चित्र बघा शब्द ओळखा
हा खेळ मी आणि माझ्या लेकीने यंदा ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी बनवला होता. दोन्ही फॅमिलीमध्ये ग्रूप पाडून खेळलो. हिट गेला. आता पुढच्या बड्डे पार्टीतही हा वा या प्रकारचे गेम्स खेळायचे ठरवले आहे. तरी ही काही चित्रकोडी मायबोलीवर सुद्धा टाईमपास म्हणून शेअर करतोय. ओळखा. सोबत शब्द / नाव नक्की कश्याचे आहे याची हिंट सुद्धा दिली आहे. तुमच्याकडेही अशी चित्रकोडी असतील तर शेअर करा. आमच्या पुढच्या पार्टीसाठी आणखी बनवली तर मी सुद्धा शेअर करेन.