Law of attraction - आकर्षणाचे नियम

Submitted by केअशु on 10 October, 2016 - 05:37

Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत.

आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल.
तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का?

मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह.

हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या? तो केव्हा कशाप्रकारे अस्तित्वात येतो? काय तर्क आहे या आकर्षणाच्या नियमामागे? प्रभावीपणे वापरता येण्यासाठी काय करता येईल?
याबाबत इथे बोलता येईल.

काहीजणांची या विषयात बर्यापैकी प्रगतीही झाली असेल.आकर्षणाचा नियम हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भागही झाला असेल.अशा जाणकारांशी इथे चर्चा करता येईल.त्यांनी केलेले उपाय,केलेले प्रयोग याबाबत बोलता येईल.अनुभव सांगता येतील.

त्याशिवाय 'आकर्षणाचा नियम' या विषयावरचे या विषयाशी संबंधित असे लेख,पुस्तके,व्याख्याने,शिबीरे यांचीही माहिती देता येईल.

मनातल्या इच्छेपासून ते परिणामांपर्यंतचा प्रवास यशस्वी कसा करता येईल यासंबंधीचा संवाद इथे व्हावा;अशी अपेक्षा आहे.Law of attraction खरा की खोटा याची चर्चा इथे करता येणार नाही.

समुहात सामील होण्यासाठी इच्छुकांनी 'आकर्षणाचे नियमसाठी' असा व्यनि करुन किंवा माझ्या gmail वर संदेश व सोबत आपला WhatsApp क्रमांकही द्यावा.

विश्वास ही Law of attraction ची सुरुवात आहे.
जसा विश्वास तसं प्रत्यंतर.विश्वास ठेवून सकारात्मक कृती केली की हवी ती माणसं आपोआप भेटतात,हव्या त्या घटना आपोआप घडायला सुरुवात होते.

उद्याचा दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस.नकारात्मक विचारांना उल्लंघून सकारात्मक विचारउर्जेच्या क्षेत्रात प्रवेशासाठी हे आवाहन.

सर्वांना उद्याच्या दसर्याच्या शुभेच्छा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नाही वाटत फार कोणी आपले नंबर तुमच्याशी शेअर करायला उत्सुक असेल. शक्य असेल तर "मनातल्या इच्छेपासून ते परिणामांपर्यंतचा प्रवास यशस्वी कसा करता येईल यासंबंधीचा संवाद इथे व्हावा;अशी अपेक्षा आहे.Law of attraction खरा की खोटा याची चर्चा इथे करता येणार नाही." या विशेष पुर्वसुचनेसोबत (डिस्क्लेमर) इथेच चर्चा सुरु केली तर नाही का चालणार?

मला हि चर्चा इथे करायला मनापासून आवडेल.
परंतू तुमच्याशी किंवा इतर अनोळखी लोकांसोबत मी माझा नंबर आणि इतर डिटेल्स शेअर करू इच्छित नाही.
तुम्हीही इच्छुक नाहीये हे स्पष्ट आहे अन्यथा तुम्ही इथे स्वतःचा नंबर आणि इमेल आयडी दिला असतात.

असो.. हि चर्चा इथेच झाली तर आवडेल. बाकी तुमची मर्जी.

प्रत्येकालाच वाटतं आपण करोडपती व्हावं ,पण होतात का सगळे करोडपती? लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हा फ्रॉड प्रचार आहे .

पियु
तुम्हाला विपुमध्ये विनंती पाठवता येऊ शकते.
इथलाच http://www.maayboli.com/node/51752 हा धागा पहा. ट्रोलिंग मुळे मुळ विषय बाजुलाच राहिलाय.कशी करणार चर्चा?
Law of attraction म्हणतो.विश्वास ठेवा.शंका घेतल्या कि तसंच घडत जसा विचार कराल. असो.

प्रत्येकालाच वाटतं आपण करोडपती व्हावं ,पण होतात का सगळे करोडपती? लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हा फ्रॉड प्रचार आहे
>>>

मी हा लव ऑफ एट्रेक्शन नावाचा प्रकार पहिल्यांदाच ऐकतोय तरीही वरील वाक्याशी सहमत.

असे खरेच काही असते तर माझ्या आजवर किमान शंभर गर्लफ्रेंड असत्या Happy

बाकी हा नियम सर्वप्रथम शाहरूखने ओम शांती ओम मध्ये माण्डलेला तोच का हा?

कित्येकाना मायबोलीचे अ‍ॅट्रॅक्शन आहे ... पण अ‍ॅडमिन त्यांचे आयडी रिपेल करतात व ते आयडी उडतात.

I think its true..tumhi ek gosht milvaycha vichar karta...mg satat vichar kelyanantr tumhala kalate ki he praytn kelyanatr hi gosht milel...mazya babatit law of attraction 101% work zalay. Mi 4 years purvi darroz imagine karat hoto..tashich life ata jagat aahe. Bodybuilding chya babtithi he lagu hot..mi 2 years purvi asa asen ase imagine kart hoto..paratyek minitala..ani mi ti physique achieve keli

>> मनातल्या इच्छेपासून ते परिणामांपर्यंतचा प्रवास यशस्वी कसा करता येईल

म्हणजे वशीकरण विद्या का...?