उपक्रम

स्मरण साहित्यिकांचे

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 26 February, 2023 - 23:25

नमस्कार मायबोलीकर.

यंदा ज्यांची जन्मशताब्दी आहे, अशा काही साहित्यिकांचे स्मरण केल्याशिवाय मायबोलीचा मराठी भाषा गौरव दिन उपक्रम पूर्ण होणार नाही.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन - स.न.वि.वि. - प्राचीन

Submitted by प्राचीन on 26 February, 2023 - 11:41

सप्रेम नमस्कार.
{मनातील} 'भया' स,
अगदी नाईलाज झाला , म्हणून तुला मनातलं सांगण्याचा हा रस्ता निवडला. अरे, तुला वाटेल , की जन्मापासूनच आपण सोबत आहोत, तर हे कानामागून घास घेणं कशाला? पण मला, आपलं दोघांचं सतत एकत्र असणं जरा जाचक होऊ लागलंय आणि हे असं राहण्याची खरोखरच गरज आहे का हे स्वतःला आणि तुला विचारण्यासाठी हा टेकू..
तुझं - माझं माझ्या लहानपणापासूनचं मैत्र. मला ते कधी समजलं..तर जेव्हा घरीदारी "प्राची ना अगदी भित्री" असं कानावर पडू लागलं तेव्हापासून. खरंच का मी घाबरट होते? हो बहुतेक. माझ्या भीतीचा पल्ला तरी किती होता... किंवा आहे म्हणायला हवं खरंतर..

मराठी भाषा गौरव दिन-स.न.वि.वि.- दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 February, 2023 - 09:37

राजमान्य राजेश्री श्रीमंत बळीराजा
सेवेशी सादर प्रणाम,

विषय: 
शब्दखुणा: 

मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - पायस - हिरवं कुंकू

Submitted by पायस on 25 February, 2023 - 18:52

भारतातील आद्य चित्रपटसृष्टी असूनही जुने विनोदी चित्रपट वगळता मराठी चित्रपटसृष्टी ही आंतरजालावर काहीशी दुर्लक्षितच राहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट आणि मराठी चित्रपट यामध्ये हे विलक्षण साम्य आहे - काय ते ७०-८० च्या दशकातले वेगवान गोलंदाज होते/काय ते ७०-८० च्या दशकातले खळखळून हसवणारे विनोदी चित्रपट होते! अस्मादिकांच्या मते याचे एक कारण आपले अनेक पटकथाकार अमूर्त अभिव्यक्तीवादी (abstract expressionist) आहेत.

मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - स्वाती_आंबोळे - कुंकू

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2023 - 16:06

चित्रपटाची सुरुवात होते ती लहान मुलांनी बसवलेल्या संगीत शारदेच्या प्रयोगाने. 'म्हातारा इतुका न, अवघे पाऊणशे वयमान' हे औपरोधिक पद संपते, छोटी शारदा 'विंगेतून' बाहेर येते आणि आपल्या खेळगड्याने लावलेली पांढरी मिशी पाहून गडबडते. 'मी नाटकातसुद्धा म्हातार्‍याशी लग्न करणार नाही!' असे जाहीर करून रडू लागते. 'आमच्या मुख्य नायिकेची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे' नाटकावर पडदा पडतो आणि 'पुढच्या वर्षी याच तिकीटावर हेच नाटक दाखवू' असे आश्वासन देण्यात येते.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया- वावे- चित्रपट वास्तुपुरुष

Submitted by वावे on 25 February, 2023 - 13:26

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने जे अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले, त्यांपैकी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट म्हणजे ’वास्तुपुरुष’. यातले प्रमुख कलाकार आहेत उत्तरा बावकर, सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रेणुका दफ्तरदार आणि सिद्धार्थ दफ्तरदार.

डॉ. भास्कर नारायण देशपांडे (महेश एलकुंचवार) यांना ’प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’ या क्षेत्रात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत केलेल्या कामासाठी मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो, या बिंदूवर हा चित्रपट सुरू होतो आणि मग डॉ. भास्कर देशपांड्यांच्या स्मृतींमधून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.

मराठी भाषा गौरव दिन - किलबिल किलबिल चित्रे डोलती - स्वाती_आंबोळे - गौरी आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2023 - 10:37

पाल्याचे नाव : गौरी आंबोळे
वय : वट्ट दहा
चित्राचे माध्यम : डिजिटल (प्रोक्रिएट अ‍ॅप)
कविता : फुलपाखरू छान किती दिसते

Gauri_mabhaadi.jpg

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन - स.न.वि.वि. - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 February, 2023 - 09:47

प्रिय प्लूटो,

स.न.वि.वि.

तुला लिहायची ही माझी पहिलीच वेळ. परवा माझ्या मुलीशी झालेल्या खगोलशास्त्रासंबधीच्या चर्चेत (चर्चा म्हणजे ज्यात ती बोलते आणि मी श्रवणभक्ती करते, असा एकतर्फी संवाद) तुझा उल्लेख आला आणि योगायोगाने तेव्हाच मायबोलीवर संयोजकांनी कोणालाही पत्र लिहायची परवानगी दिली म्हणून ही संधी घेत आहे.

तू ग्रह आहेस असा खगोलशास्त्रज्ञांचा ग्रह झाला तेव्हा, म्हणजे १९३० साली मीच काय, माझे आईबाबादेखील जन्माला आले नव्हते. आणि परवा २००६ साली तुझे ग्रह पालटले तेव्हा माझं वय... जाऊ दे, तुला पृथ्वीवरची कालगणना कळणार नाही.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. – शर्मिला र.

Submitted by SharmilaR on 25 February, 2023 - 00:39

मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. – शर्मिला र.

प्रिय बाबा,
स. न. वि. वि.

किती वर्षांनी मी असं पत्र.., असा मायना लिहितेय! किंबहुना, कुठलंही घरगुती पत्रच किती वर्षांनी लिहितेय मी! आज तुम्ही हे वाचू शकला असतात, तर कित्ती बरं वाटलं असतं तुम्हाला. समाधानाचा निश्वास सोडला असतात तुम्ही. पण मला हे कळून यायला मधे खूप वर्ष जावी लागलीत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - उपक्रम