उपक्रम
शशक १ - सुपारी - उपाशी बोका
शाळेच्या २५ व्या रियुनियनला समीर पुन्हा भेटला मोनिकाला. त्याला बघताच तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. अजूनही तसाच चिकना होता तो, शिवाय आतातर प्रख्यात बिझनेसमॅन. आता मात्र त्याला काबीज करणारच माझ्यासाठी. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू झाला त्याच्या बायकोचा काटा काढायचा. पॅरोलवर सुटलेल्या मन्याला सुपारी दिली तिने, २ लाखाची.
चार दिवसांनी मन्या आला मोनिकाकडे.
मी गेलो होतो समीरच्या बंगल्यावर. काम झालंय पण एक प्रॉब्लेम आला वाटेत.
काय झालं?
मी तिला गोळी मारली तितक्यात तिचा नवरा आला रूममध्ये. त्याने बघितलं मला.
.
शशक -१ – कोडं- केशवकूल
तवा तो एका कंपनीत म्याणेजर व्हता. सकाळी उठला, आवरलं आणि गेला ऑफिसात. सरळ जाऊन बसला आपल्या केबिन मध्ये.
शर्लीला बोलावले, म्हणाला, “अर्जंट लेटर हाय. डीक्टेशान घे.”
आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.
वाईच पानी पिऊन येते म्हणाली आणि गुल झाली,
म केशव आला, म्हणाला,”सर, हे कोड मी लिहिलंय, ते जरा बघशीला का.”
“ते कोड बाजूला ठेव, आधी माझं कोडं सोडव. ती शर्ली अशी भूत बघितल्यावाणी चेहरा करून गेली. काउन बे? मला काय शिंगं फुटलीयात का मिडासराजावानी गाढवाचे कान उगवले हैत? पिनोशेठ सारखे नाक झाले आहे? ह्ये कोडं आधी सोडव.”
शशक- १- देवमाणूस - देवासारखा धावून आलेला माणूस! - छंदीफंदी
सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती.
शशक - १ - टेरिफ -सामो
-- चॅटजीपीटी ची मदत घेतलेली आहे.
-------------------------------------------------------
एकदा ट्रंप कसा कोण जाणे स्वर्गात गेला आणि गेल्या गेल्या पर्ली गेटच्या मोत्यांवर, देवदूतांच्या हार्पवर, ढगांवर जबरी टेरिफ लावुन त्याने स्वर्गाची अर्थव्यवस्था पार कोसळवुन टाकली .
शशक लेखन स्पर्धा ३
नमस्कार मायबोलीकरांनो,
गेली कित्येक वर्षे मायबोली वरच्या प्रत्येक उपक्रमाचा अविभाज्य घटक म्हणजे शशक.
या वर्षी आम्ही तुम्हाला फक्त एक वाक्य देणार आहोत. ते वाक्य शशक मधे यायला हवे एवढीच अट आहे. फक्त शशकसाठी दिलेले वाक्य बोल्ड मात्र आठवणीने करा.
शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.
तिसऱ्या शशक स्पर्धेसाठी वाक्य आहे " हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही? ”
शशक लेखन स्पर्धा २
नमस्कार मायबोलीकरांनो,
गेली कित्येक वर्षे मायबोली वरच्या प्रत्येक उपक्रमाचा अविभाज्य घटक म्हणजे शशक.
या वर्षी आम्ही तुम्हाला फक्त एक वाक्य देणार आहोत. ते वाक्य शशक मधे यायला हवे एवढीच अट आहे. फक्त शशकसाठी दिलेले वाक्य बोल्ड मात्र आठवणीने करा.
शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.
दुसऱ्या शशक स्पर्धेसाठी वाक्य आहे " मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!”
लहान मुलांचा उपक्रम - बाप्पासाठी ओरिगामी
काय छोट्या मित्रांनो कसे आहात?
हसताय, खेळताय, बागडताय ना?
मागच्या वर्षी तुम्ही सगळ्या उपक्रमातून भाग घेतला होता. सगळ्यांच्या अंगी असलेल्या कला बघून आम्हाला फार छान वाटले. तुमच्या अंगी असलेल्या कला अशाच जोपासत रहा हं. अभ्यासाच्या रगाड्यात त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष नका करू.
मायबोली गणेशोत्सव २०२५ श्री गणेश प्रतिष्ठापना

नमस्कार मायबोलीकरहो!!
जगातील सर्व मराठी बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतात तो दिवस आलाय. आज गणेश चतुर्थी आणि त्यानिमित्ताने आपल्या मायबोलीवर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे मायबोली गणेशोत्सवाचे २६वे वर्ष. सर्व मायबोलीकरांना या मंगलमय गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!