भारत

प्रतिक जाधव

Submitted by प्रतिक जाधव on 22 January, 2014 - 00:45

मी कवी मनाचा आहे असे लोक म्हणतात,
मी तर फक्त मा़झे मन रिकामे करतो,
कविता जमली असा लोक उगाच आव आणतात.

विषय: 
प्रांत/गाव: 

जुने मराठी चित्रपट

Submitted by गुलमोहोर on 3 January, 2014 - 06:12

खूप दिवसापासून 'शापित' हा जुना मराठी चित्रपट शोधत आहे वेब वर पण मिळत नाही आहे.

'अरे संसार संसार' आणि अजून काही जुने चित्रपट शोधले पण काही Youtube ची गाणी मिळाली फक्त. दादर ला कदाचित चित्रपटांची DVD मिळेल पण आत्ता काही Online असेल तर नक्की सांगावे. मी TORRENT वर अजून शोधले नाही आहे , कोणाला माहित असेल तर सांगावे.

लहानपणी रविवारी संध्याकाळी हे मराठी चित्रपट एकत्र आई-बाबां बरोबर पाहण्याचे दिवस आठवत आहेत.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

तुम्हालाही आलाय का असा अनुभव?

Submitted by मुग्धटली on 7 December, 2013 - 02:34

गेल्या आठवड्यातील गोष्ट. घराच्या अगदी जवळ, ऑफिसच्या जाण्या-येण्याच्या रोजच्या वाटेवर आईबाबांच घर असुनही बरेच दिवस झाले त्यांना भेटले नव्हते. एका संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर गाडी घेउन मुख्य रस्त्याला लागल्यावर आतुन आवाज आला इथेच आई-बाबा आहेत जवळच कुठेतरी आणि नजर शोध घेउ लागली.

दोनच मिनिटाच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे तिथे आई-बाबा दिसले. परमानंद म्हणजे काय ते अनुभवायला तेवढा क्षण पुरेसा होता.

तुम्हालाही आलाय का असा अनुभव? असेल तर इथे नक्की शेअर करा.

टिपः- यात कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतु अथवा प्रसंगवर्णनात कोणतीही अतीशयोक्ती नाही.

विषय: 
प्रांत/गाव: 

मुद्दे आणी गुद्दे

Submitted by विजय देशमुख on 31 August, 2013 - 04:26

आजकाल बोलघेवड्यांची कमतरता नाही. अश्या काही मुद्यांवर आपले काही गुद्दे येऊ द्या.

एक माझाच :-

पंतप्रधान :- भारत १९९१ च्या परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे खंडन.

- अगदी बरोबर. परिस्थीती त्याहीपेक्षा वाईट आहे. १९९१ कडे वाटचाल, म्हणजे परिस्थितीत सुधारणा म्हणावी लागेल.

प्रांत/गाव: 

अतृप्त ठेवणारा झपाटलेला २

Submitted by टोच्या on 10 June, 2013 - 08:26

एखाद्या चमचमीत खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये जावे… आणि जेवणाच्या अपेक्षेने आलेल्या खवैयांना हॉटेल मालकाने केवळ उत्कृष्ट स्टार्टर देवून बोळवण करावी अशी काहीशी झपाटलेला २ ची गत आहे. खरं तर आधीच्या सिनेमाची (झपाटलेला ) पुण्याई आणि तात्या विंचू सारखा ब्रांड हाताशी असूनही महेश कोठारेंनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला जाणवत नाही. सिनेमाचे कथानक असे- वीस वर्षांपूर्वी इन्स्पे. महेश जाधव यांनी खात्मा केलेला तात्या विंचू हा बहुला एका संग्रहालयातून चोरी होतो.

विषय: 
प्रांत/गाव: 

शाळा चांदोबा गुरुजींची ( शाळेतल्या गमती जमती)

Submitted by किरण कुमार on 13 May, 2013 - 03:25

शाळेत इ.९ वीत असताना मला एक मुलगी मनापासून आवडायची, सहाजिकच तिच्या माग मागे फिरण व इतर ज्या गोष्टी करता येण्यासारख्या होत्या त्या मी करायचो जस कि माझा वर्ग सोडून तिचे लेक्चर अटेंड करणे खिडकीतून कटाक्ष टाकणे इ. पण तिच्याशी बोलायचे धाडस झाले नव्हते.
एकदा आमचा आणि तिचा पीटी तास एकत्र आला, मी एकटाच माझ्या वर्गात बसलो होते सर्व मुले ग्राऊंडवर खेळायला गेली एवढ्यात ती अचानक माझ्या वर्गात आली , वर्गामध्ये आम्ही दोघेच होतो माझी खर तर टरकली,

विषय: 
प्रांत/गाव: 

H1B Visa 2013

Submitted by शांत on 15 April, 2013 - 02:16

बघून जरा आश्चर्य वाटले ….
ह्या विषयावर विषयावर आपल्या मायबोलीवर कशी चर्चा नाहीये ते …
१) ८५ हजार विसा साठी ह्यावेळी १२४ हजार अप्लिकेशन्स
२) २००८ नंतर प्रथम "लॉटरी"
३) सर्वात विशेष म्हणजे USCIS ने ह्यावेळी अजूनही बरेच details दिले नहित… जसे की २०K साठी एकूण किती अप्लिकेशन्स आले आणि ६५ K साठी किती …

तर मित्रानो काय चालू आहे ह्यावेळी … इथेही काही राजकारण (I square act)???

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

पुण्यात पुकारलेला बंद!

Submitted by मी मधुरा on 6 April, 2013 - 10:43

१ तारखेपासून पुण्यात बंद पुकारण्यात आला आहे. हे नुसते एल.बी.टी. विरोधात नाही, तर व्यापाऱ्यांना हे दाखवून द्यायचे आहे कि सर्वसामान्य माणूस त्या लोकांवर अवलंबून आहे. हि कुटनीती आहे, असे माझे मत आहे.

प्रांत/गाव: 

प्रश्नोत्तरे

Submitted by मी मधुरा on 5 April, 2013 - 04:48

आपण अनेक सिनेमे आत्ता पर्यंत पहिलेले आहेत. काहींना आवडले; तर काहींना नाही...! पण मला सांगा कुठल्याप्रकाराचे सिनेमे तुम्हाला आवडतात? चला, पडताळून पाहण्या करता प्रश्नांची उत्तरे द्या.....

१. सिनेमात काय महत्वाच वाटत?

अ. कथानक
ब. कलाकार
क. दिग्दर्शन

२. कथानकात काय असायलाच हव?

अ. प्रेम कथा
ब. खलनायक आणि नायक यांतील वैर
क. एखाद्या विषयाची मांडणी

३. जास्त कशाचा प्रभाव पडतो?

अ. प्रकाश रचना
ब. कॅमेराचा प्रभाव
क. पार्श्व संगीताचा परिणाम

४. कोणता सिनेमा आधी पाहाल?

अ. मराठी
ब. हिंदी
क. इंग्रजी

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - भारत