तडका - भेटीचे अर्थ
भेटीचे अर्थ
कधी गुपित,कधी जाहिर
होत असतात भेटी
कधी घडल्या प्रसंगासह
भेटी राहतात ओठी
जस-जसे क्षेत्र बदलतील
तस-तसे तर्कही बदलतात
काळ-वेळ-ठिकाण पाहून
भेटीचे अर्थही ओघळतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
व्यक्तिमत्व
भेटीचे अर्थ
कधी गुपित,कधी जाहिर
होत असतात भेटी
कधी घडल्या प्रसंगासह
भेटी राहतात ओठी
जस-जसे क्षेत्र बदलतील
तस-तसे तर्कही बदलतात
काळ-वेळ-ठिकाण पाहून
भेटीचे अर्थही ओघळतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत.
आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल.
तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का?
मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह.
--------------------} नयन भावना {------------------
माझ्या नयनाची कामना,पुरेपुर होऊ दे
तुझ्या नयनात सखे,खोल खोल पाहू दे
भारावलो मी हरवलो,प्रेमात गं तुझ्या
शोधतो मलाच मी, नयनात गं तुझ्या
आठवणी या हूंदक्यात,मावेनात गं
जीर्ण जीर्ण झालो मी,तुझ्या प्रेमात गं
ऐकुनी ये तु सत्वरी,हाक ही जुनी
तुझ्या विना मनाची,काया हि उणी
नको देऊस सये,असह्य ती उपेक्षा
लयास जा तु घेऊनी,माझी ही प्रतिक्षा
मनामध्ये तुझ्या,मला तु सामावुन घे
जीवनात माझ्या,तु विना विलंब ये
आपल्या गं जगण्याला,देऊया ऊभारी
जिद्दीची एक दिमाखात,घेऊया भरारी
सखे तु न् डगमगता,हातात हात दे
चिंतेची बाब
काळाच्या ओघात
भलते चतुर झाले
ज्यांना मोठं केलं
तेच फितुर झाले
निव्वळ स्वार्थ
त्यांच्या डोक्यात आहे
इमानदारी सुध्दा
आता धोक्यात आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
शाळेत भारताचा इतिहास शिकलो पण उत्तर पूर्व राज्यांचा इतिहास, तिथले राजे ह्याबद्दल शिकल्याचं काही आठवत नाही. आसामच्या इतिहासाबद्दलची माहिती साधारण इ.स. चवथ्या शतकानंतरची उपलब्ध आहे. आसाममध्येही भारतातील इतर राज्याप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राज्यकर्त्या व योध्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या पण त्यांच्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही. अश्याच एका अपघाताने, बदलेच्या भावनेने बनलेल्या लढवैय्या स्त्रीची कहाणी.
कलाकारांनो
चित्र व्यंग असले तरी
हेतु वाकडे असु नयेत
कलाकारांचे विचारही
कधी तोकडे दिसु नयेत
त्यांच्या कलेमधून सदा
संदेश नेक दिसावेत
समाजातील कलाकार
आगलावे नसावेत,...
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचा स्वभावी बाणा
ऊगीच झोडायचं म्हणून
कुणालाही झोडत नाही
मात्र जो चुकेल त्याला
आम्ही कधी सोडत नाही
सदा निपक्ष,निर्भिडपणाने
लेखणीचा ताठ कणा आहे
सामाजिक जाण ठेवणारा
आमचा स्वभावी बाणा आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला अ की ठ कळतं नाही पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक असमीया स्त्रीच्या मनात तिच्या बद्दल अपार माया व श्रध्दा आहे. मनांत कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक दुकाने, वाचनालय शोधले पण कुठे काही साहित्य मिळेना .
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.