प्लुटो

कॉमिक्स चे भावविश्व

Submitted by Sanjeev.B on 28 December, 2016 - 03:29

तर मित्रांनो (आणि मैतरणिंनो सुध्दा बरं का) , शिर्षक वाचुन बालपणीच्या रम्य दिवस आठवले असणार ना, हो हो फॅण्टम, मँड्रेक द मॅजिशियन, लोथार, फ्लॅश गॉरडन, रिप किर्बी, रिची रिच आणि कॅडबरी, ही मॅन आणि our very own Indian comic heroes, बहादुर, चाचा चौधरी आणि साबु, पिंकी, सुप्रिमो, शिकारी शंभु, सुप्पंडी, हे सर्वजण आपले लहाणपणी चे भावविश्व व्यापुन टाकले होते. कधी पॉकेट मनी वाचवुन कॉमिक्स खरेदी करायची, तर कधी मित्रा कडे असणारे कॉमिक्स एक्सचेज करायचे. रेल्वे स्टेशन वर गेले की हमखास कॉमिक्स खरेदी व्हायची.

विषय: 

गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!

Submitted by निमिष_सोनार on 15 January, 2016 - 07:38

नऊ ग्रह आणि त्यांचे कुंडलीतील स्थान व त्यानुसार फलित याबद्दल सखोल ज्ञान ज्योतिष शास्त्रात उपलब्ध आहे. पण, त्या तुलनेत हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तीन गूढ आणि हटके गुणधर्म असलेल्या ग्रहांबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे असे वाटते. तसेच, त्यांच्या कारकत्वा बद्दल सुद्धा ज्योतिष्यां मध्ये संभ्रम आढळतो. कुणी जाणकार ज्याने या तीन ग्रहांच्या गुणधर्माचा, कारकत्वाचा आणि स्थान निहाय फळाचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्याने येथे आपले ज्ञान येथे वाटावे. फल ज्योतिष अभ्यासक मंडळीना त्याचा नक्की ज्ञान वाढवण्यास उपयोग होईल. नेपच्यून हा अंतरस्फुर्ती आणि स्वप्नांद्वारे दृष्टांत देणारा ग्रह आहे का?

विषय: 

प्लुटोनिया...

Submitted by अतुल. on 20 July, 2015 - 13:44

आयुष्य प्लुटो सारखं जगावं.
कुणी येतात शोध घेतात
नवीन मित्र सापडला म्हणतात
मोठे नाव सन्मान देतात.
.
कालांतराने, "हा तर खूप छोटा" म्हणतात.
"मित्र व्हायच्या लायकीचा नाही" म्हणतात.
पुन्हा जवळून येऊन निरखून जातात
"काय करावे याचे" बोलतात.
.
हा लहान तो मोठा करणारे
द्विधा मनाचे छोटे छोटे जीव.
.
असो. त्यांचे त्यांच्यापाशी.
अनेक येतील. अनेक जातील.
आपण मात्र आपले, सूर्य रुपी
ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं.
.

शब्दखुणा: 

प्लुटो मोहिमेच्या निमित्ताने...

Submitted by अतुल. on 18 July, 2015 - 16:27

ध्या प्लुटोच्या जवळून नासाचे न्यू होरीझॉन्स हे यान जात आहे. त्याने पाठवलेली काही छायाचित्रे आपण पहिली. या मोहिमेच्या निमित्ताने...

Subscribe to RSS - प्लुटो