लेख

विषय क्र. १ - "मोदी जिंकले ! पुढे काय ?"

Submitted by अतुल ठाकुर on 30 June, 2014 - 06:40

गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी एकदा म्हटलं होतं कि समाज व्यवहार हा गुंतागुंतीचा आणि अनेकपदरी असतो. तो सोपा करुन पाहता येत नाही. मोदी जिंकले ते प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यावर. समाजव्यवहारात विकास हा फक्त आर्थिक असु शकेल काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही धरणं बांधाल, खेडोपाडी वीज खेळवाल, रस्ते बांधाल. पुल होतील. घराघरात लॅपटॉप्स येतील, दारिद्र्य रेषेखालील असणार्‍या माणसांची संख्या कमी होईल. प्रत्येकाला काम मिळेल. हा विकास आहेच. पण त्यामुळे मग उच्चवर्णिय मुलिवर प्रेम केलं म्हणुन हत्या होणं थांबणार आहे काय? खैरलांजीमध्ये ज्याप्रमाणे बायकांना विटंबना करुन मारलं गेलं ते थांबणार आहे काय?

विषय: 
शब्दखुणा: 

जिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश...

Submitted by अतुल ठाकुर on 20 May, 2014 - 06:41

maxresdefault.jpghttp://www.youtube.com/watch?v=8UC7QWELzCY

लक्ष्मीकांत प्यारेलालने अगदी "दोस्ती","पारसमणी"पासुन ते अलिकडल्या "गुलामी" पर्यंत अनेक सुरेल गाणी दिली. सतत, सर्वकाळ हिन्दी चित्रपटसृष्टीत टिकुन राहणं हे सोपं काम नाही. वर्षाला एखाद दुसरा चित्रपट एक्सक्लुजिवली करुन त्यात उत्तम संगीत देणे वेगळे आणि नव्या जुन्या सर्व संगीतकारांच्या स्पर्धेत नुसतेच टिकणे नव्हे तर त्यांना पुरुन उरणे देखिल वेगळेच. असे आणखि उदाहरण "मै शायर बदनाम" सारखे गीत लिहिणार्‍या आनंद बक्षीचे. पण तो वेगळा विषय आहे.

शब्दखुणा: 

आमचे वायंगणकरसर

Submitted by अतुल ठाकुर on 17 May, 2014 - 21:20

मुक्तांगण म्हणजे एखाद्या महासागरासारखे आहे. तेथील प्रत्येक माणुस, मग तो रुग्णमित्र असो कि कार्यकर्ता, प्रत्येकाकडे अनुभवाचा प्रचंड साठा असतो. व्यसन ही गोष्ट्च इतकी गुंतागुंतीची असते की ती अनेक दृष्टीकोणातुन पाहता येते. स्वतः व्यसन करणार्‍याचा एक दृष्टीकोण असतो. बायकोचा वेगळा, आई वडिलांचा वेगळा, उपचारकाचा वेगळा. माणसाला व्यसनापासुन मागे खेचणारे मित्र वेगळे, त्याकडे नेणारे मित्र वेगळे. स्वतःहुन मुक्तांगणला येणारे वेगळे आणि मुक्तांगणला येऊनसुद्धा कशाला आपण येथे आलो हे माहित नसणारे वेगळे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख