नमस्कार मायबोलीकरांनो,
गेली कित्येक वर्षे मायबोली वरच्या प्रत्येक उपक्रमाचा अविभाज्य घटक म्हणजे शशक.
या वर्षी आम्ही तुम्हाला फक्त एक वाक्य देणार आहोत. ते वाक्य शशक मधे यायला हवे एवढीच अट आहे. फक्त शशकसाठी दिलेले वाक्य बोल्ड मात्र आठवणीने करा.
शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.
तिसऱ्या शशक स्पर्धेसाठी वाक्य आहे " हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही? ”
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता २७ ऑगस्ट खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०२५' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२५' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२५ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - शशक - ३- {कथेचे शीर्षक } - {तुमचा आयडी}"
५. प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख रविवार सप्टेंबर ७, २०२५ वेळ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
६. स्पर्धेचे विजेते मतदानाने निवडण्यात येतील.
७. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति
अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् ।
अयोग्यः शशको नास्ति संयोजकस्तत्र दुर्लभः ॥
असे दुर्लभ संयोजक आम्हाला भेटले आहेत.
ही स्तुति आहे बरका. नाहीतर तुम्ही ...
हे माझे द्विशशक होऊन गेले आहे. तिथून कॉपी पेस्ट केले तर चालेल काय?
केकू
केकू

अरे हे काय.. संयोजकांनी
अरे हे काय.. संयोजकांनी स्वतःवरच वाक्य दिले.
मी किंवा माझा कुठलाही आयडी संयोजकात नाहीये हे आधीच क्लिअर करतो
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
मायबोलीच्या नीतिशशकात हे बसते.
इतकं मनाला लावुन घेवु नये
इतकं मनाला लावुन घेवु नये संयोजक.