तस्वीर-तरही

(तस्वीर-तरही) : जीवना केलीस शाळा...

Submitted by हर्षल_चव्हाण on 13 February, 2013 - 08:25

तस्वीर तरहीत माझाही सहभाग... गझल झाली नसल्यास जाणकारांनी कळवावे Happy

चित्रं इथे आहेत

मेघ काळोखे, तळ्याशी झाडही निष्पर्ण झाले,
सांज होता आठवांचे अन् झरे दाटून आले...

गोड होते खूप पाणी, आड होता खोल थोडा,
गाव जिंदादिल् तयांचा, जे जगा पाहून आले...

बंद झाले मार्ग सारे, हात तू सोडून जाता,
काय सांगू मी मनाला? ते तुझ्या मागून आले...

जीवना केलीस शाळा; हे सुखाचे चार मोके,
कोवळ्या माझ्या वयाला, का असे टाळून आले...

कोण आहे मी कुणाचा, काय माझे ठाव आहे?
तारकांनी झाकलेले, दु:ख तेजाळून आले...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तस्वीर-तरही