राहू या ग्रहाचे विलक्षण व्यक्तिमत्त्व.
एखादे निर्जन ठिकाण, जिथे दूर-दूर पर्यंत एकही घर नाही, रस्ता कच्चा आहे, ते ठिकाण एकदम सुनसान आहे, एकाकी आहे, शांत आहे, तिथे राहूचा वास आहे.
जिथे कोणतीही पिके घेता येत नाहीत, जिला बंजर जमीन, नापीक जमीन असे म्हणतात, ते स्थान राहूचे आहे.
असे झाड ज्यावर कोणतेही फूल नसते, फळे येत नाहीत एखादे फूल येते पण लगेच कोमेजते, झाडावर एकही पान नसते, ते झाड राहूचे आहे.
अर्धवट बांधलेले घर, ज्याला कोणी वाली नाही, तिथे राहूचा वास आहे.
शरीराच्या गुप्त भागावर राहूची सत्ता आहे. घरातील शौचालय राहू आहे.गल्लीत जिथे कचरा फेकला जातो, ते राहूचे स्थान आहे.
तुमच्या गल्लीचे शेवटचा टोक जिथे एक गल्ली संपून दुसऱ्याची सुरुवात होते ते राहू आहे.
राज्याची किंवा देशाची सीमा, जिथून दुसऱ्या राज्याची किंवा देशाची सुरुवात होते ती सीमा राहू आहे.
राहू काल काहीही असला तरीही दुपारची वेळ राहू आहे.
ज्या जागेवर गेल्यानंतर विचित्र वाटू लागते अशी जागा जिथे कोणाचे येणे जाणे एकदम शून्य आहे ती राहूची जागा आहे.
उलटून वाचली जाणारी पुस्तके, उलटलेले लिखाण, उर्दू भाषेतले शब्द राहू आहे.
विमान प्रवासावर राहूचा अंमल असतो.
घरातील वयोवृद्ध म्हणजे राहू.
तुमच्या घरापासून दूर एका अशा ठिकाणी, जिथे मोकळे मैदान आहे, जिथे एकदम नीरव शांतता आहे, तिथे राहू आहे.
जिथे दूर-दूरपर्यंत फक्त शेत आहे, आणि ते शेतही असे जिथे कोणतेही पीक नाही, जर चुकून एखादे झाड दिसले तर ते झाड ज्यात एकही फळ नाही, दूर-दूरपर्यंत फक्त शांतता...ना घर...ना मंदिर...फक्त चारही बाजूला ओसाड जमीन...आणि त्याच्या मध्यभागी तुम्ही उभे आहात.. आणि दुपारचा वेळ आहे तिथे राहू आहे...
शहरातील स्मशानभूमी राहू आहे.
खाण्यात मैद्यापासून बनवलेल्या सर्व पदार्थात राहू आहे.
खोटे नाणी, विदेशी चलन राहू आहे.
कुंडलीतील आठवे घर राहूचे आहे.
कत्तल खान्यात, जिथे प्राण्यांची हत्या होते ते ठिकाण राहूचे आहे.
तुमच्या पाठीमागे चाललेले षडयंत्र हे राहू आहे.
अचानक प्रसिद्ध झालेला एक सामान्य व्यक्ती राहू आहे.
अत्यंत उच्च पद राहू मुळे आहे.
बेहद्द संपत्ती राहू देतो.
उत्साहाने भरलेले जीवन, अत्यंत आनंदाचा क्षण राहू मुळे आहे.
तुमच्या कल्पनेच्या मर्यादेपलिकडचा विचार राहू आहे.
नात्यात सासर राहू आहे.
लहान उंची राहू आहे, चेहऱ्यावर देवीचे डाग म्हणजे राहू.
अशा रोगांबद्दल ज्याबद्दल सांगता येत नाही, गुप्त रोग राहू आहे.
तुमच्या वयापेक्षा जास्त वयाच्या लोकांसोबत असलेले संबंध राहू आहे.
अमाप पैसा देणारा राहू आहे, इतकी संपत्ती की मोजण्यासाठी यंत्र देखील कमी पडेल, ते देखील राहू आहे.
