माहिती हवी आहे- महा ई सेवा केंद्र

Submitted by मी चिन्मयी on 21 June, 2021 - 04:17

बाजारात मध्यवर्ती ठिकाणी आमचा एक गाळा आहे. साधारण ८० स्क्वे. फु. जागा आहे. आसपास दुकाने, वस्ती आहे. एखादं झेरॉक्स सेंटरही नाही. तिथे महा ई सेवा केंद्र चालू करता येईल का? असेल तर काय प्रोसेस असते आणि सुरुवातीचा खर्च किती येईल? कृपया कुणाला कल्पना असल्यास सांगा.

Group content visibility: 
Use group defaults

इ सेवा केंद्रासाठी लायसन घ्यावा लागेलच कारण आधार साइट अक्सेस लागेल. म्हणजे त्यांच्याकडेच किंवा साइटवर पाहिले का?

महा ई सेवा केंद्र म्हणजे काय?>>> सगळ्या प्रकारची सरकारी कागदपत्रांसंबंधी कामं करून मिळतात. म्हणजे जात प्रमाणपत्र, सातबारा, प्रॉपर्टी टॅक्स पावतीवर नाव बदलणे, अजून कसली कसली अ‍ॅफिडेविट्स जी शाळा / कॉलेज किंवा सरकारी खात्यात लागतात ती. त्याबद्दल इथे मदत मिळते.

हे सगळं ऑनलाईन झालंय आणि कमी शिकलेली किंवा अडाणी माणसं सोडाच, बहुतेक अनेकांना ही मदत लागते. मी स्वतःच पॅन कार्ड हरवलं तर नवीन पॅन कार्ड काढोन घेणे, घराच्या टॅक्स रिसीट वर नाव बदलून घेण्यासाठी अ‍ॅफिडेविट करून घेणे (हे अगदीच लेटेस्ट. ) अशी कामं वेगवेगळ्या ई सेवा केंद्रातून क्रून घेतली आहेत. सगळ्या कामांबद्दल माहिती नाही, पण काही कामं तरी वेळ असेल तर स्व्त; करून घेता येतात.

वेबसाईट चेक करतेय मी. पण ती अतिशय स्लो लोड होते. लायसन्स घ्यावं लागेलच. इथे कुणाला वैयक्तिक अनुभव असेल असं वाटलं म्हणून विचारलं.

मी चिन्मयी,

खालील माहीती बघावी.

महा ई-सेवा केंद्र म्हणजे काय?

केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स योजने अंतर्गत, महाराष्ट्रात महा ई-सेवाकेंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या सामान्य सेवा केंद्र योजना (सीएससी) स्थापनकरण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा

पात्रता निकष काय आहेत ?

शासकीय संकेतस्थळाच्या अनुसार, ग्रामीण स्तरावरील उद्योजक (व्हीएलई) म्हणून सीएससी किंवा महा ई-सेवाकेंद्र उघडण्याची आवश्यकता पुढील प्रमाणे:

अ) त्यांच्याकडे वैध आधार क्रमांक असावा.

ब) व्हेलव्हीएलई 18 वर्षांपेक्षावरचे गांव असायला हवा.

क) व्हीएलईने शैक्षणिकपात्रतेच्या किमान स्तरावर मान्यता प्राप्तमंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

ड) व्हीएलई स्थानिक बोली वाचणे आणि लिहिण्यास अस्खलित असायला हवे आणि इंग्रजी भाषेचे मूलभूत पातळी ज्ञान असणे आवश्यक आहे.

ई) मूलभूत संगणक कौशल्यातील आधीचे ज्ञान हे प्राथमिक संधी असेल.

च) व्हीएलईला सामाजिक बदलाची प्रमुखचालक म्हणून पुरेशी प्राप्ती झाली पाहिजे आणि त्याच्या कर्तव्यांची जाणीव अत्यंत समर्पण आणि प्रामाणिक पणासह पसरवायला पाहिजे.

अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ? CSC वरनोंदणी करण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

अ) http://register.csc.gov.in या URL वर भेट द्या.

ब) मुख्यपृष्ठावर प्रदर्शित करण्यासाठी “लागू करण्यासाठी येथे क्लिक करा” बटण क्लिक करा.

क) आपला आधारक्रमांक भरा, प्रमाणीकरण प्रकार निवडा आणि कॅप्चा मजकूर जोडा. “सबमिट करा” बटणावर क्लिक करा ”

ड) आधार प्रमाणीकरण केल्यानंतर आपल्या आधार माहिती फॉर्म सह प्रदर्शित केली जाईल.

ई) टॅब्स, कियॉस्क, बँकिंग, दस्तऐवज आणि इन्फ्रास्ट्रक्चर खाली तपशील भरा.

फ) आपले तपशील पुनरावलोकन करा आणि स्वतःची नोंदणी करण्यासाठी “सबमिट करा” बटणावर क्लिक करा आणि एक अनुप्रयोग आयडी व्युत्पन्न केली जाईल.

जी) आपल्या नोंदणीकृत ई मेल पत्त्यावर आपल्या अर्जाची यशस्वी पूर्तता होण्या विषयी आपल्याला पोचपावती ई मेल मिळेल.

पुढील काही दिवसांत आपल्या अर्जाची पडताळणी करून आपणास इमेल वर किवा फोनवर संबधित अधिकारी याजकडून अधिक माहिती दिली जाईल.

नियम आणि अटी यामध्ये बदल असू शकतात अधिक माहितीसाठी जवळच्या महा ई सेवा केंद्रावर भेट द्या.

How To Start Maha E-Seva Kendra (CSC)? महा ई-सेवा केंद्र असा प्रश्न टाईप केला की माहीती मिळेल.

ही थोडी जास्तीची माहीती...

In case of any further queries please go through the list of Frequently Asked Questions available here (http://register.csc.gov.in/registerationFAQ) or contact the helpdesk team on the toll free number 1800 3000 3468 or email the query to helpdesk@csc.gov.in

Thank you so much विनिता ताई. एवढी detailed माहिती दिल्याबद्दल. उद्याच सर्च करते.