माझे दुर्गभ्रमण

वाढदिवसाची आठवण …किल्ले कावनई आणि हर्षगड....!!!

Submitted by नवा भिडू on 24 June, 2015 - 05:50

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी ही वाढदिवस साजरा करण्यासाठी किल्ल्याची निवड करतच होतो. माझ्यासोबत आजवर अनेक वर्षे किल्लेभ्रमंती करत असलेल्या वासुदेव दळवी समोर विषय मांडला व कावनई आणि हर्षगडावर ( हरिहर ) शिक्कामोर्तब करण्यात आली. अगदीच गरजेच्या वस्तू ब्यागेत कोंबून वासू आणि मी ७ जुन २०१५ च्या सकाळी इगतपुरी गाठले. तिथून घोटी आणि घोटी वरून शेअर गाडीने आम्हाला कावनई गावात सोडले . मालवाहतुकीच्या गाड्यांनाच मागे दोन्ही बाजूला लाकडी फळी लावून ह्या गाड्या पुढचा १४ किमीचा खाचखळग्यातला प्रवास करत आपल्याला कावनई गावात सोडतात .

विषय: 

माळशेजचे सौंदर्य अर्थात ३००० फुटी भोजगिरीची कातळभिंत

Submitted by सूनटून्या on 28 May, 2015 - 05:33

माळशेजचे सौंदर्य अर्थात ३००० फुटी भोजगिरीची कातळभिंत

कल्याणपासून साधारण ९० किमी दूर कल्याण-नगर रस्त्यावर असलेला माळशेज घाट पावसाळ्यातल्या झिंगणाऱ्या खेकड्यांमुळे बराच कुप्रसिद्ध झाला असला तरी आमच्यासाठी मात्र हे दुर्दम्य इच्छाशक्तीचं तीर्थक्षेत्रच. माळशेज घाट म्हणजे डोंगर भटक्यांच्या उनाडक्या आणि पिकनिककरांसाठी पावसाळी 'ओली' सहल. या ओल्या सहली वाढल्यामुळे घाटात कचऱ्याच प्रमाण खूप वाढलं आहे. नाहीतरी माळशेज घाट विकणे आहे या धर्तीवर आपले निसर्गप्रेमी ''भ्रमंती''कर मिलिंद गुणाजी यांच्या जाहिराती फुटा-फुटावर आपल स्वागतच करतात. असो!

विषय: 

भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड

Submitted by सूनटून्या on 21 May, 2015 - 05:35

भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड

लोणावळ्यापासून विसेक किलोमीटरवर असलेल्या सालतर खिंडीच्या पलीकडे आहे एक अद्भुत विश्व. किल्ले घनगड, एखाद्या टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटप्रमाणे भासणाऱ्या तैलबैलच्या कातळ भिंती, या भिंतींच सौंदर्य निरखत तिच्याच पायाखाली विसावलेला सुधागड, निळेशार पाणी असलेला मुळशी धरणाचा जलाशय, भांबर्डे गावातील नवरा, नवरी आणि वऱ्हाड सुळके आणि त्यांना चोहोबाजूने आपल्या कवेत घेऊ पाहणारे उंचच उंच कडे, हा परिसर पाहताना अक्षरशः डोळयांच पारणं फिटते.

१.

विषय: 

भांबर्डे – नवरा, नवरी आणि वऱ्हाड

Submitted by सूनटून्या on 21 May, 2015 - 05:32

धागा दोन वेळेस पडल्याने delete केलेला आहे.

admin कृपया धागा delete करावा.

विषय: 

ढाक भैरीची प्रस्तरभिंत

Submitted by सूनटून्या on 9 January, 2015 - 06:52

ढाक आणि गिरीविराज हाईकर्सचा याराना तसा पुराना !

२५ मे १९८३ ला संजय लोकरे, किरण अडफडकर आणि सारंग अडफडकर यांनी रोपशिवायचं कळकराय सुळका सर केला होता.

विषय: 

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ३- अंतिम

Submitted by सूनटून्या on 18 November, 2014 - 06:36

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ३- अंतिम
============================================================================

७ डिसेंबर १९९१ :

विषय: 

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २

Submitted by सूनटून्या on 18 November, 2014 - 05:52

आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २........

३ डिसेंबर, १९९१ :

विषय: 

Pages

Subscribe to RSS - माझे दुर्गभ्रमण