गझल

तुझ्याविना या जगात माझा.. या आठवड्याचा तरही...

Submitted by मी मुक्ता.. on 17 January, 2011 - 23:23

जाणकारांच्या सूचना/प्रतिक्रिया/बदल अपेक्षित...

http://merakuchhsaman.blogspot.com/

सातीच्या सुचना आणि प्रत्यक्ष मदत यामुळे इथे चांगले बदल करणं शक्य झाल मला.. Happy खूप आभार.. मोठ्या टायपातले तिचे बदल add करून गझल पुन्हा छापली आहे.. Happy

---------------------------------------------------------------------------------

सदैव दिसशी मला सभोती तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..

भिनून जावा नसानसांती ,मला नव्याने असा डसावा

गुलमोहर: 

तशी रोज खात्यात आहे उधारी

Submitted by साती on 14 January, 2011 - 02:17

कधी मापली ना स्वतःची पथारी
तशी रोज खात्यात आहे उधारी ||१||

मला पोहण्याचे धडे द्यावया ते
उभे राहती कोरड्याने किनारी ||२||

जरा नाच रे माणसांच्या समोरी
कसे विनवितो माकडाला मदारी ||३||

सुखें झोपला देवशयनी विठोबा
स्वतः माळतो हार सारे पुजारी ||४||

उभा राहतो भोवती शासकाच्या
उगा भाव तो आपलाही वधारी ||५||

तुला मारताना मला घाव होतो
असे प्रीतिचे शस्त्र आहे दुधारी ||६||

किती आर्जवांती मिळाले परंतु
तुझ्या चुंबना लाजण्याने खुमारी ||७||

किती शोधले शब्द नाही मिळाले
अशी जाहली आज "साती" भिकारी ||८||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रुक्मिणीचे तुळशीपत्र

Submitted by शेखर तनखीवाले on 2 January, 2011 - 21:33

जेथ मी होतो निरुत्तर, शब्द माझे बोलले
वाहत्या आठवांवर मी, शब्द माझे बांधले!

डाक बंगल्यातुन जेव्हा, ‘पुरोगामी’ भीड जागे
एकटे थंडीत तेव्हा, शब्द माझे भुंकले!

छाटल्या लांडग्यांनी जेव्हा, भाडोत्री बैलांच्या जीव्हा
आग पोटातील त्यांच्या, शब्द माझे ओकले!

दांडग्यांनी तोलले अन न्यायदेवतेला धना ने
रुक्मिणीचे तुळशीपत्र मग, शब्द माझे जाहले!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

घोषणा झाली...

Submitted by अ. अ. जोशी on 6 November, 2010 - 08:33

घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली

माणसे झाली पहा आता शहाणी
फार पूर्वी भोवती घोटाळलेली

पालवी कोठे नसू द्या फार मोठी
आणि ती नक्की नको नाठाळलेली

एकही अश्रू दिसेना आज कोठे
गोष्ट होती आजही रक्ताळलेली

नेहमी असते खर्‍याची गोष्ट मागे
जातसे जत्रा पुढे वाचाळलेली

मद्य कसले घेत बसता धुंद होण्या....?
जीवने बनवा नशा फेसाळलेली..!

खोल आहे मी समुद्रासारखा; पण...
आजही देतो उन्हें गंधाळलेली

फायदा नसतो उधारी फेडण्याचा
माणसे गेल्यावरी सांभाळलेली

आजही गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!

टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...

गुलमोहर: 

... स्मरण असावे

Submitted by अ. अ. जोशी on 17 October, 2010 - 11:49

विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'

भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'

एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे

पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?

आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे

क्षणाक्षणाला बदलत असते 'हो' की 'नाही'
नशीबासही कोणतेतरी बटण असावे

लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते
आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...?

देव नाकारला पण विवेक सुटला नाही
त्यांच्या अंगी निश्चीतच देवपण असावे

गुलमोहर: 

का अजून वर्तमान...

Submitted by अ. अ. जोशी on 7 October, 2010 - 13:32

का अजून वर्तमान जातसे जळून..?
एकदा तुझाच भूतकाळ बघ वळून

नेहमीच जिंकणार तूच शर्यतीत
आपल्याच सावली पुढे-पुढे पळून

वेदने! नको करूस आणखी उशीर...
ये अशी मिठीत; वेळ जायची टळून...

