नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 13 December, 2023 - 13:06

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचा भाग बघून बरं वाटलं..
शीर्षकात भाग क्रमांक नमूद करा. त्यामुळे नीट क्रमाने भाग वाचता येतील आणि कोणता भाग सुटणार नाही.

वाचतोय आवडतंय.

शीर्षकात भाग क्रमांक नमूद करा. त्यामुळे नीट क्रमाने भाग वाचता येतील आणि कोणता भाग सुटणार नाही. >>> +१०८

ब्लॉगला सुरूवात केलेली आहे. सध्या अन्य काही कामात व्यस्त आहे. संपूर्ण मालिका एकाच दमात वाचून होईल असं लिखाण आहे.
अधले मधले भाग न दिलेले उत्तम ( असे मला वाटते).

इथे जेव्हां क्रमाने सगळे भाग द्याल तेव्हां प्रत्येक भागाच्या सुरूवातीला मागच्या भागाचा दुवा द्यायला विसरू नका.
तसेच भागाच्या शेवटी पुढच्या भागावर जायला दुवा द्या. यामुळे नवीन वाचक जेव्हां पहिल्या भागापासून सुरूवात करतो तेव्हां त्याला अखेरपर्यंत विनासायास जाता येते. एखाद्या नव्या वाचकाला मधलाच भाग दिसला तर तो मागे मागे जाऊन पहिल्या भागापासून सुरूवात करू शकतो.
अर्थात हे नाही केले तरी वाचक शोधून घेऊ शकतात.

लिंक देण्यासाठी मजकूर टाईप करण्याची विंडो आहे त्याखाली टेक्स्ट फॉरमॅट्स ऑप्शन्स वर क्लिक करा. आपोआप लक्षात येईल.

वरती काही वाचकांनी टीव्ही सिरीयल किंवा युट्युब व्हिडिओ बद्दल सुचविले आहे . आपण युट्युब वर रेवा नावाचा गुजराती चित्रपट आहे तो अवश्य पहावा . रेवा नावाचा नर्मदा परिक्रमेवर आधारित अतिशय सुंदर असा हा चित्रपट असून गंमत म्हणजे त्यातील भाषा आपल्याला लगेच कळते .

मी तुमच्या ब्लॉगवर लेख वाचत आहे. आता ३-४ च राहिलेत.

इथे लेखात सुरवातीलाच आधीच्या लेखाची लिंक आणि शेवटी पुढच्या लेखाची लिंक दिली तर वाचकांना चटकन मिळतील.

> >मी रेवा बघायचा प्रयत्न केला. मला जरा बोअर होऊन मी १५,२० मि. बंद केला. > >
त्यात परिक्रमेचा मुख्य भाग चित्रपटाच्या शेवटच्या पंधरा-वीस मिनिटात दाखवला आहे !

ब्लॉग वर रिप्लाय दिला की error येते आहे . वेगवेगळ्या youtube links एकाच भागात enlist करता आल्या तर बघा please. आणि खूप छान मालिका आहे. वाचल्यानंतर कधी ना कधी , वाहनाने का होईना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होते आहे. मला वाटतं मी करेन.

> >वाचल्यानंतर कधी ना कधी , वाहनाने का होईना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होते आहे. मला वाटतं मी करेन. > > ह्यातच ह्या लेखनप्रपंचाचे सार्थक आहे . . .

रेवा चित्रपट हा, गुजराथी लेखक धृव भट यांच्या तत्वमसि या कादंबरीवर आधारित आहे. यात कथानायकाचा आयुष्याचा प्रवास; निसर्गाने (त्यात नर्मदेचा मोठा सहभाग) त्याच्यात, त्याच्या स्वभाव, विचार यांत घडलेले बदल याची गोष्ट आहे ती.
तत्वमसि वरती इथे(माबो) बरीच चर्चा पूर्वी झाली आहे.