इतकं दु:ख जे शब्दांत मांडता येणार नाही ते राहू आहे, इतका आनंद की डोळ्यांतून अश्रू ओघळतील तेही राहू आहे.
लांब प्रतीक्षेनंतर मिळालेला आनंद देखील राहू आहे.
कारण नसताना मिळालेली शिक्षा राहू आहे, मेहनत न करता मिळालेलं यश देखील राहू आहे.
अकाली मृत्यू राहू आहे, आणि शतकावधी पूर्ण आयुष्य, अत्यंत मोठे आयुष्य देखील राहू आहे.
अत्यंत भोग कामवासना मध्ये बुडलेली व्यक्ती राहू आहे, सिद्ध तांत्रिक आणि अघोरी ही राहूची व्यक्तिमत्वे आहेत.
पूर्ण मूर्ख आणि निरक्षर राहू आहे, तर असं संशोधन जे इतिहास घडवेल ते देखील राहू आहे.
सफरचंद जमीनवर पडते आकाशावर का पडत नाही? ही जिद्द आणि वेडेपणा ज्यामुळे गुरुत्वाकर्षण नियमाचा शोध लागला तेही राहू आहे.
पर्वत तोडून रस्ता तयार करणारा दशरथ मांझी, तोही राहू आहे.
नास्तिक राहू आहे, तर प्रचंड आस्था देखील राहू आहे.
दगडावर राम लिहून पाण्यावर तरंगवून समुद्रावर रस्ता तयार करणे देखील राहू आहे.
रस्त्यावरील ट्रॅफिक च्या समस्या टाळून ३० हजार फूट उंचीवर आकाशात उडणारे विमान घेऊन काही तासांत आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणे देखील राहू आहे.
१० उमेदवार असतील, आणि दहा ही पात्र असतील, योग्य असतील, परंतु विजेता एकच निवडायचा असेल तर तो एक जो आहे तो राहू आहे.
फुटबॉलमधील पेनल्टी शूटआऊट जेव्हा दोन्ही संघ समसमान असतात आणि निर्णय पेनल्टीने घेतला जातो, आणि एक जागतिक विजेता निवडला जातो ते देखील राहू आहे.
क्रिकेटमध्ये नो बॉलवर फ्री हिटचा षटकार राहू आहे...
पूर्ण शेअर बाजार राहू आहे.
मोहर्रमचे मातम राहू आहे.
लठमार होळी राहू आहे..
दिवसात दुपार राहू आहे, महिन्यात एप्रिल राहू आहे.
आकाशात काळे ढग राहू आहे.
उन्हातही सूर्य असावा, आणि पाऊसही चालू असावा हे दृश्य देखील राहू आहे.
अंतिम यात्रा आणि अंतिम संस्कार राहू आहे.
कलियुगात सर्वात प्रभावी राहू आहे.
….
राहू ग्रह आहे?
राहू ग्रह आहे?
छान लिहिले आहे. ज्याला
छान लिहिले आहे. ज्याला ज्योतिषशास्त्र समजते त्याला पटेल. पण काही गुणधर्म शनिशी जास्त जुळतात.
छान वर्णन केले राहू चे
छान वर्णन केले राहू चे
कॅसिनो खेळतात तिथं पण राहू
कॅसिनो खेळतात तिथं पण राहू आहे.
थोडक्यात राहू भुताटकी आहे.
थोडक्यात राहू भुताटकी आहे.
<<<झाडावर एकही पान नसते, ते
<<<झाडावर एकही पान नसते, ते झाड राहूचे आहे.>>>
म्हणजे इकडे ९० टक्के झाडॅ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत राहू असतात!
<<परंतु विजेता एकच निवडायचा असेल तर तो एक जो आहे तो राहू आहे.>>
म्हणजे कुठल्याहि निवडणुकीत विजयी उमेदवार राहू!
<<<अमाप पैसा देणारा राहू आहे, इतकी संपत्ती की मोजण्यासाठी यंत्र देखील कमी पडेल, ते देखील राहू आहे.>>>
मग राहू असले तर बिघडते काय?
राहू दे, राहू दे
राहू दे, राहू दे
धिस ईज डॅम इंटरेस्टिंग..
