खेळ

या खेळावर!

Submitted by नीधप on 28 April, 2011 - 23:24

एक जुनाच शब्दखेळ
---------------------------
अर्थहीन सुरावटींना पाय फुटले,
रूणझुणत भिंगोरल्या त्या
याच्या कानावर,
त्याच्या बोटांमधे

आडवळणाची लय त्यांची
घुमघुमत उगवत गेली
तुझ्या गाभ्यावर
माझ्या मनावर

मनावर लयीचे लाखो धुमारे
सरसरत पेटत राह्यले
ह्या देहावर
त्या वळणावर

देहाची वळणे पाकळी पाकळी
रिमझिम कोरत गेली
इथल्या हवेवर
या घटीकेवर

जिथे तिथे बहरलेल्या सुरावटी
मंद मंद झुळकत बसल्या
या खेळावर
या अर्थावर

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मे महिन्याची सुट्टी आम्ही अशी घालवायचो ....

Submitted by मामी on 14 April, 2011 - 10:23

उन्हाळ्याच्या सुट्टीशी आपल्या कितीतरी छान आठवणी निगडीत असतात ना? मे महिन्याची सुट्टी म्हणजे आंबे, पत्ते, पापड-कुरडया, पाहुणे, गाव असे छानसे समिकरण असते. यातले काही घटक बदललेही असतील. तर मग, आपापल्या अनुभवातील, मनातील मे महिना इथे मांडूयात का?

विषय: 

मज्जाखेळ [३-५]: मोठे मणी ओवणे

Submitted by सावली on 7 December, 2010 - 19:34

हा खेळ तुम्ही समोर बसलेले असतानाच खेळायचा. नाहीतर चुकून मुलं तोंडात/नाकात टाकू शकतात. जर तुमचा मुलगा/ मुलगी सगळ्या गोष्टी अजूनही तोंडात घालून बघत असेल तर हा खेळ इतक्यात खेळू नका.

साहित्य:
मोठे आणि मोठ्या भोकाचे मणी.
खूप जाड दोरा. खूप मोठा नको. नाहीतर मुलं गळ्याभोवती गुंडाळून घेतात.

कृती:
- दोऱ्याच्या एका बाजूला एक मणी बांधून टाका म्हणजे ओवलेले मणी पडणार नाहीत.
- आणि मुलांना ओवायाला द्या.
- ओवता येत नसेल नीट, तर दोऱ्याच्या एका बाजूला फेव्हीकोल लावून जरा कडक करा.

अधिक टिपा:

शब्दखुणा: 

मज्जाखेळ [१-३]: बांगड्या /प्लास्टिक रिंग्स ओवणे

Submitted by सावली on 7 December, 2010 - 19:34

साहित्य:
छोट्या प्लास्टिकच्या बांगड्या / रिंग्स. तोंडात जाणार नाहीत इतक्या मोठ्या हव्यात.
न वापरलेली बुटाची लेस. १२ सेमी पेक्षा मोठी नको, नाहीतर मुलं गळ्याभोवती गुंडाळून घेतात.

कृती:

- लेसाच्या एका बाजूला एक बांगडी बांधून टाका म्हणजे ओवलेल्या बांगड्या पडणार नाहीत.
- आणि मुलांना ओवायाला द्या. लेस बाजूला ठणक असल्याने ओवणे सोपे जाते.
- यातच ओवाताना थोडे थोडे अंक मोजून दाखवता येतील.

शब्दखुणा: 

मज्जाखेळ [३-५]: रैना ने लिहिलेला खेळ

Submitted by सावली on 6 December, 2010 - 06:45

रैना ने दिलेला खेळ इथे वेगळा धागा करुन लिहित आहे

वयोगट: [३-५]

साहित्य: काटेचमचेसुर्‍यांचा सेट (घरात असतो तो) ४ काटे, ४ मोठे चमचे, ४ छोटे चमचे, चार सुर्‍या असा सेट असतो नेहमीचा.

कृती: पोरांना बसवून त्यांचे पॅटर्न्स करायला शिकवायचे. म्हणजे प्रत्येकी एक हा एक सेट, दोन काटे दोन चमचे हा दुसरा असे..

अधिक टिपा:

मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची पालकांनी दिलेली उत्तरे:
http://www.astro.caltech.edu/~aam/fun/set.html. हे आश्चिग यांनी सुचवले.

शब्दखुणा: 

मज्जाखेळ[३-५]: वाफेचे पाणी

Submitted by सावली on 5 December, 2010 - 21:43

जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.

वयोगट: [३-५]

साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा

कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.

मज्जाखेळ: खेळता खेळता गंमत

Submitted by सावली on 5 December, 2010 - 21:40

अभ्यास हा शाळेत शिकवण्याची आणि कंटाळा करण्याची गोष्ट आहे असा एक एकूण सूर दिसतो ना आपल्याकडे? बडबडगीते, बालगीते सुद्धा अभ्यासाला अगदी दुष्ट ठरवतात, शाळेला वाईट अस लेबल लावून टाकतात. आता एवढी नकारात्मक तयारी झाल्यावर बऱ्याच जणांचा शाळा आणि अभ्यास अगदी नावडीचा झाला तर काय नवल?

शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १२

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:58

संस्कारभारतीची मोठी रांगोळी, रांगोळीने काढलेली शिवाजी महाराजांची एखादी तसबीर, पाने-फुले, मणी वगैरे वापरून काढलेली सुबकशी रांगोळी यांची काढलेली छायाचित्रे हा आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - खेळ