लेख

छायागीत ५ - तु इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है...

Submitted by अतुल ठाकुर on 27 February, 2014 - 22:38

घनतमी शुक्र बघ राज्य करी...

Submitted by अतुल ठाकुर on 14 February, 2014 - 02:01

"अरे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचा हा विषय नाही" हे वाक्य प्रोफेसर महाशय इंग्रजीत म्हणाले आणि निराश व्हायला तयार असलेला मी त्यांच्या केबीनमधुन बाहेर पडलो. पीएचडीसाठी गाईड मिळणं दुरापस्त झालं होतं. बाकी सर्वांना गाईड मिळाले होते. माझ्या बाबतीत माझी अवस्था मीच अवघड करुन ठेवली होती. मला ज्या विषयात संशोधन करायचं होतं तो विषय बदलण्याची तर सोडाच पण त्यात कसलीच तडजोड करण्याची इच्छा नव्हती. इथे तर गाईडच आपल्या आवडीची विषय सुचवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आधी एकदा अतिशय नावजलेल्या प्रोफेसरच्या हाताखाली काम करायला मिळावे म्हणुन आवडत्या विषयाला काहीशी मुरड घालण्याचा गाढवपणा हातुन घडला होता.

शब्दखुणा: 

काही मित्र चंद्रासारखे असतात ...

Submitted by मी मी on 17 August, 2013 - 12:15

काही मित्र चंद्रासारखे असतात ..

भेटतात तेव्हा लख्ख प्रकाशात चमकतात
पण मग पुढे कले कलेने कमी होत आवस होतात !!

काही येतात, दिसतात, लुकलुकतात …
तेव्हाच …. जेव्हा
तुमच्या अवती भोवती वातातावरण स्वछ असेल.

भोवती काळे ढग दाटून आलेत कि ते दिसेनासे होतात,
दडून बसतात ..

कधी परतहि येतात सगळं सावट निघून गेलं कि !!

काही दुरस्त ताऱ्यासारखे असतात,
दूरवर अगदी कोपऱ्यात उभे असतात हाथ बांधून

मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ सोडून न जाणारे

असतात …तिथेच उभे असतात
रोज दिसतात …. दूररररर असले तरीहि दूर नसतात….

शुक्रताऱ्या सारखे आयुष्यात जमून बसतात …. !!

विषय: 
शब्दखुणा: 

मीरचा पर्यायी शेर

Submitted by समीर चव्हाण on 28 April, 2013 - 03:02

मायबोलीवरील गझल विभागात पर्यायी शेर आणि त्याला धरून चाललेले वाद-विवाद चांगलेच चर्चेला येत आहेत.
काही वर्षांपूर्वी समीक्षक रामनाथ सुमन ह्यांचा मीर हा समीक्षात्मक ग्रंथ वाचनात आला. त्यात मीरच्या जीवन आणि साहित्यप्रवास संबंधित अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात मीरने दुस-यांच्या शेरांचे केलेले संशोधन सुध्दा दिले आहे. मीर बहुधा आपल्या आत्मकथेत अतिशय नम्रपणे म्हणतो की अमकातमका शेर मी लिहिला असता तर असा लिहिला असता. मीरने संशोधन केलेला एकच शेर इथे देत आहे. इस्लाह देणे चांगले की वाईट हा चर्चेचा मुद्दा ठरावा.

मूळ शेर आहे सज्जाद अकबराबादीचा:

हिज्र-ए-शीरी में क्योंकि काटेगा

विषय: 
शब्दखुणा: 

स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

Submitted by भानुप्रिया on 29 December, 2012 - 05:59

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

Pages

Subscribe to RSS - लेख