पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 1 December, 2016 - 09:56

२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही.
बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथवा हास्यास्पद आहे असे समजले जाते.पण काही पुरुषांना बायकांचे वाईट अनुभव येतात हे खरे आहे.कायद्याचे संरक्षण सर्व बाबतीत स्त्रीला असल्याने पुरुषांना कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न पडतो.काहीही झालं तरी चूक पुरुषाचीच असते असा प्रवाद असल्याने स्त्रीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष कुठेच दाद मागायला जात नाहीत.
मलाही माझ्या वैयक्तीत आयुष्यात अश्या स्त्रीयांचे वाईट अनुभव आले होते.पैकी खाली काही देत आहे.
अनुभव१
मी कॉलेजला असताना ,२००४ ला पहिल्यांदा मला बायकाही क्रुर वागु शकतात व पुरुषांचा यथेच्य विनयभंग करु शकतात याचा अनुभव आला.झालं होतं असं कि आमच्या केमिस्ट्री लॅब मध्ये एक महिला लॅब अटेडंट होती.एकदा माझ्याकडून practicle चालू असताना महागडा थर्मामीटर फुटला.मला शिव्या बसल्याच पण त्या महिला लॅब अटेंडंट्लाही शाब्दीक मार सर्वांसमोर मिळाला,का ते माहीत नाहि.पण तीने त्या दिवसापासुन मला त्रास द्यायला सुरवात केली.सर्वांसमोर मला तब्येतीवरुन चिडवणे ,practicleला आवश्यक वस्तु देताना सहेतुक स्पर्श करणे ,रोखुण बघणे,माझ्या मित्रांना खाजगित मी तिच्या प्रेमात पडलो आहे असे अप्रत्यक्ष सांगणे असे अनेक प्रकार तिने केले.
तिच्या प्रेमात पडण्याचा प्रश्नच नव्हता,दिसायला बरी असली तरी मला तिच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.माझं लक्ष फक्त अभ्यासावर होते.२००४ च्या त्या सहा सात महिण्यात तिच्या harassment चा व unwanted sexual advancesचा मला मानसिक त्रास झाला.मित्र म्हणायचे एंजॉय कर,पण आवडत नसलेल्या बाईची नकोशी जवळीक एंजॉय कशी करायची.तक्रार करायला गेलो असतो तर मीच तिला exploit करतोय असा अर्थ लगेच काढला गेला असता,ते मला नको होते.ति तेव्हा तिशीत होती ,मॅरीड होती.पण स्त्री असुन इतकी सायकोपॅथिक कशी हा प्रश्न मला अजुनही पडतो.
अनुभव २
एकदा महामंडळाच्या लालडब्याने प्रवास करताना एक मध्यमवयीन महीला माझ्या शेजारी येऊन बसली.बस कधी सुटणार वगैरे चौकश्या करायच्या त्यातिच्या माझ्याकडे करुन झाल्या.बस सुटल्यावर यथावकाश बसमधले दिवे घालवल्यावर तिने मला खेटायला सुरवात केली,असेल चालू म्हणुन मी दुर्लक्ष केले .पण तिने चक्क त्या अंधारल्या बसमध्ये माझा हात हातात घेतला .मध्यममार्गी व पांढरपेशा मानसिकतेमुळे मी ओशाळलो.हात झटकम सोडवून घेतला व सीट बदलुन बसलो.तिचा स्टॉप आल्यावर तिने वळुन माझ्याकडे बघितले ,व ' मी फार काही गमावले ,असा हसरा कटाक्ष टाकून निघुन गेली.तिच्या अश्या वागण्याने मला त्या प्रसंगात काही सुचले नाही..आपणच संधी गमावली का ? असा एक पुरुषी विचारही मनात येऊन गेला .पण पांढरपेशी मानसिकता असल्याने गप्प राहीलो.

