डुक्कर आणि कोंबडी

Submitted by सामो on 3 September, 2021 - 17:06

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर concept आहे. ही concept मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.

कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.

एका शेतकर्‍याकडे, त्याच्या मळ्यावर एक डुक्कर व एक कोंबडी होती. या दोघांनाही आपल्या मालकबद्दल अतोनात प्रेम आणि आदर होता. दोघांच्याही मनात मालकासाठी काहीतरी चांगले करावे अशी इच्छा होती.
एकदा कोंबडी डुकराकडे आली व म्हणाली - "मला एक सुरेख कल्पना सुचली आहे. तू जर ती मान्य केलीस तर मालकाकरता आपण काहीतरी मस्त करू शकू." डुकराने पृच्छा केली "काय?" तेव्हा कोंबडी म्हणाली - "मालकाला नाश्त आवडतो पण बिचार्‍याकरता वेळ नसतो तेव्हा आपण दोघांनी मिळून उद्या त्याच्याकरता नाश्ता बनवायचा का?" डुकराला ही कल्पना रुचली. तेम्हणाले "जरूर. काय बनवू यात बरे?" कोंबडी म्हणाली - "हे बघ मी नाश्त्याकरता अंडी देऊ शकेन. तू ham देशील का? बघ बुवा आपण मस्त ham- अंड्यांचा नाश्ता मालकाला देऊ"
यावर विचार करून डुक्कर म्हणाले - "नाश्त्यामध्ये तुझा फक्त सहभाग आहे. माझे तर सर्वस्व पणाला लागते आहे."

प्रकल्प व्यवस्थापनामध्ये देखील काही लोक हे डुकरासारखे संपूर्ण committed असतात. प्रकल्प चालणे अथवा न चालणे हे त्यांच्या करता तारक अथवा मारक ठरते तर दुसर्‍या प्रकारचे म्हणजे कोंबडी प्रकारचे लोक हे committed नसतात तर त्यांचा फक्त प्रकल्पामध्ये सहभाग असतो.

स्रोत - https://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मालकाला नाश्त आवडतो पण बिचार्‍याकरता वेळ नसतो तेव्हा आपण दोघांनी मिळून उद्या त्याच्याकरता नाश्ता बनवायचा का?">> म्हणजे टीम
आपण हून काय प्रॉजेक्ट आहे तो स्वतः ला असाइन करून घेते का?! हे जनर्ली नसते प्रॉजेक्ट आस्थापनाच्या गरजे नुसा र निर्माण होतात व काहींसाठी ते ओन्ड व महत्वाचे असतात तर काहींचा फक्त क्रिटिकल सहभाग आवश्यक असतो. तिथे उभे राहून सर्व प्रॉजेक्ट उभे राहुन एक्सिक्यु ट करायची गरजच नसते.

नाही अमा ते फक्त गोष्टीत आहे. म्हणजे तशी परिस्थिती कॄत्रिम रीत्या निर्माण केली आहे. बरोबर आहे - टीम नाही असाइन करुन घेत, प्रॉजेक्ट. या उदाहरणातून फक्त स्टेक होल्डर्स्चा वरचष्मा खरे तर कमिटमेन्टचे प्रकार लक्षात येतात.

अमा- कोंबडी म्हणजे प्रोजेक्त मॅनेजर/ scrum मास्टर ... तो फक्त जिरा कार्ड ओपन करतो, डेडलाईन देतो...डेव्हलपर/टेस्टर बाकी सगळे काम जीव ओतून...

प्रकल्पातील डुकराला मोबदलाही तसा मिळतो. कोंबडीला मिळत नाही.

आता बहुतेकांना आपण डुक्कर तरीही काही मिळत नाही, बाकी कोंबड्या त्यांना मात्र मिळते असे वाटत असते ही गोष्ट वेगळी.

सहमत, आयटी वाले स्वतः ला वेगळ्याच जगात समजत असतात.
लाखो आणि करोडोची पॅकेज घेऊनही स्वतःला हमाल वेग्रे म्हणवणे.
इतके पैसे मिळतायेत तर काहीतरी काम करावेच लागेल की, बाहेर इतर क्षेत्रात ( आमच्यासारखे मॅकँनिकल विंजीनर) फ्लोअरवर काम करुन बघा एकदा तेव्हा समजेल काय असते हमाली

प्रकल्पातील डुकराला मोबदलाही तसा मिळतो. कोंबडीला मिळत नाही.
>> गेले ते दिवस... आता डुकरपेक्षा जास्त कोंबडीला मिळायला लागले आहेत... आयटी मध्ये तरी...

बन्या... कामगार तो कामगारच..आयटी वाले एसी मध्ये बसून पाट्या टाकतात तुम्ही फ्लोर वर... पण काम सेमच...

च का काय ते, या फ्लोवर एकदा एकत्र पाट्या टाकु, निदान करोडो ची पॅकेजेस न मिळताही आम्ही रडत बसत नाही आयटी वाल्यांसारखे

आयटी वाल्यांबद्दल तुमचे निरीक्षण पार्शियली बरोबर आहे बन्या.
अतिशय भरपूर पैसे मिळून दिवसभरात 3 मीटिंग करून दुसऱ्याने बनवलेल्या डॉक्युमेंट मध्ये आपल्या 4 ओळी लिहून आपले पण नाव टाकणारे लोक पाहिलेत, तसेच अगदी कमी पैशात दिवसाचे 11 तास राबून काम करणारे,गावाकडे सर्व शेतकरी कुटुंब असलेले, पैसे वाचवून वाचवून घरी पाठवणारे फ्रेशर्सही पाहिलेत.

