गझल

हौस

Submitted by समीर चव्हाण on 15 January, 2013 - 07:33

काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते

बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते

उरली न आता जिद्द जगण्याची, जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते

लागे जिव्हारी बोल कोणाचा असा
काटा उरी तुटल्याप्रमाणे वाटते

आता स्मरेना नेमके माझे मला
काहीतरी म्हटल्याप्रमाणे वाटते

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

Submitted by अभय आर्वीकर on 13 January, 2013 - 21:44

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

मी तुझी साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये

रस्सीखेच

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मीच ढग, पाऊस मी, मातीत गेलो मिसळुनी
मी मला शोधू कसा, ना राहिलो कोठेच मी

जवळ ती होती कधी, आभास आता राहीले
होत अश्रू टपकतो गाली तिच्या हलकेच मी

नाव माझे चर्चिले गेले अनेकांच्या मुखी
होत बदनामीच होती, समजलो भलतेच मी

वाटले मी उत्तरे होतो सवालांची तिच्या
समजले आता मलाही फक्त होतो पेच मी

'विसरले सारे!' मनाला मी जरा समजावले
अवचितच पुढच्या क्षणाला हाय खाल्ली ठेच मी

ती जगाला दाखवे आता सुखाने नांदते
अंतरी वसते तिच्या जी तीच रस्सीखेच मी

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

रुंजी

Submitted by समीर चव्हाण on 8 January, 2013 - 01:24

किती रुंजी अशी तिथल्या तिथे घालत रहावे
नवी क्षितिजे, नवे आकाश धुंडाळत रहावे

कधी हे मौन पडते आपल्या पथ्यावरी पण
शहाण्याने मनाशी वाद नित घालत रहावे

तुझ्या गाण्यात विरघळती व्यथा अवघ्याच माझ्या
तुला ऐकत रहावे बस तुला ऐकत रहावे

तुझ्या डोळ्यांतले गाणे तुझ्या मौनातली धुन
तुला ऐकत रहावे की तुला पाहत रहावे

कधी देशील एखादीच पण परिपूर्ण रचना
किती सौंदर्य तुकड्यांतून न्याहाळत रहावे

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 

पहिल्यासारखे

Submitted by समीर चव्हाण on 26 December, 2012 - 14:31

उरले न आता चांदणे हृदयात पहिल्यासारखे
ते क्षण-प्रहर, महिने-ऋतू, दिनरात पहिल्यासारखे

मधुमास सरला, बहरही, ते मीलनाचे प्रहरही
कोठे जिव्हाळा, प्रेमही अपुल्यात पहिल्यासारखे

गंमत न आता राहिली वाटा नव्या जोखायची
ठेचाळणे उरले कुठे रस्त्यात पहिल्यासारखे

झाल्या प्रसंगातून तू शिक नेमके विसरायचे
हल्ली कुठे मी ठेवतो लक्षात पहिल्यासारखे

कुठल्या प्रभावातून मी घडलो कळेना नेमक्या
मंजूर नाही राहणे त्याच्यात पहिल्यासारखे

समीर चव्हाण

(हौस संग्रहातून)

विषय: 
शब्दखुणा: 

काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!

Submitted by चैत रे चैत on 18 December, 2012 - 15:26

प्रोफेसरांच्या एका सुंदर गझलेतील अमृत आम्ही चाखले आणि आमच्या मनात आले की आपणही एखादी गझल करून पाहावी. पण दुर्दैवाने आम्हाला चढलेली धुंदी उतरलीच नाही. त्याच धुंदीत लिहिलेल्या काही लडबडत्या ओळी आहेत ह्या.

काल चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला डुलण्याचा!
घोट घोट मी सारी प्यालो, स्वाद समजला चकण्याचा!!

सोबत करण्या तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस हिला ही रुसण्याचा अन् सोस तुला ही 'बसण्याचा'!!

द्रव्य मिळाले खोऱ्याने; पण...हाय, काल मी गमावले!
किंगफिशरच्या प्याल्यामध्ये शाप मिळाला हरण्याचा!!

शब्दखुणा: 

रात्रभर

Submitted by मिल्या on 26 November, 2012 - 01:59

मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर

केवढी वादळे कोंडली ह्या उरी
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर

सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर

मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर

काय केलीस माझी अवस्था सखे
स्वप्न जागेपणी पाहतो रात्रभर

आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर

ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर

'महफिल-ए-गझल'- पंकज उधास (पासेस उपलब्ध)

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 October, 2012 - 01:44

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

'महफिल-ए-गझल' साठीचं आपलं तिकिट खालील पत्त्यावर संपर्क साधून मिळवता येईल.
एलिगंट शोबिझ प्रा. लि.
२१४८, विजयानगर कॉलनी,
हॉटेल कावेरीसमोर, सदाशिव पेठ, पुणे

किंवा

विषय: 

जितके जमते..

Submitted by ज्ञानेश on 11 July, 2012 - 01:24

=======================

संवादाचा ढळतो आहे तोल, तरीही-
जितके जमते, तू माझ्याशी बोल तरीही

तुझ्या कृपेची वर्षा झाली.. निरभ्र झाले
अजून शिल्लक भिंतीमधली ओल तरीही

काठावरती बसणे बहुधा रम्य असावे
आपण जावे जमते तितके खोल तरीही

भेटत नाही मित्र अचानक रस्त्यावरती
म्हणावयाला पृथ्वी असते गोल, तरीही !

आपण आता येथे असणे सुंदर आहे
बदलू शकतो हा सगळा माहोल, तरीही !

पानांमध्ये पिंपळजाळी जपत रहावी,
असल्या संदर्भांना नसते मोल, तरीही...

-ज्ञानेश.
========================

गुलमोहर: 

तुला कधी मिशा फुटणार?

Submitted by अभय आर्वीकर on 19 June, 2012 - 11:27

तुला कधी मिशा फुटणार?

पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर

पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर

काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?

राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर

तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - गझल