चित्रातल्या गोष्टी

चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : आधी संवाद, मग परिसंवाद - lalita-preeti

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:40

चित्र क्रमांक ३

hilary-clinton-aamir1.jpgआधी संवाद, मग परिसंवाद

आमिर : हाय हिलरी! एकदम गॉर्ज्यस्‌ दिसतीयेस!

हिलरी : यस्स्‌! आय डीड इट!

आमिर : काय डिड इट? मी तुझं कौतुक करतोय आणि तू अजून स्वतःतच मश्गूल आहेस?

हिलरी : मला कध्धीपासून तुला भेटायचं होतं!

आमिर : का? मलाच का? मि. बच्चनना नाही? मि. एस.आर.के. ला नाही?

चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है! - aashu_d

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:27

चित्र कमांक १

SRK & Sourav.jpg

शाहरुख: अरे काय झालं? एसएमेस करुन आत कशाला बोलावलंस?
सौरव : (रडवेला होऊन) फोन करण्याएवढा बॅलन्स नाहीये रे! ते मला त्यांच्यात घेत नाहीत रे!
शाहरुख : कोण ते?
सौरव : सगळे टोळकं करुन बसलेत ना तिथे.. आणि मधे तो #$%$% 'भेग कापेल' दात दाखवतोय दिसत नाही का तुला?
शाहरुख : ओ! ते होय! तू लक्ष नको देऊस. तू आपला माझ्यासोबत थांबतोस का?
सौरव : त्यासाठीच तर तुला आत बोलावलं.. की मला कंपनी दे.
शाहरुख : मी फक्त करणलाच 'कंपनी' देतो. Proud

चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. २ : इश्श! बील काय म्हणेल? - Arch

Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 11:20

चित्र क्रमांक ३

hilary-clinton-aamir1.jpg

अमीर : काय म्हणताय हिलरी ताई?

हिलरी : ताई काय म्हणतोस?

अमीर : मग काय अक्का म्हणू?

हिलरी : ए मी काय पार्ल्याच्या बीबी वरची वाटले की काय? कधी लंचचा मेनु टाकायला आलेली पाहिलं आहेस मला? कधी तिकडे चक्कर टाकलीच तर कोण काय वाचतय किंवा कोण कोणाला काय टोमणे मारतय एवढच पहायला येते. परदेश दौर्यावर तेवढच कामाला येतं.

विषय: 

चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते - slarti

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 11:42

चित्र क्रमांक २

LL2.jpg
दिसते तसे नसते

भीम : दुश्या, हे चालणार नाही, सांगून ठेवतोय.
दु:शासन : अरे हट ! तुला खेळता येत नाही तर रडू नकोस. रड्या लेकाचा !
भीम (दुश्याची गचांडी धरायला पुढे जात) : दुश्या, आता फार झालं हां. घालू का ही गदा डोक्यात ?

तेवढ्यात दुर्योधन येतो आणि मध्ये पडतो.

दुर्योधन : अरे अरे, काय चालले आहे ?

चित्रातल्या गोष्टी अर्थात लघुलेखन स्पर्धा!!

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 11:56
जेव्हा आपण एखादं छायाचित्र बघतो, त्यामागची पार्श्वभूमी/प्रसंग कधी माहित असते तर कधी नसते... कधी आपण एखादा क्षण थांबून ती घटना, त्यातल्या व्यक्ती, त्यांचे संवाद आठवायचा प्रयत्न करतो... कधी कधी तर प्रसंग अगदी पूर्ण माहिती असूनही काही कल्पना लढवत छायाचित्रांमधल्या व्यक्तींच्या तोंडी संवाद घालायचा प्रयत्न करतो आणि घडलेला किंवा अगदी न घडलेला तो संवाद "आठवून" नकळत एक स्मित तरळते...
चला तर मग मंडळी हाच खेळ खेळूया आपण!!

