पहिला स्पर्श... पावसानंतरचा
बघ ना आज पण पाऊस पडला न तुझी आठवण आली ,
आठव ना, आपण सोमेश्वरला गेलेलो तू आली होतीस एक दीड तासाने college road वर तुझ्या मैत्रिणीला railway स्टेशन वर सोडून मी वाट पाहत होतो तुझी पाऊस पडून गेलेला होता नुकताच...
तो एक दीड तास पण मला एखाद्या जन्मासारखा वाटला कोणतीही activa येवो चालवणारी तूच आहेस का बघत होतो, पण तू आलीस न ठरले जाऊ सोमेश्वर...सोमेश्वर ला पोहचल्यावर आपण घेतलेली गुलाबाची फुले (अजून पण आहेत का ग ते तुझ्याकडे) ..
किती गप्पा मारल्या ना आपण त्या 2-3 तासाच्या भेटीत आता तर मला आपण काय बोललो हेही आठवत नाही कारण तू माझ्या सोबत आहे, तू माझ्याशी बोलत आहेस यातच इतका आनंद झालेला मला की काय ऐकतोय, काय बोलतोय काहीच आठवत नाही आता, तुझ्याकडेच एकटक पाहत होतो मी, सोमेश्वरचा महादेव साक्षी आहे यासाठी , जा विचार त्याला....
शेवटी तूच म्हणालि चल निघुया घरचे वाट पाहत असतील ?
न निघालो आपण, आठवतेय तुला?
आपण बसलेल्या त्या खडकाला समजल्या असतील माझ्या मनाला न पायाला कीती त्रास होतोय असे आपण निघून जातांना, तू अशीच बोलत बसावी न मी असच ऐकत रहावं अशी त्या खडकाची पण इच्छा होती न माझी पण, जाऊदे राहूदे त्या आठवणी त्या खडकाच्या त्याच्याजवळ न माझ्या माझ्याजवळ.....
पाऊस पडल्यामुळे झालेला चिखल, न त्यातून वाट काढणारे आपण, मी तर तू माझी नाही होणार कधी या विचारात भरभर चालत होतो , मध्येच झालेला चिखल न त्यातल्या ठेवलेल्या दगडांवरून वाट काढत, अश्याच एका दगडावरून तोल जाणार तुझा या भीतीने तू आवाज दिलेला मला आठवतंय तुला? काही सुचलेच नाही मला स्तब्ध उभा होतो मी काही क्षण.........
नुसता उभाच राहणार आहेस की हात देणार आहेस मदतीला ? असे तू विचारलेस..
पहिला स्पर्श ना तो आपला इतक्या भेटीनंतर हातात हात, तुझा तो हात सोडूच नये असे वाटत होते, पण काय करणार घरच्यांच्या आकांक्षा, त्यांचे दडपण, मनाचे बंधन यांच्या विचारात नकळत तुझा हात सुटला तो सुटलाच....
आठवतेय ना, जातांना तू तुझी bike मला चालवायला दिलीस, मी खोटंच म्हणालो एक दोनदा मला नाही येत bike चालवता, तूच चालव तुझी bike, पण तुझा हट्ट म्हणून मी घेतली bike चालवायला पण खरे सांगू मी स्वतः bike चालवण्यापेक्षा मला side mirror मध्ये तुझ्या चेहरा झाकलेल्या स्कार्प मधून डोकावणाऱ्या डोळ्यांना, त्यात तुझ्या लपलेल्या चेहऱ्याला पाहण्यात खूप आनंद वाटायचा, न त्यांनतर खालेला पिझ्झा college road ला , माझ्या आयुष्यातील पहिला पिझ्झा मी खालेला तुझ्या सोबत नंतर पिझ्झा कधी खाल्लाच नाही मी.. तुला नंदन ची पाणीपुरी खायची होती पण माझा पुण्याला जायच्या बस चा time होत आलेला, मला घरी जाऊन जेवण करून घरच्यांसोबत जरा time spend करायचा होता म्हणून मी घाई करत होतो म्हनुन नाहि जमले (त्यानंतर नाशिक आल्यावर कितीतरी वेळेस नंदन ची पाणीपुरी मी एकट्यानेच खालीय आता सांगून काय फायदा ? )...आईवडील त्यांच्या अपेक्षांचे ओझे पण होते ना माझ्या खांद्यावर त्यांच्यासाठीच मी तुला वाहवत गेलो माझ्या अश्रुंमधून,पन आता आठवण येतेय बघ तुझी खूप....
#पाऊस
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
mast.....
.....
छान लिहील आहे. पण मध्ये
छान लिहील आहे. पण मध्ये येणारे ग , रे चक्रावतायत. शुद्धलेखनही पाहून परत एडीट करा.
काय बोलतोय काहीच आठवत नाही रे,
माझ्या आयुष्यातील पहिला पिझ्झा मी खालेला तुझ्या सोबत नंतर पिझ्झा कधी खाल्लाच नाही रे मी..
पण माझा पुण्याला यायच्या बस चा time होत आलेला ग,
thank u @jaagu......
thank u @jaagu......
its ma 1st time, nxt time will take care.....
हेमंत..आताही एडिट करता येतं
हेमंत..आताही एडिट करता येतं की....फर्स्ट टाईम म्हणून चुका तशाच ठेवू नका! आम्हालाही वाचता वाचता समजेना कोण बोलतंय अन काय बोलतंय !!!!
छान! जागू ताईंच्या मताशी सहमत
छान! जागू ताईंच्या मताशी सहमत.. वाचत असताना मी ही तोच 'रे' चा बदल सुचवणार होतो.
पुलेशु.
हेमंत..आताही एडिट करता येतं
हेमंत..आताही एडिट करता येतं की....फर्स्ट टाईम म्हणून चुका तशाच ठेवू नका! + १
@आंबट गोड , @र।हुल, @जागू....
@आंबट गोड , @र।हुल, @जागू.....
एडिट केलेय बघा जम्लय का......
वाह.. एकदम फ्रेश वाटतंय लिखाण
वाह.. एकदम फ्रेश वाटतंय लिखाण.. आणखी येऊ दे।।
बदल केलांत! छान..
बदल केलांत! छान..