मायबोली गणेशोत्सव २००९

"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. १

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 00:41
कायापालट - द मेक ओव्हर
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव जिल्ह्याचे भकासकार मा. श्री. नस्तेउद्योग पचपचे पाटील, प्रमुख पावणे तालुक्याचे उध्वस्तकार मा. श्री. आळसराव कामचूके पाटील, गरमपंचायतीचे सरपण मा. श्री. लाकूडराव कोळसे पाटील आन हिथं जमलेल्या समद्या कुडबूड्या ग्रामस्थ मंडळींनो....आज आपल्या गावच्या 'सार्वजणिक गनेशोत्सव मंडळाचे' वतीने घेण्यात येणार्‍या विडंबन स्पर्धेची घोषणा करताना आम्हा सर्वांणाच लय आनंद होतो हाये. संयोजकांकडूण चार परसिद्ध सिद्धहस्त कवींच्या सुंदर सुंदर कवीता देण्यात येतील. त्येंची सम्मती अन माफी गुरहीत धरुन तुम्ही स्वतःच्या- नसल्यास दुसर्‍याची उसणी घेउन, त्याला प्रताधिकार बहाल करुण- बुद्धीला चालणा देऊण तिला अजूकच सुंदर बनवायचे आहे. मा. नाना पाटेकरांनी म्हणलेच आहे...जग सुंदर आहे, ते मी अजून सुंदर बनिवणार.... आपले आळसरावसाहेब पाटीलजी अन नस्तेउद्योगरावसाहेब पाटीलजी ज्यापरमाणे गावाचा भकास करुन र्‍हायले, त्येंच्या पावलावर पाउल ठेउण आपण कवितेला सुंदर बणवायचे हाये...तुमी बी कविता सुंदर करुन लिवायला घ्यावा! त्येंचा पार मेकओव्हर करूण टाका!!!
-------------------------------------------------------------------------------------- स्पर्धेचे नियम :
१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.
२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.
३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.
४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्‍या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
५. विडंबन करताना शक्यतो वृत्त्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!
६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.
८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.
९. एका आयडी तर्फे एकूण फक्त चारच एन्ट्री स्वीकारली जातील.
१०. विडंबन या अगोदर मायबोलीवर प्रकाशित झालेले नसावे.
११. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
-------------------------------------------------------------------------------------- स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इमेल पाठवताना Vidamban spardha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना प्रवेशिकेसोबतच मायबोली आयडी आणि प्रवेशिकेला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
४. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
--------------------------------------------------------------------------------------
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
--------------------------------------------------------------------------------------
पहीली कविता :
रंग नभाचे - कवी वैभव जोशी - गझल
रंग नभाचे क्षणाक्षणाला बदलत होते
कुणीतरी अस्वस्थ असावे.. समजत होते

आज अचानक काय बिनसले असेल ह्याचे
ह्याच मनाला काल कुठेही करमत होते

कशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की?
वरवर बघता सर्व चेहरे सहमत होते

मी काही ठरवून व्यथांना बिलगत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते

विचारण्याचा रोख चुकीचा असेल तर मग..
साध्या साध्या शंकांचीही.. हरकत होते

तुझ्यासारखे हळवे होते मेघ कालचे
गर्जत नव्हते , बरसत नव्हते .. तरळत होते

अजूनही ती सांज हुंदके रोखत होती
दिशादिशांवर अजून काजळ पसरत होते

अलगद पानावरती बसले फूलपाखरू
बहुधा माझ्या वहीत काही उमलत होते....

