SAP करावे की Data analysis करावे : सल्ला हवा आहे..

Submitted by अजय चव्हाण on 9 September, 2021 - 12:24

नमस्कार मायबोलीकरहो,

मी सध्या एका शिंपिंग एम एन सी मध्ये स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे पण एकंदरीत बदलांचे वारे पाहता पुढे जास्त स्कोप दिसत नाही.. सध्याची पोजिशन बघता काम तर टिम लीडर आणि प्रसंगी युजर म्हणूनच करायच असतं.. ना धड युजरमध्ये ना धड लिडरशीपमध्ये.. मधल्या मध्ये मरण होतय... बाहेर कुठे टिम लीडर म्हणून अप्लाय केलं तर ऑन पेपर टिम लीडरचा टॅगची रिक्वायरमेंट सांगतात आणि आमच्या प्रोसेस मध्ये टिम लीडर ही पोस्टच नाहीये स्पेशालिस्ट नंतर डायरेक्ट ए. एम . ची पोस्ट आहे आणि ती ही सहजासहजी मिळवता येईल असं वाटत नाही कारण ए. एम ऑलरेडी जास्त आहेत जे आहे त्यांनाच मूव्ह केलं जातयं आणि जरी व्हकेंट झालीच पोजिशन तर त्यासाठीही स्पर्धा जास्त आहे..एकंदरीत सगळच़ं कठीण दिसतय.. IJP हा प्रकार तर फक्त नावालाच असतो..दुसर्या डिपारटमेंटच्या लोकांना त्यासाठी प्राधान्यही दिलं जात़ं नाही आणि आमच्याकडे IJP निघतच नाही..

आणि मुख्य म्हणजे दुसरीकडे अप्लाय करायचं झालं तर सिनिअर म्हणून पण काम करायला तयार आहे पण सॅलरी ब्रकेट आडवं येतं आणि मी लाईनर ईडस्ट्री मध्ये काम करत असल्यामूळे Freight Forwarder, NOVCC, CHA तर लाईनरवाल्यांना उभंही करत नाही भले ही कॅलिबर असो किंवा नसो.. आणि ज्या लाईनर कंपन्या आहेत त्यातल्या काही बंद झाल्यात.. आणि ज्या आहेत त्या एकमेकांत मर्ज झाल्यात आणि कोस्ट कंटींगच्या नादात फक्त फ्रेशर घेतात आणि टिम लिडर तर बाहेरुन हायर करत नाहीत.. आमच्यासारख्या मधल्यांना कुठेच स्कोप नाही‌.. कधी कधी असं वाटतं कुठे झक मारली आणि हृया फिल्डमध्ये आलोय... कारण आठ वर्षाचा अनुभव व्यर्थ आहे..

म्हणून डोमेन चैंज करावसं वाटतय.. नविन भाषा शिकणं हा आधी पर्याय ठेवला होता पण बाकीच्याचे अनुभव पाहता ते करणं जास्त काही फायद्याचं दिसतं नाही..

आता सध्या दोन पर्याय मला तरी आहेत असं वाटतयं..

एक : तर SAP SD (Sales & DistrIbution) कोर्स करून
सुरुवातीला थोडं पॅकेज कॉम्प्रोमाईज करून कदाचित सध्या इतकं पॅकेजही मिळू शकत पण पुन्हा सुरुवात करावी आणि नंतर जम्प मारून पोजिशन ना सही पॅकेज तर मिळेल...तसंही SAP ला स्कोप आहे आणि त्याचं सॅलरी ब्रकेटही हाई असतं..

दोनः दुसरं म्हणजे Data Analysis चा कोर्स करून त्यात स्थिर व्हावं..कारण त्यातही स्कोप आहे आणि तस़ंही Analysis करण़ं हे माझं आवडत काम आहे इथेही Analysis चं काम आहे पण Data or technical संदर्भातलं नाहीये..

दोन्ही फिल्डमधल्या Institute शी संपर्क साधून थोडक्यात माहीती घेतली आहे‌‌..SAP ची प्लेसमेंट 100% मिळेल असं सांगण्यात आलय़ तर Data Analysis ची 50% चान्सेस प्लस Interview वर Depend आणि कितपत पारंगत झालोय ह्यावर अवलंबून आहे हे सांगण्यात आलयं..

तर जाणकरांनी किंवा जे ह्या फिल्डमध्ये कार्यरत आहे त्यांनी ह्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन करावे..ही माफक अपेक्षा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी पण थोडीफार अशीच परिस्थिती आहे सध्या. ज्या फिल्ड मध्ये आहे तिथे पुढे काहीच स्कोप दिसत नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, SAP मध्ये नव्याने करिअर करायचा विचार करतोय मी. माझ्या कलीगने सॅप कोर्स केला दोन वर्षांपूर्वी. ती आता पॅरिसला आहे. पगार पण घसघशीत घेते.

सॅप जास्त बरं वाटतंय पण पुण्यात जॉब कमी असतील.
तुमच्या आताच्या स्किलशी किती संबंधित आहे माहिती नाही, पण aws किंवा azure क्लाऊड सर्टिफिकेशन करून आर्किटेक्ट बनायला मार्केट स्कोप आहे.

मी एस ए पी मास्टर डाटा मध्ये काम करते. ( कामाचा एक भाग म्हणून) एस डी करा व मग एम डी एम पण शिकून घ्या.
तिथे अनंत कामे उपलब्ध असतात. मी सेल्स मध्ये हेड म्हणून काम केले मग लॅटर ल मूव्ह केले जेव्हा कंपनी एस ए पी गो लाइव्ह झाली २०१३ मध्ये व अनंत झीज सोसून ते शिकून घेतले पन्नाशीत. इट रिअली गेव्ह मी अनदर संधी व्हेन आय नीडेड इट.

सध्याचे हाय डिमांड कार्य प्रवाह हे ए आय मशीन लर्निन्ग आय ओटी( तितके भारी नाहीपण आहे) हे पण आहेत. पायथन प्रोग्रामिन्ग शिकून घ्या.
मला ह्यातले काहीच करायचे नाही. पण मी वाचून ठेवते काय कुठे चलले आहे ते. तुम्हाला करीअर साठी शुभेच्छा.

धीर सोडू नका व करीअर शिफ्ट होणार् आहे तर तशी सहा महिने वर्शाची आर्थिक तरतूद तटबंदी करून ठेवा. वहिनी नोकरी करत असतील तर त्यांना पण सहकार्य द्या म्हनजे काय एक इनकम स्ट्रीम चालू राहतो.

सॅप चे online कोर्सेस आहेत का? माहित असेल तर लिंक्स मिळतील का? कोणी सॅप ऑनलाईन कोर्से केला असेल तर अनुभव सांगितल्यास मदत होईल.

मी पण या बोटीतून जात आहे. पर्म जॉब असल्याने तोलामोला चा जॉब शोधत आहे.
करोनाचा बाऊ खूप कं. नी करून घेतला आहे, पण नवे प्रोजेक्ट सुरळी येत आहेत, नेहमीच्या शिलेदारांनी किती घाण केली तरी प्रमो. मिळत आहे त्यावरून आर्थिक फटका तरी निश्चित नाही पण पे कट, बेनीफीट कट, करियर ग्रोथ मुद्दम अवघड आहे असे चित्र केले आहे, पगार वाढ अक्षरशः नील....
नुकताच पॅकेज जसे हवे तसे विथ २०% हाईक आणि प्रोफाईल सध्याच्या कं. सारखे आणि थोडे इतर अ‍ॅडिशनल असे मिळाले आहे..
आताच्या कं. मधे ११ वर्ष स्विच न केल्याने हा निर्णय घेणं फार जड जातय, नवी कं. टिकेल का.. वगैरे प्रष्णं पडलेत Happy
(नवी कं. ३० वर्ष जुनी आहे तरी)

अजय, तुम्ही कोर्स करता करता आहात तिथेच राहिलात आणि कोर्स आटोपत आला की नव्या जॉब ला अप्लाय करणे असा विचार करत आहात ना?

उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व...

@ बोकलत तुमची मैत्रीण अजून संपर्कात आहे का?
असेल तर कदाचित तिला विचारून तिचा अनुभव आणि प्रत्यक्ष स्कोपविषयी जास्त जाणून घेता येईल..

@बन्या धन्यवाद.

@ अनू मी शक्यतो मुंबईतच जॉब करेन.. Data analysis च्या कोर्समध्ये basic azure असेल असं सांगण्यात आलयं पण त्याचा कितपत फायदा होईल ह्याची फार माहिती नाही.. तुम्हाला जर माहिती असेल तर द्यावी म्हणजे त्याचा सेपरेट कोर्स असेल तर त्याचाही विचार करता येईल..

@अमा थोडी तडजोड करायला रेडी आहे मी..सध्याची नोकरी चालू ठेऊनच कोर्स करायचा प्लान आहे.. कारण सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. SAP ची फी लाखाच्या घरात आहे पण तेवढं मॅनेज करू शकतो फक्त नंतर त्याचा फायदा होईल की नाही ह्याची माहिती घ्यावी म्हणून हा धागा..

@दिव्या मी ATOS ani VACS ह्या दोन संस्थाशी संपर्क केला होता.. दोन्हीकडे ऑनलाईन कोर्सेस पण उपलब्ध आहेत आणि ऑनलाईन करणार असालं तर फी पण कमी आहे ऑफलाईनपेक्षा..

@ शांत माणूस स्वतःच व्यवसाय करणं शक्य नाही..

@आशू :

अजय, तुम्ही कोर्स करता करता आहात तिथेच राहिलात आणि कोर्स आटोपत आला की नव्या जॉब ला अप्लाय करणे असा विचार करत आहात ना? >>>>

हो..सेम हाच विचार करतोय..

@जेम्स बॉण्ड : कुठल्या क्षेत्रासाठी म्हणताय..शिंपिंग की SAP.

बोकलत तुमची मैत्रीण अजून संपर्कात आहे का?
असेल तर कदाचित तिला विचारून तिचा अनुभव आणि प्रत्यक्ष स्कोपविषयी जास्त जाणून घेता येईल..>> हो ती अजूनही संपर्कात आहे. तिने atos मधून सॅप केलं होतं. 4.25 लाख फी होती तेव्हा. आता चांगलं पॅकेज आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिला लकिली तो जॉब मिळाला. तिच्यासोबत एक जण होता त्याला जॉब नाही मिळाला. तो पुन्हा जुना जॉब करायला गेला. आहे तो जॉब सोडून सॅप करायला नको आणि सुरवातीला या फिल्ड मध्ये जायचं म्हणजे पगारात थोडं कमी जास्त होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कोर्स घेणारे बोलतात की स्कोप आहे, 100% प्लेसमेंट देऊ पण ज्या कंपन्यांसोबत त्यांचा टाय अप असतो अशा कंपन्यांचे काही रुल्स असतात मुख्य म्हणजे मोठ्या कंपन्या आहेत त्या 3 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स असलेले कॅण्डीडेट शोधत असतात जर आपल्याला 7 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर चांगल्या कंपनीत जॉब इंटरव्ह्यू द्यायला मिळेल याची हमी नाही. पण तिच्यासोबत बोलून एकंदरीत जाणवलं की एकदा या फिल्डमध्ये एंट्री घेतली की पुढे लाईफ सेट आहे.

100% प्लेसमेंट हे मिथ असते.(कंसात ★ देऊन प्लेसमेंट असिस्टन्स लिहिलेले असते.)
डाटा अनालिटिक्स चा कोर्स 90 हजार फी वाला तो ना?नौकरी वर फिल्टर मारून आधी कंपनीज,नोकऱ्या बघा.त्या तुमच्या राहत्या जागेच्या जवळ/चांगल्या आहेत का?
नुसते अझुर/aws/गुगल क्लाऊड असेल तर शिकायची फी प्रत्यक्ष कोर्स 15000 आणि ऑनलाईन कोर्सेरा/उडेमी मॉड्युलस बहुतेक 2000-3000(उडेमी वर डिस्काउंट मध्ये 900 पण) असेल.
आधी उडेमी/कोर्सेरा/लिंडा(लिंकडीन लर्निंग) वर ऑनलाईन कोर्स करून, जारगनसशी थोडी ओळख झाल्यावर प्रत्यक्ष कोर्स करून पूर्ण आत्मविश्वास आल्यावर सर्टिफिकेशन ची 10000 फी भरा.(मी सांगते हे आकडे 2018 च्या अभ्यासानुसार आहेत, त्यामुळे बरेच इकडे तिकडे झालेले असू शकते.)
जो स्पेशल कोर्स करणार त्यात आधी थोडी आवड निर्माण होणे गरजेचे आहे.
मुळात मी म्हणेन की नौकरी वर स्वतःला जवळच्या/करियर ला भक्कम/आवडत्या कंपनीज फिल्टर मारून त्यांच्या जॉब ओपनिंग बघून त्यानुसार शिक्षण ठरवा. नौकरी आणि लिंकडीन वर एखाद्या ओपनिंग ला किती लोकांनी अप्लाय केले ते दिसते.त्यावरून डिमांड/सप्लाय चा नीट अंदाज येऊ शकतो.
(मला हल्ली स्वतःचीच लाज वाटू लागली आहे.मी फार इंग्लिश शब्द लिहितेय घाईत.)

