कुंडलीतील, व्यवसायाचे घर आणि वरुण ग्रह

Submitted by सामो on 9 January, 2024 - 07:53

----------------अन्यत्र पूर्वप्रकाशित-------------
चित्र आंतरजालावरुन साभार.
https://venuslotus.files.wordpress.com/2015/02/pisces-dreamy.jpg?w=346&h=481
.
तोया माझी एक बंगाली मैत्रिण आहे. ती एका मेटॅफिझिकल वस्तूंच्या, न्यु एज शॉपमध्ये काम करते. न्यु एज शॉप हे वरुणाचेच प्रोफेशन, अधिभौतिक, अध्यात्मिक आणि वलयांकित, सुंदर भवताल असलेले. तर तोयाला तुम्ही प्रथमदर्शनी पहाता तेव्हा ती कशी वाटते तर ती इन्ट्युइटिव्ह, वाटते, जिला तुमचे मूडस कळतात , जी लोकांचे मूडस सेन्स करते अशी. दयाळू.असे वाटते जणू तिच्या डोळ्यात आपण बुडून जाऊ किंवा जिच्याकडे पहात रहावेसे वाटते अशी. तसेच एक प्रकारचे ग्लॅमर असलेली, वलय असलेली, आणि तरीही अगदी हळूवार, सॉफ्ट म्हणजे जिला मदतीची गरज आहे अशी. म्हणजे तुमच्यातील प्रोटेक्टिव्ह इन्स्टिन्क्टस जागी करणारी. ती चालते तेव्हा वाटतं फ्लोट होतेय. Sort of she puts a spell on you. मंत्रमुग्ध करणारी, गोड्,फेमिनाइन येस्स्स १००% फेमिनाइन.
.
तर ती तशी खरोखर आहे का ही गोष्ट अलहिदा. ती तशी नाही बरं का. जिचा चंद्र मेषेसारख्या अग्नी राशीचा आहे ती आणि मदतीची गरज असलेली? यु आर किडींग! आणि ओह येस she does inherit notorious Arian temper. बरं वाटते तशी ती फक्त गोग्गोड बाहुली, आहे का तर नाही तिचा सूर्य आहे स्मार्ट एकदम सुपरस्मार्ट कुंभेचा, वायु राशीतील शेवटची रास कुंभ. वायु राशी या तार्किक, इन्टेलेक्च्युअल राशी आणि त्यात सर्वात शेवटची म्हणजे बुद्धीमत्तेचा अर्क अशी कुंभ रास. पण हा नेप्च्युनिअन प्रभाव तिच्यावरती आला कुठुन? तर तिच्या १० व्या घरात मीन रास आहे. १० वे घर जे कुंडलीतील सर्वात जास्त प्रकाशमान घर आहे. जिथे मध्यान्हीचा सूर्य तळपतो. जे घर आपण बाह्य जगतामध्ये कसे दिसतो, आपली प्रतिमा ठरविणारे घर. आपली प्रतिमा रेखाटण्यात ,लग्न स्थानाहूनही (लग्न म्हणजे कुंडलीतील प्रथम स्थान) अधिक महत्वचे १० वे घर समजले जाते.
.
मीन आणि मीन राशीचा अधिपती वरुण (नेपच्युन) म्हणजे ग्लॅमर, जादू, वलय. ग्लॅमर शब्दाचे मूळ आहे स्कॉटिश शब्द gramarye...म्हणजे चेटूक, जादूटोणा, मंत्रजाल. आभासी प्रतिमा परावर्तित करणे, ही वरुणाची कमाल. वरुण जो की जलाशयांचादेखील कारक आहे. शांत पाणी सूर्यप्रकाशात डुचमळलं की कसं झिगझॅग प्रतिमा दाखवतं,तळाचे शिंपले देखील आभासी परावर्तित होतात, वेडेवाकडे, चमकदार, होते की नाही जादू. तसा हा वरुण, तशी ही मीन रास ज्या घरात पडेल तिथे ग्लॅमर ओतणारी , Illusions, भास निर्माण करणारी. असा हा वरुण ग्रह किंवा मीन रास अभिनेते, गायक, यांच्या १० व्या घरात (रेप्युटेशन) पडलेली बरेचदा आढळते. पण हेच १० वे घर म्हणजे करीअरचे आपल्या उपजिवीकेचेही घर आहे. वरुण हा कमालीचा स्पिरिच्युअल ग्रह आहे. वरुण ज्या ग्रहाच्या सन्निध येतो, आस्पेक्टस मध्ये येतो त्या त्या ग्रहाचे शुद्धीकरण होते, Any planet visiting Neptune will come away purer. This planet cannot bear coarseness. तर करीअर च्या घरात म्हणजे १० व्या घरामध्ये ज्या व्यक्तींचा वरुण पडलेला आहे, त्या व्यक्तींना एक बुलावा/हाक/calling जाणवत असते. त्यांना कुणासतरी, एकंदर समाजास आपली मदत व्हावी असे वाटते.
.
नेप्च्युनिअन व्यक्ती विशेषतः शुक्र-वरुण संबंध ज्यांच्या कुंडालीत आहेत अशा व्यक्ती (जसे मीनेचा उच्चीचा शुक्र किंवा शुक्र-नेपच्युन आस्पेक्टस असलेली कुंडली किंवा १२ व्या घरात नेपच्युन पडलेली व्यक्ती) अशा व्यक्ती प्रेमात पडल्या की वरुण ग्रह पार जादू करुन टाकतो. मग illusion-disillusion चा खेळ सुरु होतो. वरुणाची खालची पातळी म्हणजे व्यसनाधीनता, अंमली पदार्थांवरती परावलंबित्व, अल्कोहोलिझम, ड्रग्स, एस्केपिझम आदि.
.
आता शेवटी नीना सिमॉनचे शॅमनिक, जादूटोणा वाले गाणे - आय पुट अ स्पेल ऑन यु बिकॉझ यु आर माइन: नीना जिची सूर्य रास आहे मीन, मंगळ्-वरुण युती ( अतिरिक्त माहीती - चंद्ररास आहे मकर व शनि आहे लग्नी)-
.
https://www.youtube.com/watch?v=ua2k52n_Bvw

Group content visibility: 
Public - accessible to all site users