रचनेबद्द्ल:
वैभव जोशींच्या अनेकानेक सरस गझलांपेकी ही एक अशीच सहजसुंदर गझल मात्रावृतात आहे. ८ + ८ + ८ अश्या एकूण २४ मात्रा आहेत. ’होते’ ही रदीफ़ आहे तर बदलत, समजत, करमत, सहमत हे त ने शेवट होणारे कवाफ़ी आहेत. ’अ’ ही अलामत आहे (बदलत मधला ’ल’, समजत मधला ’ज’, करमत आणि सहमत मधला ’म’ ह्यातला स्वर) गझलेचे विडंबन करताना गझलेचे नियम पाळून करावेत असा आग्रह आहे पण बंधन मुळीच नाही तेव्हा उचला आपली लेखणी आणि करा सुरुवात ’हझल’ लिहायला!!
-------------------------------------------------------------------------------------- आलेल्या प्रवेशिका:

"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 23:29

एका पेक्षा एक

"तुमचा पिवळा गुलाब.. त्यावर आमचा केशरी गुलाब.. मग तुमचा लाल गुलाब.. आमचा पांढरा गुलाब..
तुमचा केशरी सूर्य आणि पांढुरके ढग.. त्यावर आमचा सोनेरी सूर्य आणि लालसर ढग..
तुमची राजगडावरची सुवेळा माची.. त्यावर आमची तोरण्यावरची झुंजार माची...
तुमचे डोंगर दुरुन साजरे.. आमचे ही डोंगरच, पण जवळूनच सुरेख...
तुमच्या बागेतल्या पपया.. आमच्या मंडईतले आंबे..
तुमचा अटलांटिक.. त्यावर आमचा पॅसिफिक... मग परत तुमचा अरबी समुद.. त्यावर आमचा हिंदी महासागर.. मग तुमचा... "

"अहो.. थांबा, थांबा, थांबा काय तुमचं आमचं करताय ??? हे सगळं तर निसर्गाचं देणं ना ???"

"जळ्ळं मेलं 'लक'शण!!" गद्य STY - १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 16:35

भारत विभूषण आपल्या सिंगल रूममध्ये विमनस्क स्थितीत बसला होता.. आत्ता या घडीला 'सबसे अनलकी कौन' असा गेम शो कुठे असता तर तो नक्कीच जिंकला असता.
तसा तो जन्मापासूनच अनलकी होता. जन्म देतानाच आय मेली अन् बाप आधीच गेला होता घर सोडून. आठवत होतं तेव्हापासून त्याच्या आज्यानंच त्याला वाढवलं होतं.. चार वर्षापूर्वी तोही गेला, अन् हा एकाकी झाला बिचारा.

विषय: 

आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 15:57

गणपती बाप्पा ssss मोरया!
मंगलमूर्ती ssss मोरया!

श्रावण सुरू झाला की तुम्हा-आम्हाला सगळ्यात मोठे वेध लागतात ते आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे .. लहान मुलांपासून ते अगदी वडीलधार्‍या मंडळींपर्यंत, समाजातल्या कुठल्याही स्तरांतल्या व्यक्तीला गणपती बाप्पा हे सगळ्यात लाडकं दैवत वाटतं .. गणेशोत्सवातल्या ह्या दीड किंवा पाच किंवा दहा किंवा काही काही ठिकाणी एकवीस दिवसांतला क्षणन् क्षण भारावून टाकणारा असतो .. गेली कित्येक वर्षं आपण गणेशोत्सव साजरा करतोय पण तरीही दरवर्षीचा गणेशोत्सव नेहमीच एक नविन अनुभूती देऊन जातो ..

"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 10:17

एका माणसाचे डोके केव्हढे मोठे सांगू काय ? सांगू काय ? सांगू काय ? सांगू काय ?
एव्हढे मोठे ? तेव्हढे मोठे ? केव्हढे मोठे ? असेल मोठे.. पण त्याचा इथे संबंध काय ?

तेच तर आम्ही तुम्हाला सांगतोय, परस्पर संबंध ओळखा. कोणा कोणातला परस्पर संबंध म्हणता ? इथे बघा आणि डोक्याला कल्हई सुरु करा !!!

--------------------------------------------------------------------------------------

स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्याप्रमाणे कोडं दिलं जाईल.

