मायबोली गणेशोत्सव २००९

चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है! - aashu_d

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:27

चित्र कमांक १

SRK & Sourav.jpg

शाहरुख: अरे काय झालं? एसएमेस करुन आत कशाला बोलावलंस?
सौरव : (रडवेला होऊन) फोन करण्याएवढा बॅलन्स नाहीये रे! ते मला त्यांच्यात घेत नाहीत रे!
शाहरुख : कोण ते?
सौरव : सगळे टोळकं करुन बसलेत ना तिथे.. आणि मधे तो #$%$% 'भेग कापेल' दात दाखवतोय दिसत नाही का तुला?
शाहरुख : ओ! ते होय! तू लक्ष नको देऊस. तू आपला माझ्यासोबत थांबतोस का?
सौरव : त्यासाठीच तर तुला आत बोलावलं.. की मला कंपनी दे.
शाहरुख : मी फक्त करणलाच 'कंपनी' देतो. Proud

चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. २ : इश्श! बील काय म्हणेल? - Arch

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:20

चित्र क्रमांक ३

hilary-clinton-aamir1.jpg

अमीर : काय म्हणताय हिलरी ताई?

हिलरी : ताई काय म्हणतोस?

अमीर : मग काय अक्का म्हणू?

हिलरी : ए मी काय पार्ल्याच्या बीबी वरची वाटले की काय? कधी लंचचा मेनु टाकायला आलेली पाहिलं आहेस मला? कधी तिकडे चक्कर टाकलीच तर कोण काय वाचतय किंवा कोण कोणाला काय टोमणे मारतय एवढच पहायला येते. परदेश दौर्यावर तेवढच कामाला येतं.

विषय: 

पूल, तळे, फुले वगैरे

Submitted by साधना on 2 September, 2009 - 06:36

POOL.jpg

नाव - ऐश्वर्या देगांवकर
वय १४ वर्षे ३ महिने.
माध्यम - वॉटरकलर्स

http://www.arttoheartweb.com/benediction_Claude_Monet_Water_Lily_Pond.htm

ह्या चित्रावरुन प्रेरणा घेऊन काढायला सुरवात केली, पण नंतर बहुतेक आमच्या चित्रकाराचे मन बदलले. Happy

विषय: 

पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ६ : नियोजनाचा अभाव आणि कल्पक नियोजन - swaroop

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 00:07

प्रवेशिका क्र. : ६

नियोजनाचा अभाव :
बेफिकिर जनता.... निष्क्रिय सरकारयंत्रणा.... खिसेभरु राजकारणी आणि एकुणच पर्यावरणाबद्दल अनास्था.... परिणाम : हिरव्यागार डोंगरउतारावर झालेले कॉन्क्रीटचे अतिक्रमण!
ठिकाण : भारतातल्या अनेक अतिक्रमित हिलस्टेशन पैकी एक!

paryaa6-1_Antiparyawaran.jpgकल्पक नियोजन :

विषय: 

पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ५ : इको-फ्रेंडली गणेश आणि होळी - satishbv

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 00:03

प्रवेशिका क्र. : ५

छायाचित्र क्र. १ :- पर्यावरणामधे सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या घटना
यंदाच्या गणेशोत्सवात माझ्या मित्राने "इको-फ्रेंडली" गणेशमुर्ती आणली होती. मिनल लेले यांनी वृत्तपत्रांचा लगदा आणि शाडुची माती ह्यांचे मिश्रण वापरुन ह्या मुर्ती बनवील्या. मुंबईच्या प्रथम नागरीक डॉ. शुभा राऊळ यांच्या मदतीने त्याचे शिवाजी पार्क, दादर येथे प्रदर्शन देखिल भरवीले होते.

paryaa5-1_ganesh_murti.jpg

छायाचित्र क्र. २ :- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणणार्‍या घटना

विषय: 

B & W प्रवेशिका क्र. ३१ : सुर्यास्ताच्या साक्षी.... रेखियली आभाळावर नक्षी - Swaroop

Submitted by संयोजक on 1 September, 2009 - 23:55

शीर्षक : सुर्यास्ताच्या साक्षी.... रेखियली आभाळावर नक्षी

bw31_suryaastachya_sakshi.jpg

विषय: 

मॉडर्न आर्ट (!)

Submitted by राहुल on 1 September, 2009 - 22:59

aryaa_entry.jpg

नाव: आर्या
वय: ४ वर्षे ३ महिने
माध्यम: फिंगर पेंट्स
पालकांनी केलेली मदत: कागद बोर्डवर लावुन देणे, रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे Happy

विषय: 

"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक ७

Submitted by संयोजक on 1 September, 2009 - 22:26

स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
पहिल्या दिवशी एक कोडं दिलं जाईल. स्पर्धकांनी आपले प्रतिसाद तिकडेच नोंदवायचे आहेत. दुसर्‍या दिवशी एक किंवा दोन क्लू दिले जातील. आणि तिसर्‍या दिवशी सकाळी त्या कोड्याचे विजेते जाहीर होतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी नविन कोडं दिले जाईल.

स्पर्धेचे नियम :
१. दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
२. एका आयडीला दिवसभरात कितीही वेळा उत्तर देता येईल.
३. ज्यांनी सर्वांनी बरोबर उत्तर दिली असतील ते सगळे विजेते म्हणून घोषित केले जातील.

B & W प्रवेशिका क्र. ३० : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू - hawa hawai

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 23:17

शीर्षक : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू

bw30_modak.jpg

हा फोटो पिकासाचा वापर करुन कृष्णधवल केला आहे. तसेच थोडासा शार्पनेस वाढवला आहे.

विषय: 

"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. ४

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 22:47

स्पर्धेचे नियम :

१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.

२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.

३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.

४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्‍या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

५. विडंबन करताना शक्यतो वृत्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!

६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.

७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.

८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २००९