आमच्या इथे cप्लस प्लस प्रोग्रामिंग मधून पूर्ण मार्ग बदलून क्लाऊड सर्टिफिकेशन करून चांगला जॉब मिळवलेले 2 जण आहेत.

@बोकलत तेच तर मला 7 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे..
आणि ती Institute वाली बोलतेय की, त्याने फारसा फरक पडणार नाही कारण Anyway तुम्हाला SAP Industry मध्ये फ्रेशर म्हणूनच consider करतील.. पण तुम्हाला सध्या आहे तेवढं पॅकेज नाही मिळालं तरी जास्त तफावत नाही येणार कदाचित आहे तेवढ़ पॅकेजदेखिल मिळू शकतं.. एक दोन वर्षे अनुभव घेऊन तुम्ही नंतर स्विच करु शकता तेव्हा तुम्हाला डिसेंट हाईक मिळू शकते...वैगेरे वैगेरे अर्थात टारगेट असेल तिचं म्हणून ती any how मला convience करायचा प्रयत्न करत असेल पण रिआयटी मध्ये काय होईल ह्याची श्वाशती नाही. म्हणून जे लोक आहेत त्यांना मार्केटमध्ये काय चाललय हे जास्त चांगल माहीत असेल..‌‌ हेच जाणून घ्यायचयं..कारण वेळ आणि पैसा दोन्ही Invest करणार आहोत.. worthy असेल तर करायला हरकत नाही..

@ अनू हो पण ती फी मास्टर प्रोग्रामसाठी आहे..सहा महिन्याचा पण कोर्स आहे त्याची फी कमी आहे 60000 आहे काहीतरी...सहा महीन्याच्या कोर्ससाठी खालील syllabus आहे..

IMG_20210917_184918.jpgIMG_20210917_184934.jpg

ह्यामध्ये Azure ani Java बेसिक शिकवणार आहेत..बाकी सेल्फ स्टडी मटेरिअल प्रोवाईड करतील जर बेसिक पेक्षा जास्त शिकायच असेल तर..

आणि राहीला प्रश्न LinkdIn naukari shine ह्या Apps वर मी कमालीचा सक्रीय आहे.. पण आतापर्यत खुप ठिकाणी अप्लाय पण केलं पण कॉल येत नाही चुकून एक दोन कॉल येतात इंटरव्ह्यू होतो मग शेवटी Will let you know हे HR च फेवरेट वाक्य ऐकावं लागतं...And basically ह्यावर Apps वर तेवढेच जॉब सक्रीय नसतातच नुकताच एक लेख वाचण्यात आला होता..हे App वाले कसे डेटा कलेक्ट करतात आणि फेक Openings generate करून कसे लोकांना आपल्याकडे रजिस्टर करायला भाग पाडतात..हे सगळं त्यात विस्ताराने नमूद केले होते..

App तर App कंपन्या पण Manipulate करतात..एक खुप मोठी कंपनी आहे नाव नाही सांगता येणार पण त्यांनी त्यांची पूर्ण hiring प्रोसेस automated केली आणि त्याच्या टेस्टिंगसाठी हजारोने वेगवेगळ्या फिल्डमध्ये फेक ऑपनिंग्स जेंनरेट केल्या..

एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल ला एक एक मॉड्युल म्हणून टाकलेलं पाहून मनात चिडचिड झाली आहे.
कोर्स चे फीडबॅक घ्या.फेसबुक/कोरा/माऊथशट वर या विशिष्ट इन्स्टिट्यूट चे, त्यांच्या फॅकल्टी चे रिव्ह्यू वाचून घ्या.
मी हे असे ब्लॅंकेट कोर्स केले आहेत.केल्यावर वाटलं की आपल्याला जे विषय महत्वाचे वाटतात ते यांनी गुंडाळून बेसिक बेसिक गोष्टी जास्त काथ्याकूट करून शिकवल्या आहेत.त्या नोकरीत प्रत्यक्ष उपयोगी पडणार नाहीयेत.त्याच्या बऱ्याच पुढे जाऊन स्वतः व्यासंग करण्याची गरज भासणार आहे.

कोर्स मध्ये रिसेप्शन वर बसणारा कौंसेलर हा प्राणी किंवा प्राणीण असते त्यांचे म्हणणे कोर्स च्या दारातून बाहेर आल्यावर सोडून द्या.लिंकडीन वर त्या स्किल वाल्या नोकऱ्या करणाऱ्या माणसांशी कनेक्ट करा.योग्य शिकायचा चॅनल कोणता याबद्दल मतं घ्या.

(मला स्वतःला अजूनही असं वाटतं की टेब्लाऊ/आर/पायथॉन या भाषा नीट वेगवेगळ्या शिकाव्या.त्यांची व्याप्ती जास्त मोठी आहे.)

लिंकडीन वर खऱ्या नोकऱ्या मिळतात, कॉल्स येतात.पण काही ऑनसाईट/खूप मोठ्या पोस्ट फक्त नियम म्हणून जाहिरात ठेवून इंटर्नल ओळखीतून चांगला माणूस मिळवतात.पण मिड सिनियर पोस्ट साठी लिंकडीन सारखा चांगला चॅनल नाही.

@अजय चव्हाणः

मी एसएपी या इआरपी प्लॅटफॉर्मवर काम करत नसलो तरी त्यांचा जो सर्वात मोठा स्पर्धक आहे ओरॅकल त्याच्या इआरपी इकोसिस्टममध्ये गेली १५+ वर्षे काम करत आहे. मी आजवर एकही कर्मचारी फक्त ओरॅकलचा कोर्स केला आहे म्हणून नोकरीवर घेतलेला नाही. सहसा शून्य अनुभव (फ्रेशर्स) हे कॉलेजांमधून नोकरीवर घेतले जातात. त्यांना कंपनीत गरज असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग देऊन (टेक्नॉलॉजी म्हणजे एसएपी की ओरॅकल की इन्फोर वगैरे आणि मोड्युल जसे मॅनुफॅक्चरिंग, प्लॅनिंग, फायनान्स, लॉजिस्टिक्स वगैरे) प्रोजेक्टमध्ये घेतले जाते.
प्लॅटफॉर्मचा काहिही अनुभव नाही पण जर इन्डस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव असेल तर अश्याही लोकांना नोकरीत घेतात थोड्या सिनिअर (म्हणजे अगदी फ्रेशर नाही, जरा वर). त्यांच्या डोमेन नॉलेजचा फायदा होतो. उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बायर म्हणून काम केलेला, प्लॅनिंगचा अनुभव असलेला मनुष्य एसएपी/ओरॅकल सारखा प्लॅटफॉर्म पटकन समजून घेऊ शकतो. त्याला कस्टमरच्या बिझनेस प्रोसेस कळायला जुन्या अनुभवाचा फायदा होतो.

छोट्या छोट्या कंपन्यात असे कोर्सेस करुन तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अश्या कंपन्या या बरेचदा दुसर्‍या मोठ्या/मध्यम आयटी कंपन्यांना प्रोजेक्टनुसार माणसे पुरवतात. किंवा काही कस्टमर कंपन्या असतात जिथे इआरपी इम्प्लिमेंटेशन वा सपोर्ट हा त्यांचे स्वत:चे आयटी डिपार्टमेंट करत असते. अश्या कंपन्यांनाही माणसे पुरवली जातात.

या अनुभवांचा पुढे नोकरीत किती फायदा होतो माहिती नाही. मी वरती लिहिल्याप्रमाणे मी १५ वर्षात एकही असा कोर्स केलेला मनुष्य नोकरीवर घेतलेला नाही.

