संपवून टाक पेग (विडंबन)

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

अलिकडे बरेच दिवस विडंबन करत ('सुचत' असे वाचू नये Happy ) नसल्याने एक खूप पूर्वी केलेलेच विडंबन थोडे सुधारून टाकत आहे..

नवी बाटली जुना माल Happy

चाल : मालवून टाक दीप

संपवून टाक पेग, पाजवून घोट घोट
बेवड्या किती दिसांत, लागले सुरेस ओठ

ह्या इथे नसानसात, झिंगते अजून रात
हाय! तू गमावलीस एवढ्यात का विकेट?

गार गार ह्या हवेत, उष्ण उष्ण घोट घेत
मोकळे करून टाक एक एक ग्लास ’नीट’

दूर दूर ह्या पबात, बैसलो निवांत पीत
सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लूट

हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट

काय हा तुझाच र्‍हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट

बेवड्या किती दिसांत लागले सुरेस ओठ

प्रकार: 

मस्तच रे मिल्या. एकदम आवडेश. एकदम फीट्ट बसतेय चालीत. Happy

छान!

लागते खरेच काय सांग नाविकास बोट..... अप्रतिम!

शरद

येलकम बॅक मिल्या! झक्कास जमलीय!

'नाविकास बोट' हा जबरी होता.

-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

नावीकास बोट, पापडावरीच पोट Lol

सावकाश लोचनांनी बार नर्तिकेस लुट.... Happy

मिल्या, नेहमीप्रमाणे जबरदस्त.

भारीच.. Happy

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

मिल्या दादा एंट्री एकदम फार्मात की..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

मिल्याsssssssssss,
सुरुवातीच्या विवेचनातच विकेट घेतलीस.. (विडंबन सुचत नसल्याने) Lol
बाकी एकदम भन्नाट.. 'नाविकास बोट' तर एकदम खल्लास.. Proud
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

Rofl मिल्या खल्लास... फुल्टू टाईट....

>>> एक एक ग्लास ’नीट’
हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट
काय हा तुझाच र्‍हास, एवढ्यात तू खलास
ऊठ रे अता भरेल, पापडावरीच पोट
:):-) सही !

  ***
  “If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.” - हेन्री डेव्हिड थोरो

  लागते खरेच काय? सांग नाविकास बोट>>>
  हे खतरा!!

  --
  पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
  आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

  एकदम बेष्ट... खरंच...

  विनय Lol

  प्रतीसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...

  किरू : असे कंसात लिहिलेले मोठ्ठ्याने वाचायचे नाही Happy लोकांना तेच खरे वाटेल ना! Happy

   -------
   स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
   स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

    लोकांना तेच खरे वाटेल ना! Happy

    मग एखादे नविन पण लिही ....

    मजा आली.

    उच्च..! भारी..!
    Lol

    --
    Come on you raver, you seer of visions,
    come on you painter, you piper, you prisoner, and SHINE!

    च्यायला जाम भारी रे कुठुन आन्लिस रे?

    सही ! चालीवर गाऊन पाहिले.. खूप मजा आली. ग्लास 'नीट' सुद्धा खूप आवडले.:)

    मिल्या, मस्त आहे विडंबन!

    सही रे मिल्या Happy
    ************
    To get something you never had, you have to do something you never did.

    नवी बाटली>> एकच पेग? ;)छान आहे

    Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

    मस्त रे मिल्या...
    नाविकास बोट ही कल्पना तर भन्नाटच.

    Pages