अनुभव ३
आमच्या इथल्या एका नवीन शॉपिंग सेंटरमधे गेलो होतो,खरेदी झाल्यावर काउंटरपाशी आलो.काउंटरवर एक मुलगी बसली होती.
काउंटरवरची ती-( हसुन) आवडले तुम्हाला?
मी- काय ते?
ती- (डोळ्यात रोखुन बघत)आमचे शॉपिंग सेंटर?
मी- हं,बिल करताय ना?
ती-( माझ्या डोळ्याशी भिडवलेले डोळे न हलवता) करतेय की!
मी- कीती झाले?
ती- (लाडात येऊन) लीहलेय की त्याच्यावर!
मी बिल देऊन पुढे गेल्यावर मागे वळुण पाहिले, तिने शेजारच्या काऊंटरवरच्या टगीला टाळी दिली व कसा नजरेने गार केला' असा भाव चेहर्यावर आणला.
तर मंडळी पुरुषांचाही विनयभंग होतो.एक स्त्री तो करु शकते.आज स्त्री सुरक्षेविषयी काथ्याकुट होत असताना ही बाजुही पुढे आलि पाहिजे असे वाटल्याने अनेक अनुभवापैकी हे काही अनुभव शेअर केलेत.आपल्याला आवडलेल्या स्त्रीचा सहवास मिळावा असे मला वाटायचे / वाटते,तसा तो मिळालाही.पण हे unwanted sexual advances ही वाट्याला आले.मान्य, स्त्री इतका पुरुषांना याचा त्रास होत नाही ,पण आखीर मर्द भी इन्सान होता है ना.त्याचि काळजि करणारे कुणीच नाही,तसे कायदे नाहीत हे पाहुन खेद वाटल्याशिवाय रहात नाहि.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सिंथेटिक जिनियस, आपले अभिनंदन!! एका महत्वाच्या विषयाला आपण तोंड फोडलेय. आपल्या हिंमतीची दाद द्यायलाच हवी.

जाई धन्यवाद, पण जरा उशीराच समजले. आता वर्षभर थांबा.
पण तरी आतापासूनच जाहीरात करून पुढच्यावेळी पुर्ण ऑफिसभर मिशी ऊगवतो एकेकाची

तसेही मिशी पुरुषांनी ठेवावीच, त्याने विनयभंगाची शक्यता कमी होते हा अनुभव Happy

पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कायदे व्हावे इतक्या या घटना घडत नाहीत हे एक। आणि तुम्हाला आलेल्या अनुभवांना अत्याचार म्हणणे हा एक विनोदच।लाहान मुलांवर घडणाऱ्या अत्याचारांसाठी कायदे आहेत।

तुमचे प्रॉब्लेम्स इतके मोठे आहेत की इंटरनेटही कमी पडेल. बरं तुम्हांला महिला बॉस नाही ना? त्या पण हाताखालच्या पुरुषांचा छळ करतात असं ऐकून आहे.

एकदा कंपनी पिकनिकला, मी हाफ पँटमधे असताना, एका दुसर्‍याच डिपार्टमेंट मधल्या बाईने माझ्या पायावरून हात फिरवून You have sexy legs असे म्हंटले. ते माझ्या मॅनेजरबाईने ऐकले नि म्हणाली, जपून, ती तुला तिच्या डिपार्टमेंट मधे यावे म्हणून असले काही तरी बोलते.

एकंदरीत त्या sexy legs म्हणणार्‍या बाई कडे बघून तिला sex प्रत्यक्ष माहित नसावे असे वाटले! तेंव्हा मी पण डॉनाल्ड ट्रंपसारखा विचार (मनात) केला की हिच्याकडे बघा, कुणितरी तिच्याकडे लक्ष देईल का?

पण माझे विनयभंग होण्याचे वय जवळपास उलटून गेल्याने मला त्यात काही विनयभंग वगैरे वाटले नाही!

सिंजी ,

तुमच्या मुद्यात अजून एक भर म्हणजे गे(समलिंगी) पुरुषांकडून लहान मुलगे, teenage boys , तरुण पुरुषांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार. २०१५ चा ऑस्कर विजेता स्पॉटलाईट हा चित्रपट या टॉपिकवर भाष्य करतो.

