - नामंजूर ||

(मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही
मी पथ असला अद्याप पाहिला नाही ||)

नो एन्ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी
मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी
परदेशातून नियम पाळणे मज समजे
पण नियमांना इथे पाळणे - नामंजूर

~ मिलिंद छत्रे

* - लोकाग्रहास्तव असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात फक्त इंद्रा आणि डुआय ने विनंती केली आहे Happy

प्रकार: 
शब्दखुणा: 

परदेशातून नियम पाळणे मज समजे
पण नियमांना इथे पाळणे - नामंजूर

मस्त ... सगळे विडंबन मस्तच आहे... Proud लगे रहो मिल्या भाई

मिल्या, जबरी! फक्त त्या कंसातील चार ओळी विषयाला सोडून वाटल्या. रस्त्याशीच संबंध असला तरी.

हायला हे आंतरजालावरुन फिरत फिरत अनेक महिन्यांपूर्वी आले होते माझ्या ईमेलमधे. कवीचे नाव टाकलंच नव्हतं तेव्हा. प्रचंड धम्माल आहे हे.

>>* - लोकाग्रहास्तव असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात फक्त इंद्रा आणि डुआय ने विनंती केली आहे

हा कडक होता Rofl

(मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही
मी पथ असला अद्याप पाहिला नाही ||)

वा! क्या बात है!! Lol

परत एकदा Lol दरवर्षी पावसाळ्याआधी टाकत जा मिल्या. लोकाग्रहास्तव. Proud

मिल्या,

धन्यवाद Happy हे भारीच आहे हे पुन्हा काय सांगायलाच हवं काय?

* - लोकाग्रहास्तव असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात फक्त इंद्रा >>

इन्ददेवांनी सांगितलेलं मी मिल्याच्या विपूत डोकावताना पाहिलं. अन् लिहिलं की हे विडंबन नविन मायबोलीवर टाकावे ही नम्र विनंती >>>हो हो! नाहीतर मी टाकेन! - साभार मिल्याजींकडून (ह्या नोटे सकट! Proud )

आपलंच काव्य जुन्या मायबोलीवरून चोरून नव्या माबोवर मी टाकू नये म्हणून शेवटी मिल्याने ऐकलं खरं. आता अजून एका लेखाच्या प्रतिक्षेत आहे! काय मिल्या? Happy

धन्यवाद मिल्या... Happy

जुन्या मायबोलीत तुझा बराच खजिना अडकून पडला आहे... तुटपुंज्या लोकाग्रहास्तवा खातिर तो नव्या मायबोलीवर प्रकाशित व्हावा हीच तुटपुंजी अपेक्षा आहे. :p

जुलै महिन्यात पुण्यातील खड्ड्यांवर केलेले विडंबन अपेक्षीत आहे. Wink

धन्यवाद लोखो....

इंद्रा : अगदी नक्की रे... जुन्या माबोवर तर खड्यांच्या विडंबनांचा पाऊसच पडला होता... देवा, राफा आणि इतर अजून बरेच होते...

लाजो : हेल्मेट्सक्ती वर वैभवचे एक विडंबन होते भारी... सापडले तर लिंक देईन...

Pages