अमिताभ बच्चन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
1’

अमिताभ बच्चन आणि त्याच्या करोडो पंख्यांना समर्पित....

स्टार स्टारांचा खरा... अमिताभ बच्चन
कोंदणामधला हिरा... अमिताभ बच्चन

सिलसिला, जंजीर, शक्ती, डॉन, शोले
करमणूकीचा झरा... अमिताभ बच्चन

अग्निपथ, दीवार, खाकी, ब्लॅक, आंखे
अभिनयाच्या सागरा... अमिताभ बच्चन

चोपडा, मनजी, मुखर्जी, मेहरांचा
फक्त एकच आसरा... अमिताभ बच्चन

तोल नात्यांचा घरी सांभाळतो जो
ऍशचा तो सासरा... अमिताभ बच्चन

कोणतीही चीज हातोहात खपते
अ‍ॅडमध्ये वापरा... अमिताभ बच्चन

स्क्रीन वर येताच बघ व्यापून उरतो
कोपरा अन कोपरा... अमिताभ बच्चन

खान, खन्ना, दत्त आवडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अमिताभ बच्चन

आले बघ किती किती स्टार बडे
आता बसतो का घरा... अमिताभ बच्चन

मिल्या सहीच. Happy कधी पाडलीस? मला एकदम 'जयश्री आहे ना' या जाहीरातीची आठवण झाली.

मिल्या, मस्तच ! मला एकदम भोंडल्याचं गाणं आठवलं Wink
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

वा वा...
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

अमिताभ बच्चन आणि त्याच्या करोडो पंख्यांना समर्पित.... मिल्या तुझा पंखा बिघडलाय का?

अमिताभ बच्चन आणि त्याच्या करोडो पंख्यांना समर्पित.... मिल्या तुझा पंखा बिघडलाय का? >>> का हो इंद्रदेवा असे विचारताय? Happy

झक्की : शुभ शुभ बोला की...

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

मला वाटले मेला बिलाक्काय?
---- चित्रपटात अनेक वेळा... शोले मधे मेलेला अमिताभ पुढच्या चित्रपटात कसा काय अवतरतो हा माझा अनेक दिवस अनुत्तरीत प्रश्न होता...

सही आहे. मिल्या कालच्या पुपुवरच्या आठवणींचा परिणाम का?

मिल्या एकदम करोडो पंख्याचा विचार केलास म्हणून तसे म्हंटले आहे रे... :d
झक्कींकडे अमिताभचा पंखा नस्सावा.... Proud

मिल्या खासच रे!
शेवट तर सहीच!
खान, खन्ना, दत्त आवडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अमिताभ बच्चन

कारकिर्दीची चाळीशी special का?

झक्की Happy
खरच शुभ शुभ बोलो

एक अमिताभ पंखा

धन्यवाद मंडळी...

पण एकंदर अमिताभचे पंखे फार नाहीत वाटते मा.बो. वर Sad

किंवा मी लिहिलेले आवडले नाही लोकांना असे दिसते Sad
-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

छान आहे ही कविता ...

मला निरमाची आणि फिनोलेक्स ची जाहिरात आठवली.. प्रत्येक कडव्यात निरमा आणि फिनोलेक्स पाईप वारंवार येतात... ही अमिताभ बच्चनची जाहिरात नाही ना :-)... मस्त आहे पण.. हटके .. Happy

मस्त..
बिग बी रॉक्स......
********** स्टाइल मे रहनेका !! ************

चिन्या१९८५ यांच्या मते मला अमिताभ बच्चन असल्यासारखी किंवा अमीरखान याच्या सारखी प्रसिद्धी दिली मायबोलीकरांनी. त्यांना ते मुळीच आवडले नाही! मला आवडले.

ह्म्म्म मिल्या आता याचेच विडंबनही कर Wink

*********************

आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो? Biggrin Wink

पण एकंदर अमिताभचे पंखे फार नाहीत वाटते मा.बो. वर
--- पंखे आहेत, फक्त त्यांची फिरण्याची गती कमी झाली आहे...

पण एकंदर अमिताभचे पंखे फार नाहीत वाटते मा.बो. वर

<<< मायबोली वर 'म न से ' चे लोक फार दिसतायेत Wink
********** स्टाइल मे रहनेका !! ************

एकदम पटेश रे मिल्या !
>> खान, खन्ना, दत्त आवडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अमिताभ बच्चन

क्या बात है !

एकीकडे अमिताभ बच्चनचा अ‍ॅंग्री यंग मॅन आणि एकीकडे अमोल पालेकरचा चम्याम्यान... या कात्रीत एक पिढी जे होलपटली ती रुळावर आलीच नाही.

हॉई! ही कविता वाचलीच नव्हती. छान सुटसुटीत आहे की. मी आहे अमिताभची पन्खा.

पण एकंदर अमिताभचे पंखे फार नाहीत वाटते मा.बो. वर अरेरे>>>..अमिताभ नामही काफी है.

किंवा मी लिहिलेले आवडले नाही लोकांना असे दिसते अरेरे>>>>> तुमच लिहीण उलट खडकाळ जमिनीतल्या झर्‍यासारख नितळ आणी आल्हाददायक असते.