हम्म्म ,तो मुद्दाही घेणार आहे एकदा चर्चेला .हे विकृत गे लोक डोक्यात जातात.दुर्दैवाने मायबोलीवर समलिंगी लोकांना सपोर्ट करणारे अनेक आहेत हे एका धाग्यावर चर्चे दरम्यान लक्षात आले होते.

विकृत गे लोक डोक्यात जातात >>> हे जरा क्लियर करता का सिंजीजी?
म्हणजे विकृत बायसेक्शुअल किंवा विकृत हेटरोसेक्शुअल लोक डोक्यात नाही जात का ? किंवा विकृत नसलेले गे लोकही डोक्यत जात नाहीत असं आहे का?
म्हणजे तुमची नक्की भूमिका समजायला विचारतेय.

किंवा विकृत नसलेले गे लोकही
डोक्यत जात नाहीत असं आहे का>>>>>>>> समलिंगी असणे हीच विकृती आहे.पण तो धाग्याचा विषय नसल्याने आता लिहित नाही.या विकृतीवर व तांच्या पाठीराख्यांवर नवीन धागा काढणार आहे.

समलिंगी असणे हीच विकृती आहे.>> Uhoh कुठल्या जगात राहता तुम्ही??? कठीण आहे एकंदरीतच.. तुमचे विचार वाचून तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायचे टाळलेच होते. आता धागा उघडून बघायचेही कष्ट घेणार नाही मी.

बापरे, एक स्त्री म्हणून मी असेही काही करू शकते हा विचारच कधी केला नव्हता. माझ्यातील स्त्री शक्तीची जाणीव करून दिल्याबद्दल आभारी आहे. आता उद्यापासून पुरुषांची खैर नाही.

>>तुमच्या मुद्यात अजून एक भर म्हणजे गे(समलिंगी) पुरुषांकडून लहान मुलगे, teenage boys , तरुण पुरुषांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार. २०१५ चा ऑस्कर विजेता स्पॉटलाईट हा चित्रपट या टॉपिकवर भाष्य करतो.>>
कायच्याकै! स्पॉटलाईट हा चित्रपट बॉस्टनच्या कॅथलिक आर्चडायसिसने जे चाएल्ड अ‍ॅब्युझ आणि मॉलेस्टेशनबाबत कव्हर अप केले त्याबद्दल आहे. ब्रह्मचर्याची शपथ घेवून हातातल्या सत्तेचा गैरवापर करणारे प्रिस्ट्स वेगळे आणि सामन्य गे वेगळे! उगाच भलते गैरसमज आणि होमोफोबिया पसरवणे नको!

सिंजी,
सेक्शुअल प्रिडेटर स्त्री/पुरुष कुणीही असू शकते. यात नविन काही नाहीये. त्याबद्दल संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही जिथे रहाता तिथे चांगला कायदा व्हावा म्हणून प्रयत्न करा.

सिंजि, अहो समलिंगी लोकांच्या संघटना असतात त्यांना सपोर्ट करणार्‍या, मदत करणार्‍या. पण तुम्हांला आणि तुमच्या अगणित प्रॉब्लेम्सना कुणी वाली नाही. तेव्हा तुम्ही स्वतःवर फोकस करून बरं व्हा बरं.

एका नंतर एक धागे काढणं सुरु आहे आणि विधानं सुद्धा जरा तीव्र होत आहेत. सध्यातरी काही लिहिणार नाही कारण पुढे परत तुम्ही ड्यु आयडी निघाले अन बळच टाईमपास म्हणून ह्या चर्चा घडवून आणत असाल तर काय सांगा.
तुमच्या विचारांमध्ये काही बदल दिसून आला पुढे तर एक वेळ विचार करता येइल. सध्यातरी शंकेला भरपूर वाव आहे की तुम्ही बळच हे धागे काढत आहात.

अरे बापरे! माझा होमोफोबिया पसरावायचा हेतू नव्हता. आणि सगळे 'गे' वाईट किंवा विकृत असं तर अजिबात म्हणायचं नाहीये. तसं कोणाला वाटलं असल्यास क्षमस्व!

