(तस्वीर-तरही) : जीवना केलीस शाळा...

Submitted by हर्षल_चव्हाण on 13 February, 2013 - 08:25

तस्वीर तरहीत माझाही सहभाग... गझल झाली नसल्यास जाणकारांनी कळवावे Happy

चित्रं इथे आहेत

मेघ काळोखे, तळ्याशी झाडही निष्पर्ण झाले,
सांज होता आठवांचे अन् झरे दाटून आले...

गोड होते खूप पाणी, आड होता खोल थोडा,
गाव जिंदादिल् तयांचा, जे जगा पाहून आले...

बंद झाले मार्ग सारे, हात तू सोडून जाता,
काय सांगू मी मनाला? ते तुझ्या मागून आले...

जीवना केलीस शाळा; हे सुखाचे चार मोके,
कोवळ्या माझ्या वयाला, का असे टाळून आले...

कोण आहे मी कुणाचा, काय माझे ठाव आहे?
तारकांनी झाकलेले, दु:ख तेजाळून आले...
---------------------------------------
हर्षल (१३/२/२०१३-सायं. ६.४०)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

aavadalee
hee gazalach aahe(vaiyaktik mat)
maktyaat don oleenchaa sambandh ajoon ghatt yaayalaa havaa hotaa (hehee vaiyaktik matach)
Happy

बंद झाले मार्ग सारे, हात तू सोडून जाता,
काय सांगू मी मनाला? ते तुझ्या मागून आले...
>>> क्या बात क्या बात

छान

कोण आहे मी कुणाचा, काय माझे ठाव आहे?
तारकांनी झाकलेले, दु:ख तेजाळून आले...<<< सुंदर शेर

गझल एकंदर आश्वासक आहेच

उल्हासाजी, वैवकु, गंगाधरजी, चिखल्या, मकरंद आणि बेफिकीरजी : प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy
ही माझी दुसरी गझल Happy

विचार आवडले.
`शाळा करणे' हा शब्दप्रयोग फार सुंदरपणे वापरलाय. मला त्यामुळे हाच शेर जास्त आवडला

जीवना केलीस शाळा; हे सुखाचे चार मोके,
कोवळ्या माझ्या वयाला, का असे टाळून आले >>>
फारच आवडला..
उत्तम गझल!

मतला खूपच आवडला .
त्यात मेघ , झाड आणि मन तिघांनाही कोसळून , झडून , पाझरून मुक्त व्हायचं आहे , त्यासाठीच जणू तिघेही उतावीळ आणि व्याकूळ झाले आहेत असा अर्थ मला जाणवला , तो अतिशय आवडला आणि आपलासाही वाटला.