फोटोग्राफी स्पर्धा क्र.२ : पर्यावरण- सकारात्मक आणि नकारात्मक स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 17:32
कुठे थेंब थेंब पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तर कुठे नळ उघडे ठेवून अक्षरशः हजारो लिटर पाणी फुकट चाललंय... कुठे "टाकाऊतून टिकाऊ" तत्वावर कचर्‍यातून सौंदर्य शोधलं जातंय तर कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच नैसर्गिक सौंदर्य नष्ट करतोय... कुठे सौरउर्जा, पवनचक्क्यांसारखे अपारंपारिक उर्जा स्त्रोत अधिकाधिक कसे वापरता येतील ह्यावर प्रयत्न चाललेत तर कुठे अजूनही ओली लाकडे जाळून प्रदुषण वाढतंय ... एकीकडे पर्यावरण संरक्षणासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा तर दुसरीकडे स्वार्थापायी किंवा अज्ञानामुळे चालू असलेली पर्यावरणाची अपरिमीत हानी... जरा उघड्या डोळ्यांनी आणि सरसावलेल्या कॅमेर्‍याने हा विरोधाभास टिपायचा प्रयत्न करूया ? गणेशोत्सव २००९ - फोटोग्राफी स्पर्धा क्र. २ : पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक ********************************************************* स्पर्धेचे नियम : १. ह्या स्पर्धेसाठी दोन (२) छायाचित्रे पाठवणे आवश्यक आहे. छायाचित्र क्र. १ :- पर्यावरणामधे सकारात्मक बदल घडवून आणणार्‍या घटना, तंत्रज्ञान, व्यक्ती अथवा संघटना हा विषय आहे. उदा.: अपारंपारिक उर्जा स्त्रोत, उर्जेचा तसेच साधनसंपत्तीचा पुर्नवापर, वृक्षारोपण ई. (renewable energy, recycling, tree plantations, water conservations, etc.)
छायाचित्र क्र. २ :- पर्यावरणावर नकारात्मक परिणाम घडवून आणणार्‍या घटना, तंत्रज्ञान, व्यक्ती अथवा संघटना हा विषय आहे. उदा.: प्रदुषण, पर्यावरण हानी, उर्जेचा गैरवापर ई. (pollution, deforestation, wastage of energy & water resources, garbage dumping, etc.)
२. दोन्ही छायाचित्रांचा परस्पर संबंध असणे गरजेचे नाही. मात्र छायाचित्रांच्या माध्यामातून योग्य तो संदेश दिला गेला पाहिजे. छायाचित्रांचा मूळ उद्देश हा पर्यावरणाबद्दलची जागरूकता हा असावा.
३. दोन्ही पैकी फक्त एकाच विषयावर पाठवलेले छायाचित्रं बाद ठरवले जाईल.
४. दोन्ही छायाचित्रे काढलेल्या स्थळाचे नाव देणे बंधनकारक आहे. शक्य असल्यास थोडी माहिती पण द्यावी.
५. कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे, मात्र बंधनकारक नाही.
६. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम छायाचित्र एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास ते नमूद करावे.
७. ह्या स्पर्धेत मतदान हे निनावी पद्धतीने घेतले जाणार असल्याने छायाचित्रावर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा.
८. छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
९. एका आयडी तर्फे एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
१०. छायाचित्रं स्वत:च काढलेलं असावे.
११. छायाचित्रं आधी मायबोलीवर प्रकाशित झालेलं नसावे.
१२. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
*********************************************************
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
*********************************************************
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना : १. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : paryavaran असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रूंदी जास्तीत जास्त ७५० x ५०० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी आणि छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
********************************************************* आलेल्या प्रवेशिका:
विषय: 

फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 17:26
"रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा..." असं म्हणत आज रंगांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न चालू असतो. निसर्गातल्या रंगांपासून ते माणसांच्या रंगांपर्यंत, रंग अनेक इतिहास घडवून गेलेत, काव्य निर्माण करून गेलेत, कलाकारांना प्रोत्साहीत करून गेलेत. छायाचित्रण ही अशीच एक कला. छायाचित्रणात जेव्हा रंग टिपण्याची क्षमता आली तेव्हा त्यात खर्‍या अर्थाने क्रांती घडली. पण मग त्या पूर्वीचे छायाचित्रकार ह्या रंगांशिवाय आपली कला कशी बरं सादर करत होते? निसर्गातल्या करामती, इतिहासातल्या महत्वाच्या घटना, राजेरजवाड्यांचे ऐश्वर्य हे सगळं ह्या छायाचित्रकारांनी टिपलं ते पण रंगांशिवाय...
आज संगणक युगात छायाचित्रांचे रंग अगदी हवे तसे बदलता येतात, ते झाले तंत्र. छायाचित्रकार कॅमेर्‍याच्या डोळ्याने टिपतो ते कौशल्य. आपण पण जरा मागे जाऊन कृष्णधवल छायाचित्र काढायचा प्रयत्न करूया ? रंगांशिवाय भावभावना, निसर्ग, सौंदर्य छायाचित्रात टिपूया ?
फोटोग्राफी स्पर्धा क्र. १ : कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी
********************************************************
स्पर्धेचे नियम :
१. विषयाचे बंधन नाही.
२. छायाचित्र 'ब्लॅक अँड व्हाईट' (Grayscale Image) अथवा 'सेपीया-टोन' (Sepia-toned Image) या २ प्रकारांमधे स्वीकारला जाईल.
३. कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स (शक्य असल्यास) देणे अपेक्षित आहे. मात्र बंधनकारक नाही.
४. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम छायाचित्र एडीटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. असे सॉफ्टवेअर वापरून कलर चा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला असल्यास, तसे छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र छायाचित्रात असे काही बदल केले असल्यास तसे लिहावे.
५. छायाचित्रावर स्पर्धकाच्या नावाचा अथवा मायबोली आयडीचा वॉटरमार्क टाकू नये. त्याऐवजी "मायबोली गणेशोत्सव २००९" असा वॉटरमार्क टाकावा.
६. छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. एका आयडी तर्फे एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
८. छायाचित्र स्वत:च काढलेले असावे.
९. छायाचित्र आधी मायबोलीवर प्रकाशित झालेला नसावे.
१०. विजेता मतदान पध्दत वापरून निवडला जाईल.
********************************************************
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
********************************************************
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना photography spardha : Black & White असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : इकडूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, छायाचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रूंदी जास्तीत जास्त ७५० x ५०० पिक्सेल अशी हवी.
४. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठवताना इ-मेल मधे छायाचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी आणि छायाचित्राला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
******************************************************** आलेल्या प्रवेशिका:
विषय: 

"रंगपेटी उघडू चला..!!!"- लहान मुलांची चित्रकला स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 16:35

"रंगपेटी उघडू चला..!!!"

गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!

१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्‍याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.

मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.

गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!

*******************************************************

विषय: 

"नाव विदेशी-चव देशी"- पाककला स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 16:26

मेरा जूता है जपानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी |

हे दिल जसं हिंदुस्थानी आहे तशी आपल्या जीभेची चवही अस्सल हिंदुस्थानी नाही का ? पिझ्झा हट मधल्या तंदूरी पिझ्झ्यावर उगीच का उड्या पडतात?

ह्या अस्सल हिंदुस्थानी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्हीही कधी घरातल्या घरात फ्युजन पाककृती निर्माण केल्या असतील. आपल्या मराठी पदार्थांखेरीज कध्धी काहीही न खाणार्‍या सासुबाईंकडून पसंतीची पावती मिळवली असेल.

पण फक्त चाटून पुसून स्वच्छ झालेल्या ताटाकडे बघून समाधान मानू नका तर आपल्या पाककृती मायबोलीच्या गणेशोत्सव पाककृती स्पर्धेत सादर करुन सर्वांचीच दाद मिळवा!!

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २००९