रस्त्यात

तोल साधते मुक्याने...

Submitted by Nikhil. on 11 October, 2017 - 01:41

रस्त्यात खेळ चालतो
एका मळकट बाहुलीचा
अंगावर जीर्ण वस्त्रे
डोळ्यात दिसे निराशा

दोरीवरती नशिबाच्या
ती तोल साधते मुक्याने
हातातील स्वप्नांच्या काठिचाच
तिला खरा आधार आहे

धुळिने माखलेल्या चेहऱ्यावर
कल्पना, इंदिरेसम तेज भासते
सावित्रिच्या या लेकीला मात्र्
पोटासाठी हात पसरावे लागते

तिचे केविलवाणे रुप पाहुन
मन तेवढ्यापुरते हळवे होते
हातात काही रुपये ठेवुन
भावनाशुन्य् गर्दित सामिल होते.

Subscribe to RSS - रस्त्यात