Submitted by उपाशी बोका on 28 August, 2025 - 11:30
शाळेच्या २५ व्या रियुनियनला समीर पुन्हा भेटला मोनिकाला. त्याला बघताच तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. अजूनही तसाच चिकना होता तो, शिवाय आतातर प्रख्यात बिझनेसमॅन. आता मात्र त्याला काबीज करणारच माझ्यासाठी. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू झाला त्याच्या बायकोचा काटा काढायचा. पॅरोलवर सुटलेल्या मन्याला सुपारी दिली तिने, २ लाखाची.
चार दिवसांनी मन्या आला मोनिकाकडे.
मी गेलो होतो समीरच्या बंगल्यावर. काम झालंय पण एक प्रॉब्लेम आला वाटेत.
काय झालं?
मी तिला गोळी मारली तितक्यात तिचा नवरा आला रूममध्ये. त्याने बघितलं मला.
अरे मूर्खा, म्हणजे तू आणि मी आता जाणार जेलमध्ये!!
काळजी नको मॅडम, मी त्याला पण टपकवलाय.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आई ग्ग!!! खतरनाक!!!
आई ग्ग!!! खतरनाक!!!
जबरी उबो !!
जबरी उबो !!
भारी आहे. धक्कादायक
भारी आहे. धक्कादायक
छान आहे शशक.
छान आहे शशक.
अरेरे अरेरे . मग आता?
अरेरे अरेरे .
मग आता?
छान
मग आता?
मग आता?
>>>>
आता काही नाही.. तिने त्या सुपारीवाल्याशीच लग्न करावे म्हणजे दोन लाख तरी वाचतील..
छान आहे शशक
छान आहे शशक