Submitted by गणेश कुलकर्णी on 2 December, 2016 - 07:45
जिंदगी तुझा हा कसला खेळ आहे ?
कुणाचा कुणाला इथे मेळ आहे? || १||
मी निघालो तिला भेटायला आता असा
तिला कुठे मला भेटायला वेळ आहे? || २||
दु:खं केव्हाचे सोबत माझ्या जन्मल्यापासून
त्याच्यासाठी कवितेत एक राखीव ओळ आहे !|| ३||
ही तुझी सोसायटी, ही माझी सोसायटी...
सांग कुठे आता राहीले गल्ली बोळ आहे ? ||४||
मी माझे स्वच्छ मन घेऊन फिरतो 'समीप '...
पण मेंदूत चालतो कसला घोळ आहे ? || ५ ||
***************************
गणेश कुलकर्णी (समीप)
०८०५९९३२३६८
***************************
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान वाटली कविता. सोसायटी हा
छान वाटली कविता.
सोसायटी हा शब्द चाललाय म्हणा , पण दुसरा नव्हताच का ?
छान!!!!!!!!!!!!!!!!
छान!!!!!!!!!!!!!!!!
धन्यवाद..
धन्यवाद..
छान आहे कविता..............
छान आहे कविता..............