चित्रकला स्पर्धा

चित्रकला उपक्रम - १- छोटा गट- चंद्रयान - माऊमैया - राधा भगत

Submitted by माऊमैया on 25 September, 2023 - 21:19

माझ्या ७ वर्षाच्या लेकीने काढलेले चित्र. चंद्रयानाच्या बातम्या सुरु झाल्यापासून , बऱ्याचवेळा घरी कागदावर चंद्रयान उतरलंय. हे खास माबोकरांसाठी---

आमचीही रंगपंचमी (?)!!!

Submitted by अल्पना on 3 September, 2009 - 19:22

आमचीही रंगपंचमी(?)!!!

aayam_painting.JPG

नाव - आयाम
वय - १ वर्ष २ महिने
माध्यम - फिंगरपेंट्स

विषय: 

बाप्पा मोरया रे....

Submitted by seemawatwe on 3 September, 2009 - 19:12

Ganapati.jpg

नाव - आदित्य ऊपेन्द्र वाटवे
वय ९ वर्षे ३ महिने.
माध्यम - Acrylic कलर्स
आदित्यने हे चित्र पूर्णपणे एकट्याने काधले आहे.

विषय: 

धावायला सज्ज!

Submitted by पन्ना on 3 September, 2009 - 15:49

धावायला सज्ज असलेला लाईनबॅकर!

linebacker1.jpg

नाव : हर्ष
वय : ८ वर्षे
माध्यम : साधी पेन्सिल

पालकांनी केलेली मदत : स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासून रोज सांगत होते की स्पर्धेसाठी चित्र काढ. गोडी गुलाबीने समजावून झालं, ओरडून धमकावून झालं.. शेवटी इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर जे एक चित्र काढलं ते बघून मी कपाळाला हात लावला....स्मशानभूमी वरचा ग्रीम रीपर Uhoh ह्याने मायबोलीवरचा 'तो' बीबी वाचला की काय अशी शंका आली Proud

विषय: 

सानिकाचं "सेल्फ पोर्ट्रेट" : आनंदीआनंद गडे !!

Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:40

"सेल्फ पोर्ट्रेट" !! : आनंदी आनंद गडे!!
सानिका - वय ४
सानिका (तिच्या वयानुसार अन टिपिकल मुलगी असल्यामुळे) कायम स्वप्नांच्या दुनियेतच असते!! तिच्या गोष्टीत, चित्रात अन एरव्हीच्या बोलण्यात पण कायम जादू, पर्‍या, राजकन्या, यांच्याशिवाय कशाची बात नसते! सगळं कसं गोड गोड अन मुख्य म्हणजे दिसायला सुंदर !! तिचं हे चित्र मला आवडलं ते त्यातल्या भयंकर (!) आनंदी मूड मुळे Happy ती मुलगी ( ती म्हणजे ती स्वतः असं तिचं म्हणणं!), फुलं, ते पाखरु , सगळे आपले हसतायत !! Happy

समुद्रकाठ - "इम्प्रेशनिस्ट स्टाईल" म्हणे!! :)

Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:20

समुद्रकाठचा देखावा.
--आर्यक, वय १०

तसा आर्यक ला फार चित्रकलेचा षौक नाही . पण नुकतेच इम्प्रेशनिस्ट स्टाईल बद्दल समजलेय (की नुस्तं ऐकलंय?!), अन व्हॅन गॉफची चित्रं (फक्त)पाहिलीयत काही !! या आधारावर काढलेलं हे चित्र. त्याचं म्हणणं आहे की हा इम्प्रेशनिस्ट स्टाईल सनसेट आहे!! व्हॅन गॉफ ची चित्रं कळली कितपत ते नाही माहित पण नुकतीच पाहिल्याचा प्रभाव रंगाच्या वापरावर दिसतो आहे Happy

पूल, तळे, फुले वगैरे

Submitted by साधना on 2 September, 2009 - 06:36

POOL.jpg

नाव - ऐश्वर्या देगांवकर
वय १४ वर्षे ३ महिने.
माध्यम - वॉटरकलर्स

http://www.arttoheartweb.com/benediction_Claude_Monet_Water_Lily_Pond.htm

ह्या चित्रावरुन प्रेरणा घेऊन काढायला सुरवात केली, पण नंतर बहुतेक आमच्या चित्रकाराचे मन बदलले. Happy

विषय: 

मॉडर्न आर्ट (!)

Submitted by राहुल on 1 September, 2009 - 22:59

aryaa_entry.jpg

नाव: आर्या
वय: ४ वर्षे ३ महिने
माध्यम: फिंगर पेंट्स
पालकांनी केलेली मदत: कागद बोर्डवर लावुन देणे, रंगकाम झाल्यावर अंघोळ घालणे Happy

विषय: 

माझा हिरो

Submitted by काशी on 27 August, 2009 - 07:55

Myb_drw.jpg

नाव : अर्चिश काशीकर
वय : १३ वर्ष
माध्यम : पेन्सिल, पेन्सिल रंग

विषय: 

"रंगपेटी उघडू चला..!!!"- लहान मुलांची चित्रकला स्पर्धा नियम

Submitted by संयोजक on 14 August, 2009 - 16:35

"रंगपेटी उघडू चला..!!!"

गणेशोत्सवानिमित्त मायबोलीच्या विस्तारित परिवारासाठी एक नवीन स्पर्धा!!

१३ वर्षांपूर्वी मायबोली सुरु झाली तेंव्हा बहुतांश मायबोलीकर एकटेदुकटे होते. पण काळ सरला तसे बर्‍याच मायबोलीकरांचे दोनाचे चार हात झाले. अन आता तर त्यांच्या संसार वेलींवर फुलेही उमलू लागली.

मायबोली आता आपले दोन्ही हात पसरून या छोट्यांना आपल्यात सामावून घेत आहे.

गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच मायबोलीकरांच्या चिमुकल्यांसाठी खास चित्रकला स्पर्धा!!

*******************************************************

विषय: 
Subscribe to RSS - चित्रकला स्पर्धा