भविष्य

ज्योतिष आणि शरीर .......

Submitted by y2j on 12 February, 2016 - 06:57

ज्योतिष आणि शरीर.....
जातकाचे रंग रुप हे चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग व
चंद्र व लग्न नक्षत्रावर अवलंबुन असते .
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना त्यामधील समजलेले काही ग्रहयोग.
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
2. चंद्राबरोबर शनि असल्यास किंवा चंद्रावर द्रुष्टी टाकत असल्यास व जेव्हा चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .

विषय: 

आपली मायबोली भविष्यात कशी असेल?

Submitted by पियू on 21 January, 2016 - 08:49

नमस्कार मायबोलीकरहो..

इथे असणार्‍या बहुतेकांना मायबोलीचा (म्हणजे मायबोली डॉट कॉमचा) लळा आहे.. जिव्हाळा आहे..
इथे एक आपलेपणा वाटतो.. मातृभाषेत गप्पा मारता येतात, धीर देता येतो, मदत करता आणि मागता येते, भांडता येते, लिहिता येते, वाचता येते आणि बरेच काही.. आपण सारे कितीही भांडलो तरी मायबोलीच्या या कुटुंबाचा भाग आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे. आपण इथे (मायबोलीवर) कसे आलो, का आलो, का आहोत, आपल्याला मायबोली का आवडते यावर बराच काथ्याकुट झाला आहे.. होतो आहे..

विषय: 

गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!

Submitted by निमिष_सोनार on 15 January, 2016 - 07:38

नऊ ग्रह आणि त्यांचे कुंडलीतील स्थान व त्यानुसार फलित याबद्दल सखोल ज्ञान ज्योतिष शास्त्रात उपलब्ध आहे. पण, त्या तुलनेत हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तीन गूढ आणि हटके गुणधर्म असलेल्या ग्रहांबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे असे वाटते. तसेच, त्यांच्या कारकत्वा बद्दल सुद्धा ज्योतिष्यां मध्ये संभ्रम आढळतो. कुणी जाणकार ज्याने या तीन ग्रहांच्या गुणधर्माचा, कारकत्वाचा आणि स्थान निहाय फळाचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्याने येथे आपले ज्ञान येथे वाटावे. फल ज्योतिष अभ्यासक मंडळीना त्याचा नक्की ज्ञान वाढवण्यास उपयोग होईल. नेपच्यून हा अंतरस्फुर्ती आणि स्वप्नांद्वारे दृष्टांत देणारा ग्रह आहे का?

विषय: 

वझीर.. खेल खेल मे..!!

Submitted by उदय८२ on 11 January, 2016 - 08:46

खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.

बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.

शब्दखुणा: 

कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य!

Submitted by निमिष_सोनार on 7 January, 2016 - 04:57

दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!

मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! सृष्टीचे चक्र बिघडल्याने आता सरासरी रोज पाऊस पडायचाच!!

त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"

नवीन धागा काढताना One time password आवश्यक केले तर

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 23 December, 2015 - 06:05

सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते??

मासिक भविष्य डिसेंबर २०१५

Submitted by पशुपति on 30 November, 2015 - 10:30

राशिभविष्य डिसेंबर २०१५
(के. पी. पद्धतीप्रमाणे)
(खालील राशी भविष्य अॅस्ट्रॉलॉजी काउन्सेलिंग तर्फे देण्यात आलेली आहेत.)
(टीप:सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा.)

विषय: 

तडका - सल्ले

Submitted by vishal maske on 29 November, 2015 - 21:25

सल्ले

कधी फूकटचे असतात
कधी विकतचे असतात
असे एकमेकांना सल्ले
अगदी निकटचे असतात

कधी सल्ले महत्वाचे
कधी कल्ले असतात
तर कधी सल्ल्या मार्फत
घमासान हल्ले असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - भविष्य