द्या, हजार घाव काळजावरी खुशाल...!
एकदाच, पण बघा स्वतःसही छळून

काय राहिले तुझे अजून काळजात ?
जातसे अजून जीव आतला गळून...

द्या महत्त्व ज्या क्षणांस द्यायचे तिथेच...
वेळ टाळली कि फायदा नसे कळून

एवढे कधी महत्त्व मी दिले कुणास..?
आसवे तिची उगाच जायची ढळून....

जेवढी नसेल वाट काढली मळून
तेवढा विचार 'अजय' काढतो दळून

गुलमोहर: 

विसरण्याला मद्यप्याला....

Submitted by अ. अ. जोशी on 2 October, 2010 - 06:32

विसरण्याला, मद्यप्याला ओठ हे धरतात का रे?
अन नशा आल्यावरीही अश्रु ओघळतात का रे?

ज्या फुलांना पाहिले की त्या मिठीचा गंध येतो
नेहमी गंधाळण्या कोमेजली असतात का रे?

पाखरे येतात काही आजही घरट्यात माझ्या
आठवांचे वेचुनी दाणे... पुन्हा उडतात का रे?

देह, घरटे एक झाले; वाटते होईल मनही...
या जशा जमतात आशा, त्या तशा उरतात का रे?

आजही साधेपणाने गात आहे 'अजय' गीते
ऐकणारेही तसे साधे कुणी मिळतात का रे?

गुलमोहर: 

अंतरातली व्यथा अंतरी जपायची

Submitted by मिल्या on 24 September, 2010 - 05:07

भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोलवर... वीज लखलखायची

स्पर्श केवडा तुझा ... श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन मिठी डसायची

सांत्वनास तू मला... मी तुला असायचो
रात्रभर दवांमधे आसवे भिजायची

ह्या तिच्या जुन्या स्मृती... मौनराग छेडती
श्वास रोख! अन्यथा... शांतता ढळायची

दाखवू नकोस तू दु:ख सारखे तुझे
प्रेरणा मिळायची... वेदना सुचायची

दिवस पाहिले असे... रोज अवस व्हायची
आणि भास्करासही सावली गिळायची

एक नीळकंठ तर सर्व माणसांमधे
अंतरातली व्यथा अंतरी जपायची

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

... भांडू नकोस राणी

Submitted by अ. अ. जोशी on 7 September, 2010 - 14:12

पाहून पाठ इकडे फिरवू नकोस राणी
इतके महत्त्व कोणा देऊ नकोस राणी

आयुष्य वेचलेले समजून घे जरासे
नुसती फुले सकाळी चढवू नकोस राणी

तू कालच्याप्रमाणे नव्हतीस आजही अन
बाता तरी उद्याच्या मारू नकोस राणी

जमले न घालणेही फुंकर जरा मनावर
खपल्या तरी व्रणाच्या काढू नकोस राणी

जमले तुला न होते सगळेच सांगणेही
खोटे तरी कुणाशी बोलू नकोस राणी

होतो कधी तुझा मी; होईनही कदाचित....
इतक्यात भाव कुठला खाऊ नकोस राणी

बोलू नकोस किंवा कौतुक नको करू तू...
इतकी तुला विनंती...., भांडू नकोस राणी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

या नभी अंधारवेना

Submitted by अ. अ. जोशी on 4 September, 2010 - 00:41

सांजले ! पण सूर्य कलती दाखवेना...
ती दिसेना ! या नभी अंधारवेना ...

पाहिले विस्फोट, आई विखुरलेली...
आज कोणी तान्हुल्याला जोजवेना

एवढी नव्हती सवय कुठल्या सुखाची
दूरदेशी, बघ, मलाही राहवेना

मी तिचा नाही असे वाटून गेले..
आणि नंतर वाटले ते बोलवेना

ते तिचे जाणे नि येणे याच हृदयी...
सोसले पूर्वी ! नव्याने सोसवेना

प्राण मी झालो तिचा नजरेत एका
ओढणी आता तिलाही ओढवेना

पाहिले होते तिला मी लाजलेले...
एवढे की, सभ्यतेने पाहवेना

शस्त्रक्रीया आज हृदयाचीच केली
गुंतलेल्या भावनांशी खेळवेना

दु:ख इतके आर्त विणले वेदनांनी
एकही धागा सुखाचा जोडवेना

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - गझल