ते दूर दूर गेले .......

Submitted by ganeshsonawane on 16 February, 2013 - 00:56

ते दूर दूर गेले जे पास पास होते
अन सोबतीस माझ्या त्यांचे अभास होते

वाटेस लावलेले डोळे मिटून गेले
पण वाट ती बघाया मिटले न श्वास होते

रडवायला अघोरी दु:खे हजार होती
दु:खात हासण्याचे माझे प्रयास होते

हसमुख चेहऱ्यांनी कवटाळीले गळ्याला
जे हार वाटले ते रंगीन फास होते

होवून चंदनासम झिजला कुणी न येथे
पंचारती कराया नुसते सुवास होते

बघताच आसमंती तारा गळून गेला
पण दुःख निखळ्ण्याचे कोठे नभास होते ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार
कृ प या मान्यवरांनी मार्गदर्शन करावे मी गझल क्षेत्रात नवीन आहे , आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे

गझलेत नवीन असाल, तर ही गझल चांगलीच आहे.
काही तृटी आहेत, त्या सरावाने दूर होतील.
पुढील लेखनास शुभेच्छा. Happy

आभारी आहे सर, कृपया सांगितल्यात तर बरे होईल, मला सुधारणा करता येतील. मार्गदर्शनाची अपेक्षा

सुरेख