धिस ईज डॅम इंटरेस्टिंग..
मजा आली वाचायला. एका लयीत लिहिले आहे.
गूगल केल्यावर पहिलेच हे सापडले.
राहु और केतु, सूर्य और चंद्र के परिक्रमा पथों के काटने के दो बिंदु हैं.
ये दोनों ग्रह, पृथ्वी के सापेक्ष एक-दूसरे के विपरीत दिशा में होते हैं.
राहु और केतु, कोई खगोलीय पिंड नहीं हैं.
राहु, किसी एक राशि में करीब 18 महीने तक रहता है.
राहु को मायावी और उग्र ग्रह माना जाता है.
राहु की खास स्थिति में शुभ परिणाम मिलते हैं, वहीं खराब स्थिति में गंभीर परिणाम झेलने पड़ते हैं.
राहु के अशुभ होने के संकेतः नींद न आना, डरावने सपने आना, सोते समय बार-बार डर जाना, शरीर में कमज़ोरी या ज़्यादा आलस.
राहु को मज़बूत बनाने के उपायः ॐ रां राहवे नमः मंत्र जपना, नौ रत्ती का गोमेद अंगूठी में जड़वाना, दुर्गा चालीसा का पाठ करना, पक्षियों को बाजरा खिलाना, सप्तधान्य का दान करना.
म्हणजे राहू चांगला वाईट
म्हणजे राहू चांगला वाईट दोन्ही असू शकतो. त्याची स्थिती काय आहे यावर ते अवलंबून आहे.
घरातील वयोवृद्ध म्हणजे राहू.
>>>
हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे..
माझी दोन पोरे जेव्हा मला त्रास देतात तेव्हा मी म्हणतो कुठून हे राहू केतू आपल्या घरी जन्माला आले.
पण या लेखातील थिअरीनुसार राहू केतू आपले वृद्ध आईवडील असतात.
जोपर्यंत त्यांचे अवयव आणि इंद्रिय शाबूत आहेत तोपर्यंत ते आपले आयुष्य सुखकर आणि अनुभवसमृद्ध करतात. त्यानंतर वृद्धांचा त्रास सहन करावा लागतो.
इतक्या ठिकाणी राहू आहे हे
इतक्या ठिकाणी राहू आहे हे वाचून असं वाटलं की - आपण राहू तिथे राहू.
ल गांधीत राहु आहे
ल गांधीत राहु आहे
थोडक्यात, कशीही बनवाबनवी
थोडक्यात, कशीही बनवाबनवी म्हणजे राहू आहे
आता केतूबाबतची फेकाफेक
आता केतूबाबतची फेकाफेक येऊद्या
नासाचे यान याहूला वळसा घालून
नासाचे यान याहूला वळसा घालून जाणार आहे राहू वर.
Rahu is like saturn. "Shani
Rahu is like saturn. "Shani Vat Rahu, Kuja Vat Ketu"
<आता केतूबाबतची फेकाफेक
<आता केतूबाबतची फेकाफेक येऊद्या > तिरुपती इथून जवळच असणाऱ्या कालहस्ती या मंदिरात कुंडलीतल्या कालसर्प योगाची शांती केली जाते. माझ्या मेव्हण्याची अशी शांती ज्या गुरुजींनी कालहस्ती येथे नुकतीच केली त्यांचे नाव किरण जोशी. राहू ग्रहाची इथे लिहिलेली माहिती त्यांनी दिलेली आहे.
<आता केतूबाबतची फेकाफेक
<आता केतूबाबतची फेकाफेक येऊद्या > तिरुपती इथून जवळच असणाऱ्या कालहस्ती या मंदिरात कुंडलीतल्या कालसर्प योगाची शांती केली जाते. माझ्या मेव्हण्याची अशी शांती ज्या गुरुजींनी कालहस्ती येथे नुकतीच केली त्यांचे नाव किरण जोशी. राहू ग्रहाची इथे लिहिलेली माहिती त्यांनी दिलेली आहे.
Ketu is just a shadow to the
Ketu is just a shadow to the best of my knowledge. Science and critical thinking wapra. Kalsarp yog Shanti itself is a money making thing invented.