खूप पैसे भरण्याआधी ज्यांना असे कोर्स करुन नोकरी मिळाली आहे अश्या किमान २-४ जणांना प्रत्यक्ष बोलून मग ठरवा असा प्रामाणिक सल्ला मी देईन.

मी पण पूर्ण एस ए पी एम डी एम असेच काम करत करतच शिकले कोणताच कोर्स केलेला नाही. आता ९ वर्शाचा अनुभव आहे. त्या वर आता पुढे फ्रीलान्स प्रॉजेक्ट घेता येतील .

SAP ची प्लेसमेंट 100% मिळेल असं सांगण्यात आलय़ >> भारतात काय चालतं माहित नाही पण अमेरिकेतल्या देसी कन्सल्टंसी मधे १००% प्लेसमेंट म्हणजे एक तर ते तुमचा fake resume बनवून background check कव्हर करतात किंवा lip syncing करून online interview crack करून देतात .. त्यामुळे आधीच सगळी माहिती व्यवस्थित मिळवा आणि पुढे जा.

Data analytics चा विचार करत असाल तर Scrum master आणि servicenow business analyst (performance analytics) सारख्या कोर्सेसचीही माहिती मिळवा.

डाटा अ‍ॅनालिटिक्स मध्ये इथे मास्टर्स करु शकाल का ? दोघजणां ना हायर केल गेल्या वर्षात. जीमॅटचा स्कोअर हाय नव्हता.
एकाला ईएडी संपल्या वर H1 जॉब दुसरी कडे मिळाला. एकजण़ कॅनडाला गेला.

If you are planning to do career in SAP then

- you should have prior sap knowledge and experience.
- if you have zero knowledge then you should have certification. Ofcourse having certification is no guarantee to job. Nobody offers job just because of certification, your strong domain knowledge comes handy in such case. Certification is just added bonus.

In your case you have no knowledge or experience of SAP so certification is one way of entering the industry. People offering courses for 1 lakh are all private institutions where the faculty come to make extra money while they are looking for jobs elsewhere.. so you end up getting more than one faculty for same course and need to adjust to each ones teaching style. Authorised SAP Partners charge minimum 4 lakh for one month. Certification exam is your responsibility in both types but atleast SAP Partners offer you to use their systems for sometime after course completion so that you can practice and keep in touch with technology.

In SAP, ECC 6 is now fast becoming past. S/4 HANA is the future. SAP said in past that they will stop supporting ECC by 2025 but many believe that they may extend support for further 10 years. Most consulting companies ask for SAP S/4 HANA in interviews. Good candidates sometimes get rejected due to no HANA exposure. Industry with in house SAP Teams with no HANA plans in near future consider ECC candidates.

Private SAP tutors will give you whatever training that you want but authorised training centres insist on ECC knowledge before they offer S/4HANA which is actually correct. In S/4 HANA, it is assumed that you know ECC.

Above is general data. Coming to your question,
you can enter as fresher only since you have no prior knowledge or SAP experience. Your domain knowledge plays very important role here. If you have in depth knowledge of your domain, then you can understand client requirement better/faster and build better systems and this will be a plus point for you. Most clients go for in house Z develoment where your excellent domain knowledge plays important role.

Age may play a role here.. Managers may not like person in late thirties to join the team as fresher because freshers are treated bit roughly by managers. Ofcourse this is what I have seen, I cannot generalise based on my experience. (I dont know your age, so ignore this..)

Even if you join as fresher, you can excel in a short period based on your willingness to learn more about your module as well as other modules and your excellent domain knowledge.

IT Industry is like घी देखा पर बडगा नही देखा‘. You can climb faster in career if you are good, you get good money. But if you are working in consulting, then your personal life goes for a toss.. you are tied to the timelines 24x7 and at times this can give heartaches and headaches . One weak link in the project chain can hamper the project delivery and the weak link suffers badly because this affects the revenue generation of your company.

Life will be bit better if you join large corporates who have in house SAP teams to cater to their own system needs. But here growth opportunities will be limited.

So select wisely. All the best to you!

@जेम्स बॉण्ड : कुठल्या क्षेत्रासाठी म्हणताय..शिंपिंग की SAP.
शिपींग, लाईनर

साधना
अगदी पटलं.असंच काही लिहायचं होतं.