चित्रातल्या गोष्टी अर्थात लघुलेखन स्पर्धा

-------------------------------------------------------------------------------------- स्पर्धेचे नियम :
१. ह्यात ज्या प्रसंगामुळे हे छायाचित्र आहे, तो प्रसंग न लिहीता दुसरा काल्पनिक प्रसंग खुलवायचा आहे.(उदा: हिलरी व आमिर सेंट झेविअर्सला शिक्षणाशी संबंधीत परिसंवादासाठी एकत्र आले होते.)
२. छायाचित्रांमधील व्यक्तींच्या तोंडी संवाद आलेच पाहीजे. नुसतेच स्वगत नको.
३. लेखनात छायाचित्रामधील प्रसंगाचा उल्लेख आला पाहीजे.
४. लेखाला शीर्षक देणे अपेक्षित आहे.
३. लेखनासाठी शब्दमर्यादा किमान २०० शब्द ते कमाल १००० शब्द आहे.
४. स्पर्धेसाठी एका आयडीला एका फोटोवर एकच प्रवेशिका देता येईल.
५. विजेता मतदान पध्दतीने निवडला जाईल.
--------------------------------------------------------------------------------------
चित्र क्रमांक १ :
SRK & Sourav.jpg
चित्र क्रमांक २ :
LL2.jpg
चित्र क्रमांक ३ :
hilary-clinton-aamir1.jpg
--------------------------------------------------------------------------------------
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना :
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना sanyojak@maayboli.com ह्या पत्त्यावर इ मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इमेल पाठवताना Laghu lekhan spardha असे सब्जेक्ट मधे लिहावे. (एक नम्र सूचना : सब्जेक्ट इथूनच कॉपी-पेस्ट करावे.)
३. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना प्रवेशिकेसोबतच मायबोली आयडी आणि प्रवेशिकेला शीर्षक देणे बंधनकारक आहे. एक आयडी प्रत्येक चित्रासाठी एक प्रवेशिका पाठवू शकतो. प्रवेशिकेसोबत चित्राचा क्रमांकही लिहावा.
४. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर संयोजकांना २४ तासांची मुदत द्यावी. २४ तासांनंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
--------------------------------------------------------------------------------------
मायबोलीकरांकडून आलेल्या सूचनेनुसार ह्या वर्षी स्पर्धांच्या निकाल जाहिर होईपर्यंत स्पर्धकांचे नाव जाहिर केले जाणार नाहिये. मतदान निनावी (anonymous) पध्दतीने घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धकांनी त्यांच्या प्रकाशित झालेल्या प्रवेशिकेवर येणार्‍या प्रतिसादांना, निकाल जाहीर होईपर्यंत कुठल्याही माध्यमात (प्रतिक्रिया, विचारपुस, वाहत्या बातमी फलकांवरच्या गप्पा इत्यादी ) उत्तर देऊ नये. स्पर्धकांकडून (अनवधानानेसुद्धा) त्यांची ओळख उघड झाल्यास ती प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
-------------------------------------------------------------------------------------- आलेल्या प्रवेशिका:
शीर्षक प्रतिसाद
गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ३  संयोजक 10
गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ४   संयोजक 12
ॐ नमोजी आद्या : प्रिया पाळंदे   संयोजक 14
अशीही जाहिरातबाजी!   संयोजक 1
अशीही जाहिरातबाजी - १   संयोजक 60
अशीही जाहिरातबाजी - २   संयोजक 16
कहाणी गणेशाची - वृक्षसंवर्धनाची! : अरुंधती कुलकर्णी   संयोजक 21
चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : आधी संवाद, मग परिसंवाद - lalita-preeti  संयोजक 2
चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : दिसते तसे नसते - slarti  संयोजक 21
चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. २ : इश्श! बील काय म्हणेल? - Arch  संयोजक 7
चित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है! - aashu_d  संयोजक 20

Subscribe to RSS - चित्रातल्या गोष्टी