मागे वळुन पाहताना..

Submitted by मन्या ऽ on 9 March, 2020 - 01:11

मागे वळुन पाहताना..

मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना

मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना

मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना

मागे वळुन पाहताना
ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे
पाहिले मी मुखवटे
एकावर एक चढवताना

मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना

मागे वळुन पाहताना
ते स्पर्श सहन करताना
पाहिले आहे मी
स्वतःलाच तीळ तीळ तुटताना

मागे वळुन पाहताना
रोज रोज मरताना
पाहिले आहे मी स्वतःलाच
नैराश्याच्या खाईत झोकताना

मागे वळुन पाहताना
आजही जाणवतो तो कोमल
हातांचा स्पर्श;
केसांमधुन फिरलेला
प्रेमाने ओथंबलेला

मागे वळुन पाहताना
तो स्पर्श अनुभवताना
रोखते. अन्
हात देते स्वतःलाच
जगु पाहते पुन्हा एकदा
ती जळमटे दुर करुनी
शोधते मी स्वतःलाच..

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ...

आवडली.
>>>>>मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना>>>> पटले नाही.
बाकी सर्व कडवी आवडली पण हे एक पटले नाही.

VB, अज्ञा, स्वामिनी, आनंद, डॉ.काका, कुमारदा,सामो, चिन्नु प्रतिसादासाठी सर्वांचे खुप खुप धन्यवाद! Happy Happy

@सामो, तुला कडव पटल नाही.. तुझ्या मताचा आदर आहे. Happy

असच हक्काने तुला आणि इतर वाचकांना कवितेत काही खटकल/ पटल नाही तर सांगत जा. चुका असतील आवर्जुन सांगा. मी हळुहळु शिकतीये. आणखी इंप्रुव्ह करायला नक्कीच आवडेल.. Happy