खेळ प्रीतीचा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 October, 2017 - 00:51

खेळ प्रीतीचा

तुझ्या माझ्या प्रीतीचा , खेळ असा रंगला
रातराणीचा गंध, बेधुंद जीव कसा दरवळला

सुमनांचे बाहुपाश , करीती दोघा वश
लाघवी सहवास , सहजी कैद झाला

बघ कसे फुलले असे, श्वास चांदण्यांचे
थेंब अमृताचा, अतृप्त अधरी साकाळला

सूर प्रीतीचा अबोल , अंतरात खोल, खोल
तन मन झंकारुन , नादब्रम्ह जाहला

लुटले मी तुला अन लुटले तू मला
तरीही अजून कसा , मरंद न सरला

फुटे तांबडे तरीही , चंद्र बघ फेसाळला
मंद मंद सुंगधित , पहाट वातही धुंदला

कोणाची ना हारजीत , जिंकेल इथे फक्त प्रीत
जळावर यमुनेच्याही , तरंग बघ उठला

तुझ्या माझ्या प्रीतीचा खेळ असा रंगला
रातराणीचा गंध, बेधुंद जीव कसा दरवळला

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

मेघाजी काव्य आणि शीर्षक आवडले खूप आभार !
अक्षयजी , VB आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादासाठी खूप धन्यवाद !