बापरे, इतक्या जणींकडून पुढाकार म्हणजे शक्यता आहे की तुम्ही प्रचंड देखणे, रुबाबदार macho तत्सम असणार. चित्रपटात काम करण्याबद्दल कधी विचार केला नाहीत का?
अरे नाही तिथेहि शोषण चालते असे ऐकिवात आहे, काय करावे बिचाऱ्या सिंजीनी!
कुणीतरी या बायापासून त्यांची सुटका करा पाहू?

स्त्री करु शकत असलेल्या (?) पुरुषांच्या विनयभंगावर धागा काढलात, तर हातासरशी याच धाग्यात, पुरुषच पुरुषाचा विनयभंग (रॅगिंग?) करतो तो विषयही हाताळा की राव....!

जितक्या सहजपणे मांजरीचे कुत्र्याचे " पिल्लु " दिसल्यावर त्याच्या डोक्याखांद्यावरुन अंगप्रत्यंगावरुन हात फिरवला जातो, एखादी गाय दिसली तर श्रद्धेने तिला स्पर्श करुन नमस्कार केला जातो, तितक्याच सहजपणे कुणी स्पर्श केला Proud , आणि त्यामुळे बिचकायला होत असेल, तर "पाप" आपल्याच मनात आधीपासुन रुजलेले आहे हे खात्रीने समजुन घ्यावे. असे मला वाटते.

{{{ पुरुषांचाही विनयभंग होतो!!!! }}}

वा वा. या विषयावरचा लेख मांडताय, आणि तोही कुठे? तर जिथे महिला चक्क आजोबा म्हणत पुरुषांना डोळा मारतात त्या मायबोलीवर. धन्य आहे तुमची. या लेखाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता फारच कमी.

असो. तुम्हाला जो मुद्दा मांडायचाय तो आधीच ऐतराज नावाच्या चित्रपटात मांडला गेलाय. त्या चित्रपटातील खलनायिका नायकाला सेक्शुअल डिमांड करताना "एक औरत होकर मुझे कोई ऐतराज नही तो तुम्हे किस बातपें ऐतराज है" असे विचारते तेव्हा ती जणू पुरुषांना नकाराधिकार नाहीच असे सुचविते.

<<<तर "पाप" आपल्याच मनात आधीपासुन रुजलेले आहे हे खात्रीने समजुन घ्यावे. असे मला वाटते.>>> Biggrin
हे पाप मनात रुजण्यासाठी येष्टी स्टँडावर महाराष्ट्र शासनाने अधिकृत सोय पुस्तकांच्या दुकानातून (सफरचंद मासिक) केली आहे (होय इंजिनीरिंग मध्ये मी हि पुस्तक वाचली आहेत). लेख वाचल्यावर त्या कथांची आठवण झाली. येष्टी आणि बराच काही Proud

हे खरे आहे. मी परवाच एक लेख वाचला. तरुण मुलांचे मुलग्यांचे ट्रॅफिकिंग पण होते. मिडल इस्ट मध्ये
ज्या उंटांच्या रेसेस असतात त्याला वर बसवायला लहान मुलगेच लागतात. ते गरीब देशांतून चोरले जातात. मुलग्यांचा अब्यूज होतो. व त्यालाही मुलींवरच्या अब्यूज सारखेच दड पले जाते. धर्माचा, आर्थिक वजनाचा धाक दाखवून हे केले जाते.

परवा वाचलेल्या लेखामध्ये जे सिरीअन व इतर रेफ्यूजी युरोपात व इतरत्र जगू पाहत आहेत त्यांमध्ये १७ वर्शाचे टीनेज मुलगे वेश्या बनत आहेत. व ते साधारण ग्रीस मध्ये आडबाजूला, मेन टूरिस्ट हबच्या आगे मागे हा धंदा करत असतात. काही युरो ते काही शे युरो साठी हे चालते. वाचून वाइट वाटले. ह्युमन ट्रॅफिकिंग चा हा एक महत्वाचा भाग आहे. कोण नराधम असतील जे त्यांच्या मजबूरीचा फायदा घेत असतील.

सीएन एन किंवा रूटर्स वर आहे हा लेख.

Pages