माझी नर्मदा परिक्रमा

Submitted by Narmade Har on 24 July, 2025 - 08:01
नर्मदा

नर्मदे हर !
गतवर्षी मी माझी नर्मदा परिक्रमा या विषयावर इथे लेखमाला सुरू करण्याचा विचार केला होता . परंतु त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून मी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा वेळ लिखाणामध्ये व्यतित व्हावा या दृष्टीने ते लिखाण थांबवले होते . त्यामुळेच की काय परंतु आता आपले ९०% लिखाण पूर्ण झालेले आहे ! आपण ते थेट दुव्यावर जाऊन वाचू शकता . या लेखाचे जे शीर्षक आहे त्याच नावाने गुगलवर शोध घेतला असता ब्लॉग ची लिंक येते . तिथे जाऊन आपण १६४ भाग वाचू शकता . अजूनही दहावीस भाग होणार आहेत . परंतु आपल्याला जर वाचनाला पुरेसा वेळ नसेल तर आपण youtube वर जाऊन याच लेखांचे अभिवाचन ऐकू शकता . त्यासाठी youtube वर " @नर्मदा " असे शोधले की आपले चॅनेल उघडते . माझी नर्मदा परिक्रमा असेच चॅनलचे नाव आहे . तिथे प्लेलिस्ट सेक्शन मध्ये अभिवाचन नावाची प्ले लिस्ट आहे . इथे जाऊन आपण सर्व लेख ओळीने ऐकू शकता . हे दृकश्राव्य स्वरूपात आहेत . त्यामुळे आपण त्यातील चित्रे व्हिडिओ देखील पाहू शकता . इथे संपूर्ण व लिखाण करणे त्रासाचे आहे कारण लेखनामध्ये अनेक चित्रे वापरलेली आहेत . तरी इच्छुकांनी अवश्य वाचन करावे !
परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या होत्या.खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .
ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय , स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .
आपल्या प्रतिक्रिया ब्लॉगवर व यूट्यूब चैनल वर वाचायला आवडतील !

नर्मदे हर !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults