तोल साधते मुक्याने...

Submitted by Nikhil. on 11 October, 2017 - 01:41

रस्त्यात खेळ चालतो
एका मळकट बाहुलीचा
अंगावर जीर्ण वस्त्रे
डोळ्यात दिसे निराशा

दोरीवरती नशिबाच्या
ती तोल साधते मुक्याने
हातातील स्वप्नांच्या काठिचाच
तिला खरा आधार आहे

धुळिने माखलेल्या चेहऱ्यावर
कल्पना, इंदिरेसम तेज भासते
सावित्रिच्या या लेकीला मात्र्
पोटासाठी हात पसरावे लागते

तिचे केविलवाणे रुप पाहुन
मन तेवढ्यापुरते हळवे होते
हातात काही रुपये ठेवुन
भावनाशुन्य् गर्दित सामिल होते.

Group content visibility: 
Use group defaults

तिचे केविलवाणे रुप पाहुन
मन तेवढ्यापुरते हळवे होते
हातात काही रुपये ठेवुन
भावनाशुन्य् गर्दित सामिल होते. >>> खरेयं

छान आहे कविता

सुंदर !!!

छान .. Happy
राहुलच्या सिग्नलच्या परी ची आठवण झाली..

छान लिहिलंय पंडितजी..
दोरीवरती नशिबाच्या
ती तोल साधते मुक्याने
हातातील स्वप्नांच्या काठिचाच
तिला खरा आधार आहे
>>> +१११
या दोन अर्थांच्या ओळी सुरेख लिहील्या आहेत..

कवितेचा अाशय केवळ ह्रद्य....
मांडणी अष्टाक्षरीत करता आली तर अजून उठाव येईल..
उदा.

मळकट बाहुलीचा
खेळ चालतो रस्त्यात
वस्त्रे अजीर्ण लेवून
दिसे उदास डोळ्यात

हे वैयक्तिक मत. कृपया गैरसमज करून घेऊ नये.
धन्यवाद. Happy

मांडणी अष्टाक्षरीत करता आली तर अजून उठाव येईल. >>खुप धन्यवाद शशांकजी आपल्या सुचनांचे स्वागत आहे. प्रयत्न करुन पाहतो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@अंबज्ञ @दत्तात्रय साळुंके @ मेघा. @र।हुल @ब्रह्मास्मि मनापासुन धन्यवाद सर्वांचे