आपण महिन्याला किती पैसे घेतो, त्या बदल्यात कंपनीला काय व्हॅल्यू देतो, आपली ध्येये कंपनी चा बिझनेस वाढवायला काही कारणाने उपयोगी पाडता येतील का याचा हल्ली सतत विचार चालू असतो.

@मानव - अगदी खरे. प्रत्येक जण समजतो/ते आपणच डुक्कर आहोत Happy
>>>>प्रकल्पातील डुकराला मोबदलाही तसा मिळतो. कोंबडीला मिळत नाही.
हे सुद्धा किती खरे आहे.
--------------------------------------
@बन्या
>>>>>आयटी वाले स्वतः ला वेगळ्याच जगात समजत असतात.
लाखो आणि करोडोची पॅकेज घेऊनही स्वतःला हमाल वेग्रे म्हणवणे.

आय टी वाल्यांना इतर व्यवसायांच्या तुलनेत अधिक आराम असतो हेही खरे आहे.
-----------------------------------
@अनु
>>>>>>दिवसाचे 11 तास राबून काम करणारे,गावाकडे सर्व शेतकरी कुटुंब असलेले, पैसे वाचवून वाचवून घरी पाठवणारे फ्रेशर्सही पाहिलेत.
हे खरे आहे. फ्रेशर्स 'अनकन्टॅमिनेटेड' असतात त्यामुळे अजुन निर्ढावलेले नसतात Happy

तुमचा जॉब हाय प्रोफाइल वाटतो मला. तुम्ही इन्टर्व्ह्युही घेता मला वाटतं. कौतुकास्पद आहे.

ओके टाईप्स आहे Happy
मला 'तुम्ही' म्हणण्या इतकं कर्तृत्व नाहीये.
फार हाय प्रोफाइल जॉब वगैरे नाही(या गैरसमजाबद्दल मनात बरीच विनोदी वाक्यां आली होती ती डिलीट केली Happy लिहीन कधीतरी यावर).
इंटरव्ह्यू घेते मात्र.आवडतं.साधारण 6-7 वर्षे एकाच फिल्ड मध्ये काम केलेला कोणीही माणूस इंटरव्ह्यू घेतो.
बरेचदा एका इंटरव्ह्यू मध्ये ज्याने कँडीडेट कडून किमान 4-5 वर्षं टिकण्याच्या आणाभाका घेतो तोच हा कँडीडेट जॉईन झाल्यावर एका महिन्यात लास्ट डे चे मेल टाकतो. इंटरव्ह्यू घेणे आणि देणे हा अति विनोदी प्रकार आहे.

>>>>>>या गैरसमजाबद्दल मनात बरीच विनोदी वाक्यां आली होती ती डिलीट केली Happy लिहीन कधीतरी यावर
नक्की लिही Happy

>>>>किमान 4-5 वर्षं टिकण्याच्या आणाभाका घेतो तोच हा कँडीडेट जॉईन झाल्यावर एका महिन्यात लास्ट डे चे मेल टाकतो.
हाहाहा

शेवटी काय?

मालक झिंदाबाद.

कोंबडि किंवा डुक्कर होण्यापेक्शा, मालक व्हा की!

कोंबडी अंडी देते म्हणजे आपली पिल्लेच देते की.. हा त्याग पुरेसा नाही का? जर कोण्या डुकराला आपलाच त्याग भारी वाटला तर ते डुक्कर असमाधानीच राहणार

हॅम म्हणजे डुकराचे ढुंगण
>>>>
ओके
पण तरीही,
मी कोंबडी असतो तर माझी अंडी देण्यापेक्षा माझे ढुंगण देणे जास्त पसंत केले असते.

मी कोंबडी असतो तर माझी अंडी देण्यापेक्षा माझे ढुंगण देणे जास्त पसंत केले असते. >> हे बिनबूडाचे विधान आहे!!.. .. असं नंतर कायम ऐकावे लागले असते.

Rofl @बिनबुडाचे ,
तात्पर्य: अंडी असेपर्यंत देत रहावीत. किमान कुणी असा आळ तरी घालणार नाही.

बिनबुडाचे Lol

जोक्स द अपार्ट,
हि अशी उदाहरणे एचआर आणि मॅनेजमेंटवालेच बनवत असतात. या सर्व उदाहरणांचा हेतू एकच असतो की कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करवून घेणे, यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे, आणि जो जास्त मरमर करतोय त्याचे कौतुक करून त्याला चढवणे जेणेकरून तो तशीच मरमर करत राहील. यातच त्याला मोठेपणा वाटेल.

आपण जे योगदान देतो त्याचा मोबदला आपल्याला पगार, प्रमोशन, इन्सेन्टीव्ह स्वरुपात मिळतो. तर आता तू अंडीच देतेस, त्यात काय एवढे मी तर माझा जीव देतोय वगैरे बाता करण्यात काही अर्थ नाही. अंडीही काही बटण दाबली की तयार होत नाही. मुळात बाकीचे किती योगदान देत आहेत त्याचे मूल्यमापन करायचा तुम्हाला हक्कच नसतो. तुम्ही काय देत आहात आणि त्याबदल्यात मिळणारा मोबदला तुम्हाला समाधानकारक आहे की नाही हे बघा. पटत असेल तर राहा. नाही तर दुसरी कंपनी बघा.

हे मॅनेजमेंट आणि कर्मचारी नाते म्हणजे त्या सासू सुनेसारखेच असते. आधी वरच्यांकडून पिळले जायचे. मग आपला टर्न आला की खालच्यांकडून बदला घ्यायचा.

Pages