गादीवरची चादर बदलत बदलत दोघे बोलत होते.
ती: अरे माहित्येय का त्या प्रज्ञाच्या नवऱ्याने तिला बड्डे गिफ्ट दिलंय, सरप्राईझ. काय असेल गेस कर?
तो: (खोट्या उत्साहाने) काय गं?
ती: अरे नेकलेस आहे डायमंडचा, तीनेक लाखाचा असेल तरी. भारी आहे ना? मला आवडतात असे सरप्राईझ. थांब तुला दाखवते.
गादीवर बसून मग तिने Whats App वरून तो फोटो दाखवला.
ती: छान आहे ना?
तो: हो पण इतका महाग असेल असं वाटत नाही.
ती: अरे डायमंड आहेत ते, चमकत होते एकदम.
तो: मला असले महागडे गिफ्ट देणे म्हणजे वेडेपणा वाटतो.
ती: हो, तुझं आपलं नेहमीचंच. मी कुठे मागितलाय?
तो: मागू पण नकोस.
ती: पण, तुला कधी इच्छा होईल का? असा वेडेपणा माझ्यासाठी करायची?
तो: आपली ऐपत आहे का असले गिफ्ट घ्यायची?
ती: अरे मी कुठे म्हणत्येय घे म्हणून. मी म्हणत्येय की तुला माझ्यासाठी असा वेडेपणा करावासा वाटेल का?
तो: माझं प्रेम दाखवण्यासाठी इतके पैसे खर्च करायची गरज नाहीये.
ती: (आता चढलेल्या आवाजात) मी काय म्हणतेय ते कळतंय का तुला? समज आपल्याकडे खूप पैसे आहेत किंवा नसतीलही, पण माझ्या प्रेमासाठी किंवा हट्टासाठी काहीतरी असे करायची तुझी इच्छा होईल का?
तो: (वैतागून) समज आपल्याकडे पैसे असले तरी ते असे खर्च करणे म्हणजे वेडेपणाच आहे. तुला नाही का वटत असं?
ती: आहेच तो वेडेपणा. पण करायचा ना कधीतरी वेडेपणा.आणि मी म्हणतेय की केवळ काल्पनिक वेडेपणा.
तो: पण तो तरी कशाला हवा न? माणसानं अंथरूण पाहून पाय पसरावेत.
ती: जाऊ दे तुला नाहीच कळणार मी काय म्हणतेय ते.
तो: हो मला कळतच नाही तुला काय म्हणायचं असतं ते.
ती: (मनातल्या मनात) माझ्या मनाच्या समाधानासाठी तरी हो म्हणायचं होतंस ना. तू घेतलं तरी मी परत केलं असतं.
तो: (मनातल्या मनात) खरंच तुला देता येईल तेव्हां आणेनच ना. कशाला उगाच खोट स्वप्न दाखवावं माणसानं?
आज पुन्हा एकदा 'स्वप्न' आणि 'सत्य' यांची वादावादी झाली होती. आज पुन्हा एकदा दोघे एकमेकांकडे पाठ करुन झोपले होते.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
(No subject)
स्वस्ति, This happens in
स्वस्ति,
This happens in every other household more than we imagine. 
Vidya.
(No subject)
Vidya, these days I read all
Vidya, these days I read all your writings. You write so nicely. Light but filled with meaning. This is a true story that happens in all middle class households. Keep on writing. I am sorry I prefer to type in english. Alashi manoos ajoon kay!!
As it is said.....पु ले शू!!
नाना फडणवीस, धन्यवाद. Hope
नाना फडणवीस, धन्यवाद.
Hope you continue Reading.
विद्या.
हलकंफुलकं पण मस्तच! रोजचा
हलकंफुलकं पण मस्तच!
रोजचा सुविचार वाचणं आणि आता रोज तुमचा लेख वाचणं अस झालं! लिहित राहा!
छान. ( फरक आहे कारण त्याचा
छान.
( फरक आहे कारण त्याचा रोल आर्थिक जबाबदार्याचा आहे व तिचा त्याबाबत दुय्यम रोल आहे.
गृहपाठ : स्त्रीसत्ताक पद्धत , स्त्री पूर्णपणे मिळवती , पुरुष घरी , पुरुषाच्या मित्राला ( तोही बैठाच ) त्याच्या बायकोने ( तीही मिळवती ) सोन्याची सात तोळ्याची चेन दिली.... आता वरील संवाद जेंडर बदलून पुन्हा लिहून काढा. )
पुरुषाची विचार करायची पद्धत
पुरुषाची विचार करायची पद्धत वि. स्त्रीची... पुरुष विंडो शॉपींग करत बसत नाहीत जे घ्यायचे ते घ्यायला जातात आणि बाहेर पडतात. स्त्रीया एक गोष्ट घ्यायला जातात आणि दहा गोष्टींच विंडो शॉपींग करून घरी येतात
यात स्त्री कमावती नाही असा
यात स्त्री कमावती नाही असा कुठेही उल्लेख नाहि. प्रश्न पैशाचा नसून स्वप्नाळू किंवा सत्यात राहण्याच्या वृत्तीचा आहे. आणि हो मी पुरुषही स्वप्नाळू पाहिले आहेत ज्यांच्या बायका त्यांना खर्च न करण्यास सांगतात. आणि मी दोन्ही बाजू समजू शकते आणि तशा मंडल्याही आहेत.
विद्या .
राजू, असेच वाचत रहा. अनेक
राजू, असेच वाचत रहा. अनेक आभार.
विद्या.