मी माझ्या फ्रेशरकाळात प्रसिध्द असलेला एक कोर्स बँक चं लोन घेऊन केला होता.आता जसं डाटा सायन्स चं आहे तसं त्यावेळी हा कोर्स ऑफर करणाऱ्या, एकमेकांचे स्टुडंट पळवणाऱ्या,मुद्दाम अमक्या इन्स्टिट्यूट च्या एन्ट्रन्स च्या आधी 1 दिवस आपली एन्ट्रन्स ठेवणाऱ्या बऱ्याच इन्स्टिट्यूट पुण्यात होत्या.फी साधारण 45000 ते 50000 च्या आसपास.(त्यावेळी सॅप चे कोर्स 1 लाखाला होते.पण अर्थातच पब्लिक कडे 1 लाख इझीली नसत.)

मी हा कोर्स केला.त्याने दिलेल्या झायलिंक्स कंपायलर, थोडं प्रोग्रामिंग या बेसिस वर नोकरी पण मिळाली.पण ती मी इन्स्टिट्यूट चं इंटरनेट वापरून, टाइम्स ची असेंट पुरवणी वाचून,रोज किमान 10 कंपनीज ना cv टाकून स्वतः मिळवली होती.त्यात कोर्स चा भाग खूप कमी होता.

अजय आपल्याला लवकर मार्ग सापडो ही शुभेच्छा.
अशी करीयरमधील भिंत मी अनुभवलेली आहे. फ्रस्ट्रेटिंग असते. फ्रस्ट्रेटिंग का तर आपल्याला धीर धरवत नाही. श्रद्धा और सबुरीसे काम लिजिये|

वर बर्‍याचदा डोमेन नॉलेजचा उल्लेख आलेला आहे. आय्टित काम करणार्‍या किती जणांनी डोमेन नॉलेज आधी घेउन नंतर प्रवेश केला आहे? असो.

तुमचं बॅग्राउंड आय्टि (टेक्निकल) असेल तर तुमचा स्वीट स्पॉट काय आहे ते आधी ठरवा. तुम्ही स्पेशलिस्ट आहात यावरुन काहि क्लियर होत नाहि. आय्बिएम मधे स्पेशलिस्ट बिझनेस अनॅलिस्ट असतात, कॅपमधे इंफ्रा वाले, तर डिलॉय्ट मधे कोडर. तुमचे टेक्नालजीचे फंडे स्ट्राँग असतील आणि एसएपी मधेच पुढे करियर करायचं असेल तर बेसीस, एबॅप, हाना स्टुडियो इ. वर हात मारा. ते स्किल डोमेन अ‍ॅग्नास्टिक आहे...

@ अनू - एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल ला एक एक मॉड्युल म्हणून टाकलेलं पाहून मनात चिडचिड झाली आहे. कोर्स चे फीडबॅक घ्या.फेसबुक/कोरा/माऊथशट वर या विशिष्ट इन्स्टिट्यूट चे, त्यांच्या फॅकल्टी चे रिव्ह्यू वाचून घ्या.>>>

हो मी पण हेच विचारलं होतं की, ऍडव्हान्स एक्सेल ची गरज नाही त्याऐवजी दुसरं काहीतरी शिकवा तर म्हणाले हा सिलाबसचा भाग आहे तुम्हाला आधीच येत असेल तर well and good.. तुम्ही तोच वेळ दुसर्या विषयावर जास्त लक्ष देण्यात वापरा‌... आणि तसंही ती संस्था इतकी खास नाही नुसतीच शो शायनिंग.. तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे LinkedIn वर एकाचा सल्ला घेतला तर त्याच म्हणणं आहे की, कोर्स केल्यानंतर लगेच जॉब लागणार नाही‌‌ आणि लागला तरी पॅकेज मिळण्याची शक्यता कमी आहे..

@टवणे सर - बरोबर आहे तुमचं.. जिथे ऑलरेडी सेट झालयं तिथे कोर्स केलेल्या उमेदवाराची गरज नसते.. आणि लिमिटेड मोड्यूल लाईक CRM असेल तर कंन्सलटन्ट ची फार गरज भासत नाही पण काही कंपन्या फक्त कोर्स वाल्यांनाच प्राधान्य देतात हे ही तितकचं खरं आहे आणि एकाशी बोलणं झालं आहे माझं तर त्याने सांगितलं की, बिनधास्त करा पण लगेच जॉब मिळेल ही अपेक्षा ठेवू नका पण एकदा मिळाला आणि अनुभव घेतला तर मग पुढे स्कोप आहे‌‌..त्याला स्वतःला ज्या संस्थेतून त्याने कोर्स केला तिथुन प्लेसमेंट नाही मिळाली त्याने स्वतः प्रयत्न करून जॉब मिळवला आणि लकही मॅटर करत हे पण तो बोलला कारण कोर्स केल्यानंतर सहा महीने त्याला जॉबच मिळाला नाही..

@म्हाळसा इथे काय होत त्याची आयडिया नाही पण रिझ्युम अपडेट किंवा modify करून परत मॉक इंटरव्ह्यू घेऊन तयारी करुन घेतली जाते..

Data analytics चा विचार करत असाल तर Scrum master आणि servicenow business analyst (performance analytics) सारख्या कोर्सेसचीही माहिती मिळवा.>>

ठिक आहे बघतो माहिती काढून‌‌..

@ सीमा - डाटा अ‍ॅनालिटिक्स मध्ये इथे मास्टर्स करु शकाल का ? दोघजणां ना हायर केल गेल्या वर्षात. जीमॅटचा स्कोअर हाय नव्हता.
एकाला ईएडी संपल्या वर H1 जॉब दुसरी कडे मिळाला. एकजण़ कॅनडाला गेला>>>>>>

हो करू शकतो पण बेसिक आयडिया यावी आणि मूळात मला जमतयं का हे जाणून घेण्यासाठीच सहा महिन्याचा कोर्स आधी करुन पाहणार होतो..

@ साधना : First of all big thanks for your valuable suggestion. I do have domain experience like if you ask about sales and distribution then YES. I know how its processed. I am Not an expert but i knew many things..

IT Industry is like घी देखा पर बडगा नही देखा‘. You can climb faster in career if you are good, you get good money. But if you are working in consulting, then your personal life goes for a toss.. you are tied to the timelines 24x7 and at times this can give heartaches and headaches . >>>>

Thats true.. पण सगळीकडे असचं आहे.. आताही आहे तिथेही मी compramise करतोय पण इन रिटर्न काहीतरी मिळालं पाहीजे.. एवढच़ं माझं मत आहे..

@ जेम्स बॉण्ड : तुमचा ईमेल आयडी द्या किंवा संपर्क करा मी रिझ्युमे पाठवतो..

@ राज:

तुमचं बॅग्राउंड आय्टि (टेक्निकल) असेल तर तुमचा स्वीट स्पॉट काय आहे ते आधी ठरवा. तुम्ही स्पेशलिस्ट आहात यावरुन काहि क्लियर होत नाहि. आय्बिएम मधे स्पेशलिस्ट बिझनेस अनॅलिस्ट असतात, कॅपमधे इंफ्रा वाले, तर डिलॉय्ट मधे कोडर. तुमचे टेक्नालजीचे फंडे स्ट्राँग असतील आणि एसएपी मधेच पुढे करियर करायचं असेल तर बेसीस, एबॅप, हाना स्टुडियो इ. वर हात मारा. ते स्किल डोमेन अ‍ॅग्नास्टिक आहे... >>>>

नाही आयटीच काही बॅकग्राउंड नाही..

सगळ्यांनी छान सल्ले दिले आहेत काहींनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद..

एक मध्यम मार्ग काढला आहे म्हणजे SAP करायचं जवळ जवळ ठरलं आहे..
पण कुठेही Admission न घेता सेल्फ स्टडी करायची..तस़ही यु ट्यूब वर ट्रेनिंग मटेरिअल अव्हेलेबल आहेच फक्त एक्झाम साठी एखाद्या संस्थेला अप्रोच करायचं..मित्राच्या मित्राने Atos ला विचारल़ होतं..ते चालेल म्हणाले होते फक्त Exame आणि जी काही प्रोपटी वापरू त्याचे चार्जेस फक्त पे करायचे..म्हणजे निम्मी फी तर कमी होईल..

Pages